मनाला झालेली जखम आयुष्य कसे जगायचे हे शिकवते ? मनाला स्पर्श करणारे सुंदर सुविचार ..!!

Uncategorized

मित्रांनो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये चढ-उतार हा येतोच असतो. या चढ-उद्धारामध्ये आपल्याला काही लोक साथ देतात तर काही लोक साथ सोडून देतात. परंतु ज्यांची आयुष्यभर आपल्याला साथ मिळत असते ते म्हणजे चांगले विचार आणि चांगले संस्कार. तसेच काही चांगले विचार आजच्या या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत.

 

प्रतिभा परमेश्वराकडून मिळते म्हणून परमेश्वरासमोर नतमस्तक राहा. प्रतिष्ठा समाजाकडून मिळते म्हणून समाजाचे आभारी रहा. परंतु मनवृत्ती व अहंकार स्वतःकडूनच मिळतो त्यापासून सावध राहा.

जेव्हा सर्व काही व्यवस्थित आहे हे तुम्ही जाणता तेव्हा तुम्ही शांततेने डोके मागे करून नक्कीच आकाशाकडे पाहता हाच खरा आनंद.

बरंच काही असण्यात आनंद नाही तर असलेल्या गोष्टी वाटण्यात आनंद आहे. कोणत्याही गोष्टी वाटल्याने आनंद कमी होत नसतो तर तो वाढतो.

मदत ही एक अशी गोष्ट आहे की केली तर लोक लगेच विसरतात आणि मदत नाही केली तर कायम लक्षात ठेवता.

रात्री शांत झोप येणे सहज गोष्ट नाही. त्यासाठी संपूर्ण दिवसभर प्रामाणिक असावे लागते.

पायाला झालेली जखम सावंत जपून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम आयुष्य ते कसे जगायचे हे शिकवत असते.

नाते सांभाळायचे असेल तर चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी आणि नाते टिकवायचे असेल तर नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी.

तुम्ही जर योग्य दिशेने वाटचाल करत असाल तुम्ही त्या दिशेने चालत राहिला हवं.

अशी कल्पना करा की जगातील प्रत्येक व्यक्ती ही तुम्हाला प्रकाश देत आहे त्यामध्ये तुमचे शिक्षक, मित्र मैत्रिणी प्रत्येक जण तुम्ही चांगलं कराव यासाठी मदत करत असतात.

भूतकाळात रमू नका आणि भविष्याची स्वप्न सतत पाहू नका वर्तमान काळात जगा आनंद म्हणजे प्रवास आहे.

प्रवासाचे शेवटचे ठिकाण नाही एक लहान मेणबत्तीचा प्रकाशही अंधार दूर करण्यासाठी खूप आहे

मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही बारीक असतात,

पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात..!

तुटले तर श्वासानेही तुटतील,

नाहीतर वज्राघातेनेही तुटणार नाहीत..!!

संवाद दोनच माणसांचा होतो, त्याच्यात

तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात..!!

कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं

कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे ..!

म्हणूनच खडक झिजतात प्रवाह रुंदावत जातो..!!

जाळायला काही नसलं तर पेटलेली

काडीसुद्धा आपोआप विझते..!!

खर्च झाल्याच दु:ख नसतं, हिशोब

लागला नाही की त्रास होतो..!!

प्रॉब्लेम्स नसतात कुणाला..? ते शेवटपर्यंत

असतात..! पण प्रत्येक प्राॅब्लेमला उत्तर हे असतंच.

ते सोडवायला कधी वेळ हवा असतो,

कधी पैसा तर कधी माणस..!या तिन्ही गोष्टी

पलीकडचा प्राॅब्लेम अस्तित्वातच नसतो..!!

आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात..!

वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा

अदमास घेता येत नाही. पण एका मुंगीने बाहेरचा

रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर

पडतात. आठवणींचही तसंच आहे..!

शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी

घाबरलेला असतो, बरा झाल्यावर

शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो..!!

घेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा देणार्‍याची ऐपत

नेहमीच कमी असते..!!

माणूस अपयशाला भीत नाही.अपयशाचं

खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर..?

याची त्याला भीती वाटते..!!

बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण

बोललेलं समोरच्यापर्यंत न पोचणं हि शोकांतिका

जास्त भयाण..!!

कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला

महत्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं

नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे.

पाण्यात राहायचे तर माश्यांशी नुसती मैत्री करून

भागत नाही तर स्वत:ला मासा बनावे लागते.

वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला

घट्ट रुजुन रहायचं असतं. ती जितक्या वेगाने

येतात तितक्याच वेगाने निघून जातात. वादळ

महत्वाचे नसते प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी

झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत

बाहेर येतो याचा.

भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,भूक आहे त्यापेक्षा

जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत:

उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती!

आपण किती पैसा मिळवला यापेक्षा, तो खर्च

करून आपण किती समाधान मिळवले, हे जो

पाहतो तो खरा आनंदी व्यक्ती असतो.

 

अशाप्रकारे हे काही सुंदर सुविचार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.