सासूने सुनेशी कसे वागावे? असे वागल तर घरामध्ये अजिबात वाद होणार नाहीत ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो प्रत्येक सासूने आपल्या घरी येणारी सून असते तिला आपली लेक मानावे आणि तिला आईप्रमाणे माया करावी सून घरी आली की सासूबाईंनी थोडी माघार घ्यायला शिकावी घरातील कोणतेही काम मला विचारूनच तिने करावे अशी अपेक्षा करू नये प्रत्येक सासूने सुनेचा तिरस्कार करू नये तुम्ही थोडे वेळाने मोठे आहात तुम्ही अनुभवी आहात म्हणून तुम्ही तिला आईसारखी माया द्या सून घरी आली की सासूबाईंचा एक गैरसमज होतो की मुलगा आपला सर्व काही त्याच्या बायकोचं ऐकतो तर असे नसते थोडेफार नवीन लग्न झालेल्या लेकाला आणि सुनेला समजून घ्यायला शिका.

 

सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सुनेची बाहेर जाऊन निंदा करू नका आपल्या घरातील भांडणे बाहेर जाऊन सांगू नका सुनांविषयी आपल्या मुलाच्या मनात गैरसमज निर्माण करू नका सुनेला आणि आपल्या मुलाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू नका असे केल्याने ते तुमच्यापासून जास्त दूर जातील सुनेला सतत हे काम कर ते काम कर अशी किटकिट ती तिला समजावून सांगा थोडा वेळ लागेल पण सर्व काही होऊन जाईल

 

आताच्या काळामध्ये सरास मुली शिकलेल्या आहेत त्या जॉब करतात त्यामुळे त्यांच्या घरातील कामात थोडी गैरसोय होत असेल तर थोडं समजून घ्या की जॉब करते म्हटल्यावर तिला घर कामात थोडी मदत करा सुनबाईला तिच्या कामात ढवळाढवळ आवडत नसेल तर सासूबाईंनी शांतपणे नातवंडामध्ये आपला वेळ घालवावा जेणेकरून वाद होणार नाहीत सासूबाईंनी सुनील आणि आपल्या मुलाला समजून घेतलं पाहिजे आणि संसारामधून आता आपली निवृत्ती घेऊन सर्वांचीच प्रेमाने वागले तर घरामध्ये वाद होत नाहीत .

 

प्रत्येक सासू ने माझी सून चांगली हे जर ध्येय वाक्य ठेवले तर त्या सासूला आयुष्यात काहीही कमी पडणार नाही जे काही आहे तुझेच आहे तुला जसे करावे वाटेल तसे कर असे सतत तिला सांगत राहायचे आहे सुनेच्या सतत विरोधात गेला तर तुम्ही ज्याला लहानाच मोठे केलं असं तुमचा मुलगा तुमच्या पासून दुरावणार आहे कारणे का मुलाला आई आणि बायको समान असतात फक्त गैरसमज नकोत पूर्वी आम्ही असे करत होतो आम्ही खूप बचत करत होतो .

 

आम्ही एवढे काम करत होतो आम्ही असा संसार केला मुक्त होऊन पूर्वीच्या गोष्टी सांगू नका आता कलियुग आहे विचार बदलले तुमचे पूर्वीचे विचार वेगळे आताचे वेगळे तेच तुमच्या सुनेला पटणार नाही त्यामुळे पूर्वीच्या झालेल्या गोष्टी तिला पुन्हा पुन्हा सांगायच्या नाहीत मित्र-मैत्रिणींना प्रत्येक ठिकाणी काही सासू वाईट नसते काही ठिकाणी सासू आपल्या सुनेला लेखी प्रमाणे जीव लावत असते आणि वागणूक देखील देत असते पण काही ठिकाणी सासूबाई खूप वाईट वागणूक सुनेला देत असतात .

 

सुनेचा खूप छळ करतात तिच्या भावनांशी खेळतात तिला सतत अशी जाणीव करून देतात की या घरात तुझं कोणतं स्थान नाही आपल्या आई वडील आपले घरदार सोडून आलेल्या एका मुलीला सासूबाईंनी परकेपणाची जाणीव कधीच करून देऊ नये उदाहरणात जरी घरामध्ये वाद होऊ लागले तर त्या वादात ते हे घर माझे आहे हा मुलगा माझा आहे हे सर्व काही प्रॉपर्टी माझी आहे असे सतत तिला म्हणायचे नाही एक विनंती आहे की प्रत्येक सासूबाईंनी आपल्या सुनेला मुलीचा दर्जा द्यायचा आहे मग सुनेचेही कर्तव्य आहे की आपल्या सासूला आई हे मांनले पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published.