दुःखात शेवटी बायकोच साथ देते….. वाचून डोळ्यात पाणी येईल? हभप. शिवाजी महाराज वटंबे यांचा सुंदर लेख ……!!

Uncategorized

मित्रांनो, प्रत्येक बाईचं जीवन हे खूप खडतर असतो. म्हणून तुझा सन्मान करणे खूप गरजेचे आहे. ती आधी मुलगी म्हणून जन्माला येते आणि आपले जन्मदातांचे घर सोडून दुसऱ्या घरात जाते आणि आपले संपूर्ण आयुष्य आपल्या पतीसाठी समर्थक करतो. पतीची साथ शेवटपर्यंत ही बायकोच देत असते. म्हणून तिचा आदर करणे खूप महत्त्वाचे आहे. हे शिवाजी महाराज यांनी आपल्या एका वाक्य व्याख्यानातून सांगितलेले आहे. त्याची माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

 

आईच्या नंतर शेवटपर्यंत घरातील जी व्यक्ती आपल्याला साथ देत असते ती म्हणजे एकच व्यक्ती पत्नी. म्हणून ज्यांचे ज्यांचे जोडीदार निघून गेले आहेत त्यांना विचारा आपला जोडीदार नसण्याचे दुःख काय असते. जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत त्याला त्याच्या जोडीदाराची किंमत कळत नाही. परंतु जोडीदार ज्या दिवशी निघून जातो ना त्या दिवशी त्या माणसाला त्या जोडीदाराची असलेली किंमत कळते. माणूस एकटा पडतो. त्याला त्याची सुख दुःख विचारणारे कुणी नसते. त्यावेळी त्याला त्याच्या जोडीदाराची खूप आठवण येते. शेवटपर्यंत जी व्यक्ती साध्यत असेल तर ती व्यक्ती म्हणजे पत्नी आहे.

 

एखादी पत्नी आपल्या भागामध्ये लांब लचक सिंदूर भरते. त्याचा एकच उद्देश असतो की आपले जगण्याचे आयुष्य आपला पतीला मिळू दे आणि त्यासाठीच आपल्या भागामध्ये लांबलच सिंदूर भरत असते. ती जे काही उपास तपास करत असतील ते फक्त आपल्या मालकासाठी करत असते. आपलं संपूर्ण जीवन आपल्या पतीसाठी समर्पित करत असते. प्रत्येक गोष्टीत पतीचा विचार करणारी. प्रत्येक गोष्ट पतीसाठी करणारी. कायम त्याची आवड-निवड जपणारी. नेहमी त्याच्या बऱ्या वाईटाचा विचार करणारी. त्याच्या सुखामुळे सुखावणारी. त्याच्या दुःखामुळे गहिवरून जाणारी. त्याच्या वेदना स्वतः जाणून घेणारी. काटा त्याच्या पायात रुतावा आणि पाणी तिच्या डोळ्यातून यावे; एवढी आंतरिक भावनेने एक झालेली असते.

 

केवळ नजरेतून त्याच्या मनातले विचार, भावना समजून घेते. घरी यायला थोडासा उशीर झाला; तरी अधीर होते. आजारपणात अस्वस्थ होते. आपल्या संसारात, घरात, लेकरा बाळात, घरातल्या माणसात, एवढी रमते; स्वतःचे घर म्हणजे माहेर विसरते.पत्नी ही साधी व्यक्ती नसते. खऱ्या अर्थाने संसार म्हणजे तिच्यासाठी तपश्चर्या असते. मन लावून, देहभान हरपून, ती भक्तिभावाने हे तप करते.

 

आपल्या सुखदुःखापेक्षा, तिच्यासाठी घराचे सुखदुःख महत्त्वाचे असते. आपल्या आवडीनिवडी विसरून जाते; पण बाकी सगळ्यांच्या आवडीनिवडी जपते. पती वरचे प्रेम ही खऱ्या अर्थाने तिच्यासाठी भक्ती असते. याच भक्तिभावाने आयुष्यभर संसार फुलवते. लेकरांना जन्म

देते. त्यांचे पालन पोषण करते. त्यांच्यावर चांगले संस्कार करते. असेल त्या परिस्थितीमध्ये, वेळप्रसंगी आपल्या पोटाला चिमटा घेऊन लेकरांना मात्र लाडाकोडात वाढवते.

 

तिच्यासाठी स्वतःची हौस, मौज महत्वाची नसते. घरातल्याची मात्र प्रत्येक इच्छा पूर्ण करते. संपूर्ण आयुष्य समर्पित भावनेने जगते.पतीला देव म्हणते. त्याचा प्रत्येक शब्द पाळते. त्याची मर्जी सांभाळते. मन प्रसन्न ठेवते. मानसिक, भावनिक बळ देते. कायमस्वरूपी भरभक्कम आधार देते. अडीअडचणीत संकटात खंबीर बनवते. पतीसाठी आणि आपल्या संसारासाठी वाटेल ते करण्याची तिची तयारी असते. तिच्यासाठी आपले घर आणि संसार हेच जग असते.

 

आपल्या संसारात ती एवढी मनोभावे रमते; की कधीकधी आपले आजारपण सहज अंगावर काढते. खरेच पत्नी अजब रसायन असते. संपूर्ण अर्थाने आयुष्याचा, जीवनाचा ‘जीवनसाथी’ असते. जगण्याचा आधार आणि दिशाही तीच असते. म्हणून आपण आपल्या पत्नीचा सन्मान हा करायला हवा. आपण प्रत्येकाला सुखी ठेवण्याचा विचार करत असतो. परंतु जे आपल्या आयुष्यामध्ये फक्त आपल्या नवर्‍यासाठी जगत असतील तर त्यासाठी आपल्याला संध्याकाळी एक पाच ते दहा मिनिटे तरी काढलेच पाहिजे.

 

अशाप्रकारे शेवटपर्यंत साथ देणारी ही बायकोच असते.

Leave a Reply

Your email address will not be published.