मित्रांनो, आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य धोरणामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला आहे ज्या चांगल्या जीवन जगण्यासाठी उपयुक्त ठरतात. चाणक्य धोरणात नमूद केलेल्या धोरणांचे पालन केल्यास माणूस यशाची शिडी चढू शकतो आणि फसवणूक टाळू शकतो. आचार्य चाणक्य म्हणतात की, माणसाने आपल्या जीवनात नेहमी काही गोष्टी लपवून ठेवाव्यात. त्यांचा उल्लेख चुकूनही कुणासमोर करू नये. कारण यामुळे तुमचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. चला जाणून घेऊया कोणत्या गोष्टी नेहमी गुप्त ठेवल्या पाहिजेत. याचीच माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
त्यातील पहिली गोष्ट म्हणजे घरातल्या कुटुंबातील गोष्टी चाणक्य नीतीनुसार आपल्या घराचे रहस्य कोणालाही सांगू नये. आपण कितीही त्रस्त असाल तरीही आपल्या घरातील दोष कोणालाही सांगू नका. घरातील रहस्य इतरांना सांगितल्याने शत्रू त्याचा फायदा घेऊ शकतात.कुणीही कुटुंबातील सदस्यांच्या वाईट गोष्टी इतरांसमोर मांडू नयेत. जर एखाद्या सदस्यामध्ये काही कमतरता असेल तर त्याबाबतदेखील कोणालाही सांगू नये. जेव्हा कुटुंबातील वाईट गोष्टी इतरांना समजतात तेव्हा कौटुंबिक उपहास होतो, ज्यामुळे आपल्या सन्मानाला ठेस पोहोचते.
दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे उत्पन्न. तुमची किंवा तुमच्या कुटुंबाची कमाई आणि संपत्तीशी संबंधित माहिती कधीही कुणालाही उघड करू नये. कारण यामुळे लोक तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात. तुमची आर्थिक स्थिती कशीही असेल, पण कोणाच्याही समोर सांगता कामा नये.
तिसरी गोष्ट भूतकाळातील चुका आणि भविष्य काळातील रणनीती जर तुम्ही भविष्यात यशस्वी होण्याची प्लॅन असाल तर लक्षात ठेवा की याबद्दल तुमच्या कुटुंबाशिवाय इतर कोणालाही सांगू नका. कारण अनेकांना यशस्वी व्यक्तीचा हेवा वाटतो आणि त्याच्या मार्गात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच तुमच्या नियोजनाबद्दल कोणालाही सांगू नका. त्याचबरोबर आपल्या ज्या काही भविष्यामध्ये चुका झालेला असतात त्या इतरांसमोर बोलू नये. कारण त्यामुळे लोक आपल्याला खालीपणा दाखवण्याचा प्रयत्न करतात.
चौथी गोष्ट म्हणजे आपली कमजोरी आणि ताकत आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार, भावनांनी वाहून जाऊन कधीही कोणाच्याही समोर आपली कमजोरी व्यक्त करू नये. कारण तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊन लोक संधी मिळताच तुमचे नुकसान करू शकतात. म्हणूनच तुमची कमजोरी स्वतःपुरती मर्यादित ठेवणे चांगले.
पाचवी गोष्ट म्हणजे तुमचे अपमान. आपला अपमान आपल्याजवळ राहू द्या. लोकांना थट्टा मस्करी करायला विषय देऊ नका. झालेल्या अपमानातून बोध घ्या. स्वतःमध्ये उचित बदल करा, परंतु सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नका. कारण त्या अपमानाचा लोकर फायदा घेऊन आपली चेष्टा करू शकतात व आपल्याला आणखीन खाली दाखवण्याचा प्रयत्न करू शकतात त्यामुळे आपला आणखीनच अपमान होतो.
सहावी गोष्ट म्हणजे आपल्या मनातील गोष्ट आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी या चालूच असतात. परंतु आपल्याला जर एखाद्या वस्तूचा राग येत असेल किंवा एखादा गोष्टीची क्यूव येत असेल, किंवा ज्यामुळे तुम्हाला एखाद्या गोष्टीचा संताप होत असेल अशा गोष्टी कोणालाही सांगू नये. ज्यामुळे लोक आपल्या त्याच गोष्टीला पुढाकार देतात व आपला कसलेल्या चांगला गोष्टींना ते पुढाकार देत नाहीत आणि यामुळेच लोक आपली खिल्ली उडवण्यात मागे पुढे पाहणार नाहीत.
सातवी गोष्ट म्हणजे दान धर्माच्या गोष्टी. आपण अनेक प्रकारचे दानधर्म करत असतो किंवा एखाद्या व्यक्तीला मदत करत असतो हे खूप पुण्याचे काम आहे. परंतु जर आपण हे केलेले पुण्याचा काम इतरांना सांगत बसलो तर त्या मागचे केलेले फळ हे आपल्याला मिळत नाही. त्यामुळे आपण केलेले दानधर्म हे गुप्तच ठेवावे ते कोणालाही सांगू नये.
अशाप्रकारे या काही गोष्टी आहेत ज्या आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या आहेत की त्या कोणालाही सांगू नयेत.