मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांचे दात हे किडलेले आपल्याला पाहायला मिळते. आजकाल तर खूप जणांना दात किडण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. तसेच अनेकांना दात दुखीची समस्या देखील उद्भवते. तसेच अनेकांचे दात हे पिवळे पडलेले पाहायला मिळतात. अनेकांच्या दातातून उग्र असा घाण वास देखील येत असतो. तर या सर्वांवरती आज मी तुम्हाला एक घरगुती उपाय सांगणार आहे हा जर घरगुती उपाय तुम्ही केला तर यामुळे तुमचे दात आहेत हे दात दोन मिनिटात मोत्यासारखे चमकणार आहेत आणि या उपायासाठी आपणाला जास्त खर्चही करावा लागणार नाही.
आपण आपल्या दात दुखीच्या समस्येवर किंवा दात किडल्यानंतर आपण अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतो. अनेक प्रकारच्या ट्रीटमेंट देखील करीत असतो आणि त्यावरती आपला भरपूर पैसा देखील खर्च होतो. तरी देखील आपल्या दातांची समस्या सुटता सुटत नाहीत. तर हा घरगुती उपाय तुम्ही जर केला तर यामुळे तुमच्या या दात दुखीच्या समस्येवर तसेच दात किडण्याच्या समस्येवर तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे.
तर यासाठी तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे आणि या वाटीमध्ये तुम्हाला एक चमचा हळद घ्यायची आहे आणि एक चमचा हळद घेतल्यानंतर तुम्हाला अर्धा चमचा मीठ घ्यायचा आहे आणि हे मीठ बारीक मीठ घ्यायच आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक लिंबू कापून घ्यायचा आहे आणि अर्धा लिंबू अगोदर पिळून घ्यायचा आहे आणि नंतर अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे.
म्हणजेच एक लिंबू तुम्हाला या हळद आणि मिठामध्ये त्या लिंबूचा रस घालायचा आहे आणि व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये आपण जी टूथपेस्ट वापरतो मग ती कोणतीही तुम्ही टूथपेस्ट वापरत असाल तर ती टूथपेस्ट तुम्हाला अर्धा चमचा त्या मिश्रणामध्ये घालायचे आहे आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला रोज वॉटर हे एक चमचा घालायचे आहे.
हे व्यवस्थित मिश्रण अगोदर मिक्स करून तुम्हाला घ्यायचे आहे आणि नंतर तुम्ही ब्रशच्या सहाय्याने आपले दात घासायचे आहेत. म्हणजेच हे मिश्रण तुम्ही दोन मिनिटे तरी हे मिश्रण आपल्या दातावर राहील अशा पद्धतीने तुम्ही ब्रश करायचा आहे आणि नंतर तुम्ही आपले दात धुवू शकता.
मित्रांनो हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा जर केला तर यामुळे नक्कीच तुमच्या दात दुखीच्या समस्येपासून आराम मिळेल. तसेच जी काही दात किडण्याची समस्या असेल म्हणजे दाताच्या वेदना होत असतील त्या देखील कमी होतील आणि जो दातांवरचा पिवळसरपना आहे तो देखील नक्की कमी होणार आहे. त्यामुळे असा हा घरगुती उपाय तुम्ही एक वेळ आवश्य करा. यामुळे तुमचे दात हे मोत्यासारखे चमकणार आहेत.