पोस्ट ऑफिस PPF खाते : बारा हजार जमा करून तुम्हाला मिळणार चाळीस लाख मिळवा : कर्ज सुद्धा मिळते : वाचा सविस्तर …!!

Uncategorized

मित्रांनो आज आपण पीपीएफ खात्याविषयी सविस्तर माहिती येथे जाणून घेणार आहोत. पी पी एफ खाते म्हणजे प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच भविष्य निर्वाह निधी असे म्हटले जाते. केंद्र सरकारच्या या योजनेला विशेष महत्त्व आहे. कारण ही योजना सरकारने अगदी सर्वसामान्य माणसाला गृहीत धरून चांगल्या पद्धतीने बनवली आहे.

 

या योजनेमध्ये म्हणजेच पीपीएफ खाते किंवा भविष्य निर्वाह निधी यामध्ये आपले खाते आपले नाव नोंदणी करण्यासाठी आपणाला आपल्या जवळच असलेल्या पोस्ट ऑफिस मध्ये किंवा कोणत्याही बँकेमध्ये जाऊन माहिती आपण घेऊ शकतो. आणि खाते काढणे किंवा नाव नोंदणी करणे हे देखील करू शकतो.

 

या योजनेचा फायदा हा सर्वसामान्य म्हणजे असंघटित रित्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना होतो. या योजनेमध्ये आपण जे पैसे गुंतवतो त्याला साधारणतः सध्या 7.1 टक्का व्याजदर मिळतो. या योजनेमध्ये कोणीही खाते काढू शकते. लहान मुले असतील अठरा वर्ष अजून पूर्ण झाली नसतील तर अशा व्यक्तींचे पालक देखील हे खाते काढू शकतात.

 

या योजनेमध्ये साधारणपणे पंधरा वर्षे पैसे गुंतवले जातात. आणि जे पैसे आपण म्हणतो तो त्यासाठीची जी रक्कम आहे ती कमीत कमी रुपये पाचशे आणि जास्तीत जास्त रक्कम आहे ती दीड लाख इतकी आहे. आणि ही आपली रक्कम आपण कधीही भरू शकता. मात्र जी रक्कम तुम्ही निर्धारित केली आहात ती रक्कम त्या त्या वर्षाच्या आत जर आपण नाही भरला तर आपले खाते बंद देखील होऊ शकते.

 

जे लोक या खात्यामध्ये पैसे गुंतवतात आपली बचत करतात तसेच आपला भविष्य निर्वाह निधी म्हणून याकडे पाहत पैसे गुंतवतात अशा सर्वच गुंतवणूकदारांना इन्कम टॅक्स विभागाकडून रुपये दीड लाखापर्यंतची सवलत दिली जाते.

 

मित्रांनो इतकच नाही तर आपण जी रक्कम इथे भरतो त्या रकमेवर आपल्याला कर्ज देखील दिले जाते. सुरुवातीला एक वर्षाच्या आत आपणाला कुठल्याही प्रकारची कर्ज काढता येत नाही मात्र एक वर्षानंतर आपली जेवढी रक्कम जमा असेल त्या पटीत त्या रकमेवर आपणाला कर्ज देखील काढता येते.

 

आणि हे काढलेले कर्ज फेडण्यासाठी आपणाला साधारणपणे 36 महिन्याची म्हणजेच तीन वर्षाची मुदत मिळते यासाठी व्याजदर एक टक्का किंवा अधिक असू शकतो. आणि आपणाला किती वर्षे किती रक्कम भरल्यानंतर किती टक्के व्याजदर मिळते आणि त्याची रक्कम किती होते. याबाबत पीपीएफ कॅल्क्युलेटर असे गुगलवर सर्च केल्यास काही वेबसाईट मिळतील त्याद्वारे तुम्ही या रकमाचे अंदाज बांधू शकता.

 

साधारणपणे तुम्ही दीड लाख रुपये ही रक्कम पंधरा वर्षे या खात्यात भरला तर त्याची तुमची पंधरा वर्षाची रक्कम रुपये 22 लाख 50 हजार रुपये इतके होते आणि त्यावर 7.1% हे व्याज मिळाल्याने व्याजाची रक्कम अधिक तुम्ही भरलेली रक्कम असे मिळून एकूण तुम्हाला 40 लाख रुपये प्राप्त होतात.

 

मित्रांनो आर्थिक बाबतीत या उदाहरणाद्वारे काही अंदाज आपल्याला आला नसल्यास किंवा यापेक्षा अधिक माहिती हवी असल्यास आपण आपल्या जवळ असलेल्या कोणत्याही पोस्ट ऑफिसला भेट देऊन याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता. अथवा आपल्या जवळ असलेल्या कोणत्याही राष्ट्रकुल बँकेत याबद्दल चौकशी करून माहिती घेऊ शकता.

 

मित्रांनो आम्ही पुन्हा एकदा येते सांगू इच्छितो की भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ अकाउंट हे प्रत्येकाचे असणे गरजेचे आहे. कारण जी मंडळी असंघटित रित्या काम करतात अशा प्रत्येक लोकांसाठी ही योजना म्हणजे आर्थिक दृष्ट्या एक कवच कुंडल म्हटले तरी वावगे ठरणार नाही. असा फायदा आपणाला या योजनेमुळे मिळतो.

 

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे.अशाच महत्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.