मित्रांनो, आपल्या या जीवनात वास्तुशास्त्राला तसेच राशी भविष्य खूप महत्त्व दिले जाते आणि त्याप्रमाणेच आपल्या बाबतीत काही घटना या घडत असतात. त्यातीलच एक म्हणजे राशिभविष्य जे आज आपण मेष राशीबद्दल काही गोष्टी या जाणून घेणार आहोत. त्या गोष्टी कोणत्या व मेष राशी पुढच्या वर्षी कोणत्या घटना घडणार आहे? याविषयीची माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
वर्ष २०२४ मध्ये मेष राशींच्या जीवनात तीन महत्त्वाच्या घटना घडणार आहेत. मेष राशीच्या लोकांबद्दल सांगायचं झाल तर या व्यक्ती कर्तबगार, व्यवहारिक दृष्टिकोन ठेवणाऱ्या असतात. प्रत्येक गोष्टीमध्ये धीटपणा दाखवतात. महत्वकांक्षी तर असतातच पण तापट सुद्धा असतात.कोणत्याही समस्येला तोंड देणाऱ्या असतात हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. स्वतंत्र वृत्तीचा स्वभाव कर्तबगारिपणा यामुळे या राशीच्या व्यक्तींचा दैवापेक्षा प्रयत्नांवर अधिक विश्वास असतो. आणि त्यांच्या प्रयत्नांनीच त्या त्यांची प्रगतीची नवनवीन शिखर गाठत असतात.वर्ष २०२४ मध्ये सुद्धा त्यांच्या बाबतीत असंच काहीसं घडणार आहे. नक्की काय घडणार आहे ते आपण जाणून घेऊया प्रथम आपण आर्थिक घटनेपासून सुरुवात करू.
त्यांच्या आयुष्यात आर्थिक स्थिती कशी असणार आहे? २०२४ मध्ये मेष राशीच्या व्यक्तींच्या आर्थिक स्थितीमध्ये सर्वसाधारण चढ-उतार असेल. वर्षाच्या सुरुवातीला तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल परंतु तुमचे खर्चही वाढतील.जर तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवलं तर तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहील. वर्षाच्या दरम्यान तुमच्या व्यवसायात गती येईल ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होईल.
पण जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असेल अर्थतज्ज्ञांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा. कारण यावेळी आर्थिक नुकसान होऊ शकते.
पैशाच्या बाबतीत कोणत्याही व्यक्तीवर किंवा संस्थेवरही जास्त विश्वास ठेवू नका. नाहीतर त्यात तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमच्या आर्थिक जीवनामध्ये स्थिरता येणार आहे. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. उत्पन्न वाढण्याचे योग आहेत. फक्त खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.
जर तुम्ही नोकरी करत असाल तर, नोकरीमध्ये तुमची कशी स्थिती असणार आहे. नोकरीमध्ये तुम्हाला संमिश्र परिणाम पाहायला मिळतील. म्हणजेच तुम्हाला प्रयत्न सर्वोत्तम करावे लागतील. आणि तरच तुम्हाला प्रगती दिसेल.तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला नशीब पूर्ण साथ देईल. फक्त प्रयत्न तुम्हाला करायचे आहे. वर्षाच्या सुरुवातीपासून तुम्ही तुमच्या कामात मेहनत घ्याल तर, भविष्यात तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल.
तुम्ही खाजगी क्षेत्रात नोकरी करत असाल तर, त्यात यश मिळवण्यासाठी तुम्हाला जर जास्त मेहनत करावी लागेल. पण तुमचे बॉस अर्थात तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाने २०२४ मध्ये प्रभावित होणार आहे.तुम्ही तुमच्या नोकरीच्या निमित्ताने घरापासून दूर सुद्धा जाऊ शकता. या क्षेत्रात परदेशात जाण्याची जर तुम्हाला इच्छा असेल तर तसे योग ही जुळून येतील.फक्त तुमचे सहकारी तुमच्या विरुद्ध काही कट करू शकतात. त्यामुळे संशय ज्या व्यक्तींबद्दल वाटतोय त्यांच्यावर लक्ष ठेवा.
आता तुम्ही नोकरीच करत नाही तुम्ही करता व्यवसाय तर मग व्यवसायात तुम्हाला नफा होणार आहे का…? तर व्यवसायात तुम्हाला २०२४ मध्ये चांगले परिणाम बघायला मिळतील. फक्त दुसऱ्याच्या कामात कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ करू नका आणि कोणतेही चुकीचे काम करू नका. कुठलेही चुकीचे काम तुम्ही यावर्षी केलं तर त्याचं नुकसान तुम्हाला होणार आहे. नवीन कामाची सुरुवात मात्र करू शकता. तुम्हाला जे काही मिळवायचे ते तुम्हाला नक्कीच या वर्षात मिळेल फक्त प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. व्यवसायात अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
पहिली घटना म्हणजे की तुमचं २०२४ मध्ये उत्पन्न वाढणार आहे. ही पहिली घटना तुमच्या आयुष्यात घडणार आहे. त्यानंतर तुम्हाला जर परदेशात जाण्याची इच्छा असेल तर तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर असाल तर तुम्हाला तसे योग सुद्धा २०२४ आयुष्यामध्ये येईल ही दुसरी घटना आहे.आता तिसरी घटना काय आहे ते बघूया. पण त्याआधी जाणून घेणार आहोत तुमचे वैवाहिक जीवन कसं असणार आहे.
