मित्रांनो, स्वामींच्या चमत्काराचा अनुभव अनेक जणांना आलेला आहे. स्वामी त्यांच्या वाईट काळामध्ये त्यांना कोणता ना कोणता रूपामध्ये भेटतात व मार्ग दाखवत असतात किंवा नुसता त्यांचे नामस्मरण केल्याने देखील आपल्याला त्या वाईट काळातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळत असतो. स्वामी हे आसे आहेत की ते आपल्या भक्ताला कधीही एकटे सोडत नाही.
त्यांच्या वाईट काळात ते सतत त्यांच्या पाठीशी असतात. स्वामींच्या चमत्काराची गोष्ट आपण खूप वेळा ऐकलेली आहेच. परंतु आज आपण एका अशा भक्ताची चमत्कारिक अनुभव पाहणार आहोत की, त्यांनी स्वामींचा कसल्याही प्रकारची आठवण नव्हती. त्या लहानपणी स्वामींच्या मठात जात होत्या. त्यावर त्यांचा कसल्याही प्रकारचा संबंध आला होता. त्यांच्या वाईट काळात स्वामींनी त्यांना कशा प्रकारे मदत केली व त्यांचा वाईट कसा सरला.
मोठे कलाकार लक्ष्मीकांत बेर्डे हे तर तुम्हाला सर्वांना माहित असेल. यांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने म्हणजेच प्रिया बेर्डे यांनी आपल्या वाईट काळामध्ये स्वामींचा त्यांना साथ कशी मिळाली, त्यांच्यावरील वाईट का कशाप्रकारे सरला, स्वामींचा त्यांना चमत्कार कशाप्रकारे मिळाला व स्वामी त्यांना कशाप्रकारे मदत करतात. या सर्वांची त्यांनी आपल्याला माहिती सांगितलेली आहे तीच माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
प्रिया बर्डे असे म्हणतात की, त्या खूप लहान असल्यापासून त्यांच्या आजी त्यांना दादरमध्ये असलेला स्वामी समर्थांच्या मठामध्ये घेऊन जात असत. परंतु काही काळामध्ये ते स्वामींच्या पासून दूर गेले म्हणजे त्यांचा स्वामींची इतका कॉन्टॅक्ट आला नाही. त्या काळात प्रिया बेर्डे या साईबाबा शी खूप जवळ आल्या. म्हणजेच त्या काळात ते साईबाबांचे नामस्मरण, त्यांच्या पोथी वाचणे, त्यांच्या ग्रंथ वाचणे, सतत शिर्डी जाणे अशाप्रकारे ते साई भक्त झाल्या.
त्यानंतर काही काळ गेल्यानंतर त्यांच्या वर खूप वाईट परिस्थिती आली आली. या काळात त्यांना काय करायचे ते सूचना असे झाले. कारण त्यांच्या पतीचा देखील मृत्यू झाला होता. हा काळ त्यांच्यासाठी खूप वाईट होता. या काळातच त्यांच्याकडे कोणताही प्रकारचे काम देखील नव्हते. त्यामुळे आर्थिक टंचाई खूप मोठी जाणवत होती. त्यांना त्यांच्या घरातील घर खर्च काढणे, तसेच मुलांच्या शाळेची फी तसेच इतर खर्च त्यांना कसा काढावा हे कळत नव्हते.
कारण त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे कामच नसल्यामुळे त्यांना आर्थिक रित्या दुर्बल झाल्यासारखे वाटत होते. यावेळी काय करावे हे त्यांना सुचत नव्हत. त्या खूप अस्वस्थ झाल्या होत्या व रडू लागला. त्यावेळी त्यांना अचानकपणे त्यांच्या आजीने नेत असलेल्या दादरच्या स्वामी समर्थ मठातील स्वामींचा फोटो त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर आला. यावेळी त्यांच्या मनामध्ये कसलाही प्रकारचे स्वामींची भावना देखील नव्हती.
परंतु अचानकपणे त्यांना स्वामी महाराज दिसले. ते त्यावेळी देखील रडतच होता.
त्यांना काय करावे काय कळतच नव्हते आणि स्वामींचा हा फोटो त्यांना का दिसत आहे? हे देखील त्यांना माहीत नव्हते. याचवेळी अचानकपणे एक त्यांना फोन आला व त्यांनी तो फोन उचलला. तो फोन अक्कलकोट येथून आला होता. ते असे म्हणाले की, अक्कलकोट मध्ये असा असा एक कार्यक्रम आहे आणि यामध्ये तुम्हाला यायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला एवढे मानधन देखील दिले जाईल.असे त्यांनी म्हणून तू फोन कॉल ठेवला. यावेळी प्रिया बेर्डे यांना खूप आश्चर्यचकित वाटले की, अचानकपणे स्वामींचा फोटो काय त्यांच्या डोळ्यासमोर आला आणि हा फोन कॉल मुळे त्यांना एक काम देखील मिळाले.
म्हणजे त्यातून त्यांना मानधन मिळणार होते व त्यांचे आर्थिक अडचण दूर होणार होते. यावेळी त्यांनी हात जोडून स्वामींना प्रार्थना केली की, कोणतीही परिस्थिती असो त्या दरवर्षी नक्कीच अक्कलकोटच्या दर्शनाला येतील. असे म्हणून त्यांनी स्वामी महाराजांना मनापासून नमस्कार केला.त्यानंतर त्यांच्या सर्व अडचणी दूर झाला. आजपर्यंत त्या स्वामी कोणत्याही अडचण असो किंवा कोणतेही सुख असो त्यांच्या मुखांमध्ये सतत स्वामींचे नावे असत.
अशा प्रकारे स्वामी आपला भक्तांना कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये एकटं सोडत नाही. म्हणून स्वामींची कृपा आपल्यावर असणे खूप गरजेचे असते. स्वामींचे अत्यंत मनोभावाने आणि भक्तीने पूजा करत चला. त्यांची सेवा करा. नक्कीच तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये ते एकट्याला सोडणार नाही. सतत ते तुमच्या पाठीशी राहतील.
अशा प्रकारे प्रिया बेर्डे यांनी आपला अनुभव स्वामींचा चमत्कार त्यांच्या जीवनामध्ये कसा आला हे त्यांनी सांगितले आहे.