हे ७ संकेत समोरचा देत असेल तर समजून जा? समोरचा तुमच्या प्रेमात पडला आहे …!!

Uncategorized

मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये एखादी व्यक्ती आपल्याला खूप आवडत असतील. परंतु आपण तिला हे बोलवून दाखवणार नाही की, ‘तू मला खूप आवडतेस!’ आणि त्यामुळे वेळ निघून जाते आणि कालांतराने जेव्हा ती व्यक्ती पुन्हा आपल्याला भेटते तेव्हा तिच्याकडून आपल्यालाही कळते की तिला देखील आपण आवडत होतो. परंतु ती वेळ निघून गेलेली असते. असे तुमच्या बाबतीत होऊ नये म्हणून आज आपण असे काही साथ संकेत पाहणार आहोत. की जे संकेत जर आपल्याला समोरच्या व्यक्तीकडून मिळत असतील तर आपण समजून जावे की ती व्यक्ती तुम्हाला सांगू इच्छित आहेत की तुम्ही तिला आवडता!.

 

जर एखाद्या व्यक्तीला तुम्ही आवडत असाल तर नक्कीच ती तुम्हाला काही संकेत देण्याचा प्रयत्न करत असते. परंतु ते संकेत आपल्या लक्षात येणे खूप गरजेचे असते. हे आपल्या बाबतीत आपल्या शाळा, कॉलेज किंवा ऑफिसमध्ये घडू शकते. आज आपण संकेत पाहणार आहोत ते संकेत मानसशास्त्रामध्ये सिद्ध करण्यात आलेले आहेत. अनेक मोठमोठ्या शास्त्रज्ञानाने हे सिद्ध देखील करून दाखवले आहे.

 

त्यातील पहिला संकेत म्हणजे ते तुमच्याशी जास्तीत जास्त जवळीक साधण्याचा प्रयत्न करते. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला आवडत असेल तर ती व्यक्ती तुमच्या जास्तीत जास्त जवळ येण्याचा प्रयत्न करेल. म्हणजेच तुमच्या हातात हात घेण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला चिटकून बसेल. तुमच्या खांद्यावर हात टाकून बसेल. हा मानवी स्वभावाचा एक घटक आहे की जी आपली एखादी व्यक्ती आवडली की आपण त्या व्यक्तीशी जास्त जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो. तिच्या हाताला हात घालून बसण्याचा प्रयत्न करत असतो. तिला भावनिक आधार देण्याचा प्रयत्न करतो. याउलट जर आपल्याला एखादी व्यक्ती आवडत नसेल तर तिच्यापासून आपण जास्तीत जास्त लांब राहण्याचा प्रयत्न करत असतो. कोणत्याही प्रकारची जवळी त्या व्यक्तीपासून आपण साधत नाही.

 

दुसरा संकेत म्हणजे ते वेगवेगळे विषय काढून तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतात. जर तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत असेल तर नक्कीच तुम्ही त्या व्यक्तीशी जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न करता. वेगवेगळ्या विषयांवर तुम्ही बोलतच राहाल. तुम्हाला असं वाटत असते की त्या व्यक्तीसोबतचे आपले बोलणे संपूच नये. आपण त्या व्यक्तीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवावा आणि बोलता बोलता आपण त्या व्यक्तीबद्दलचा सर्व इच्छा, आकांक्षा, त्यांचे स्वप्न, त्यांच्या आवडीनिवडी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो.

 

तिसरा संकेत म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच पण मनापासून केलेले एक हास्य दिसेल. आपल्याला आवडणारी व्यक्ती अचानकपणे किंवा कोणत्याही कारणांनी आपला समोर आली तर तिला पाहून आपल्याच चेहऱ्यावर एक वेगळाच प्रकारचे स्माईल निर्माण होते. स्माईल वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. परंतु ही स्माईल खूप वेगळ्या असते. ज्याने तुमच्या चेहऱ्यावर मनापासून आनंद झाल्याचा दिसत असतो.

 

चौथा संकेत म्हणजे ते तुमच्या सोबत असताना थोडे नर्वस असतात. जर एखाद्या व्यक्तीला तुम्ही आवडत असाल किंवा तुम्हाला कुठली एखादी व्यक्ती आवडत असेल तर त्या व्यक्तीसोबत असताना तुमच्यामध्ये एक नर्वस असतो. कारण ज्या व्यक्तीवर आपण खूप मनापासून प्रेम करत असतो किंवा ती व्यक्ती आपल्याला आवडत असते. त्या व्यक्ती सोबत असताना एक वेगळीच ऊर्जा आपल्या शरीरामध्ये निर्माण होते. आणि त्यामुळे आपल्याला हा नर्वसपणा निर्माण होत असतो. जर तुम्ही कोणत्या व्यक्तीसोबत असताना तुमच्या मनामध्ये नरवस पणा निर्माण होत असेल व तुम्ही काहीही बडबडत असाल तर समजून जा की तुम्ही तुम्हाला ती व्यक्ती खूप आवडत आहे.

 

पाचवा संकेत म्हणजे त्यांना तुमच्याबद्दल प्रचंड कुतूहल असते. जर एखाद्या व्यक्तीला एखादी व्यक्ती आवडत असेल तर ती व्यक्ती त्या व्यक्तीबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यास खूप उत्सुक असते. कारण त्या व्यक्तीबद्दलची संपूर्ण माहिती तुला जाणून घ्यायची असते आणि त्यासाठी ती तुम्हालाच नाही तर तुमच्या मित्रांना तुमच्याबद्दलच्या सर्व काही माहिती विचारून घेत असते. तुमच्याबद्दलची प्रत्येक गोष्ट माहित असावी असे वाटत असते आणि त्यामुळे ती तुमच्याबद्दलची एक आणि एक गोष्ट सर्व काही माहित तुम्ही करून घेत असतात.

 

सहावा संकेत म्हणजे ते तुमची प्रमाणापेक्षा जास्त स्तुती करत असतात. जर एखाद्या व्यक्तीला तुम्ही आवडत असाल तर नक्कीच ती व्यक्ती प्रत्येक गोष्टीमध्ये तुमची स्तुती करत असते. तिला तुमची प्रत्येक गोष्ट ही आवडत असते. त्यामुळे ती प्रत्येक गोष्ट तुमची किती चांगली आहे हे सांगत असते. जसे तुम्ही किती छान दिसतात, तुमचे कपडे किती चांगले आहेत. अशा प्रकारचे अनेक गोष्टी त्या व्यक्ती तुमच्याशी बोलत असतात. तर असे झाले असेल तर नक्की समजून जा की ती व्यक्ती तुमच्याकडे खूप आकर्षित झाले आहे.

 

सातवा संकेत म्हणजे ते नेहमी तुमच्यासाठी वेळ काढतात. जर एखादी व्यक्ती तुमच्यासाठी वेळातला वेळ अनमोल वेळ तुमच्यासाठी काढत असेल, कशाचेही फिकर न करता जर तुम्ही तिला बोलवले तर ते नाही न म्हणता लगेच येत असेल. तर समजून जा की ती व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित झालेली आहे. कारण आपण त्याच व्यक्ती सोबत आपला वेळ घालवत असतो ची व्यक्ती आपल्याला खूप आवडत असते आणि कोणतेही कारण न देता आपण त्या व्यक्तींनी बोलवले असेल तर लगेच जातो.

 

अशा प्रकारे हे काही सात संकेत आहेत ज्याद्वारे तुम्हाला समजेल की समोरची व्यक्ती तुमच्या प्रेमात पडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.