यावर्षी तुमच वैवाहिक जीवन चांगल राहील. यावेळी तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर कराल. तुमच्या दोघांमध्ये समन्वय असेल. दोघांमध्ये प्रेमळ संवाद असेल. तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद भरेल. यावेळी मुलाच्या जन्माची संबंधित एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी मात्र घ्यावी लागेल कारण जोडीदाराचे आरोग्य बिघडण्याचे योग आहे.वर्षाच्या शेवटी तुमच्या जोडीदाराच्या आरोग्यात सुधारणा येईल. पण वर्षाच्या मध्ये मात्र तुमच्या जोडीदाराच आरोग्य बिघडू शकतं आणि त्यासाठी तुम्हाला काळजी घ्यायची आहे.
जे लोक शिक्षण घेत आहेत जे विद्यार्थी शिक्षण घेतात त्यांच्यासाठी २०२४ वर्ष कसं असणार आहे. तर परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी मेहनत करावी लागेल. अधिक प्रयत्न करावे लागतील.पण स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याचे योग आहे. उच्च शिक्षणासाठी हा काळ चांगला आहे. विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊ शकतात. परंतु त्यांनी कोणतीही परदेशी शैक्षणिक संस्था निवडताना हुशारी दाखवली पाहिजे. तज्ञांचा सल्ला, माहितगार व्यक्तींचा सल्ला घेतला पाहिजे. वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांचे अभ्यासापासून लक्ष अविचलित होऊ शकते.या काळात तुम्हाला तुमच्या अभ्यासात अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते.
परीक्षेबाबत थोडा तुम्हाला त्रास जाणवेल पण शिक्षणासाठी परिस्थिती मात्र चांगली आहे. परिश्रम करा यश तुम्हाला नक्कीच मिळेल. मन स्थिर ठेवण्यासाठी योग आणि ध्यानाचा अभ्यास तुम्ही करू शकता. सगळ्यात महत्त्वाच इंजीनियरिंग आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये म्हणजे मेडिकलचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष खास असणार आहे. त्यामुळे मेहनत करा. भाग्य तुम्हाला साथ देईलच. तर तिसरी घटना म्हणजे विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे. फक्त विद्यार्थ्यांनी अभ्यास मात्र करायचा आहे.
आता या तीन घटना तुमच्या आयुष्यात घडणार आहेत, पण काही समस्या सुद्धा येणार आहेत. आणि त्या समस्यांवर उपाय काय आहे हे पण जाणून घेणार आहोत.आणि तो उपाय करा म्हणजे त्या समस्यांना तोंड द्यायच बळ तुम्हाला मिळेल. मेष राशीच्या लोकांच आरोग्य जोरात चढ-उतारांनी भरलेल २०२४ मध्ये राहील. आपल्या आरोग्याबद्दल तुम्हाला गंभीर असण्याची आवश्यकता आहे. म्हणजेच आरोग्याच्या कुठल्याही तक्रारीकडे दुर्लक्ष मात्र करू नका. वर्षाच्या सुरुवातीला आरोग्य चांगलंच राहील. काही किरकोळ तणाव तुम्हाला जाणवेल पण बाकी आरोग्य चांगल राहील.
कामात ही तुम्हाला उत्साह वाटेल. पण वर्षाच्या मधल्या काळामध्ये तुम्हाला साधारण काही तक्रारी आरोग्याच्या उत्पन्न होऊ शकतात. आणि त्यामध्ये तुम्हाला डॉक्टरांकडे लगेच जायचे आहे. काही त्रास झाला तर तुम्हाला डॉक्टरांकडे लगेच जायचे आहे. पण पुढे वर्षाच्या शेवटी तुम्हाला आरोग्य उत्तम झाल्याचाही अनुभव येईल. मात्र तुम्हाला त्यासाठी काही पथ्य पाळावे लागतील. त्यासाठी चांगला सकस आहार करणे. स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण. काही वैयक्तिक समस्यांमुळे तुम्हाला जो मानसिक तणावाचा सामना करावा लागेल. त्यातून बाहेर पडण्यासाठी व्यायाम, ध्यान, प्राणायाम या गोष्टींची मदत घ्या.
नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये तब्येत सुधारेल आणि तुम्ही पुन्हा तंदुरुस्त व्हाल. पण आता ज्या काही समस्या तुम्हाला करिअरमध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये ज्या काही थोड्याफार समस्या २०२४ मध्ये येणार आहेत त्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी रोज सूर्याला जल अर्पण करायचं आहे आणि गायत्री मंत्राचा अकरा किंवा २१ वेळा जप करायचा आहे. त्याचबरोबर प्रत्येक मंगळवारी आणि बुधवारी संकट निवारण गणेश स्तोत्राचे पठण करायचे. शक्य असेल तर पिवळ्या वस्तूंच आणि पिवळ्या अन्नपदार्थाच जसं की हरभरा डाळ, मोहरी या वस्तूंचा दान करा.
त्याचबरोबर प्राणायाम, अनुलोम विलोम, ध्यान हे करायला सुरुवात करा. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल आणि चांगल्या आरोग्यासाठी चांदीच्या ग्लासातून पाणी प्या. यातला जो उपाय करणे तुम्हाला शक्य असेल तो करा करा पण नियमित करा.दोन दिवस केला चार दिवसांनी सोडून दिला असं करू नका. २०२४ वर्ष सुरू झालं की पहिल्या दिवसापासून यातला
कुठलाही एक उपाय करा जेणेकरून ज्या काही समस्या असतील त्या समस्या तमच्या प्रगतीच्या मार्गातल्या अडथळे उरणार नाहीत आणि २०२४ या वर्षी आनंददायी जाईल.
अशा प्रकारे मेष राशींच्या बाबतीत 2024 काही घटना या घडणार आहेत व काही समस्या देखील येणार आहे. व त्यांवर काही उपाय देखील या लेखातून आपण जाणून घेतलेला आहे. त्याप्रमाणे तुम्ही देखील त्याचा अवलंब करा.