रात्री बेडरूममध्ये गेल्यानंतर नवरा- बायकोमध्ये जे होणे गरजेचे आहे ते झालेच पाहिजे. त्याशिवाय दोघांमधील प्रेम टिकून राहणार नाही. वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध करायचे असेल तर नवरा बायकोने काही गोष्टी रोज रात्री करायलाच हव्यात. त्यामध्ये टाळाटाळ करू नये. कितीही थकवा जाणवत असेल तरी काही गोष्टी रोज रात्री केल्याच पाहिजेत.
तुम्ही जर यामध्ये टाळाटाळ केली तर तुमचे वैवाहिक जीवन धोक्यात येऊ शकते. आचार्य चाणक्यांनी सुद्धा वैवाहिक जीवनाबद्दल काही महत्त्वाचे सल्ले दिलेले आहेत. पती- पन्नीने काय करावे आणि काय करू नये हे आचार्य चाणक्यांनी चाणक्यनीतीमध्ये सविस्तर सागितलेले आहे. आचार्य चाणक्यांच्या मते पती- पन्नीने दररोज रात्री झोपण्यापूर्वी 5 कामे अवश्य करावीत.
ही 5 कामे जर तुम्ही रोज रात्री केली तर तुमचे वैवाहिक जीवन सुखी आणि समाधानी होईल. तुम्हाला कोणीच एकमेकांपासून दूर करू शकणार नाही. म्हणूनच आजच्या या लेखात आपण चाणक्यनीतीमध्ये सागितलेले सुखी वैवाहिक जीवनाचे 5 मंत्र सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
1. रात्रीचे जेवण एकत्र कराः- दिवसा कामानिमित्ताने बाहेर जावे लागते त्यामुळे एकत्र बसून जेवण करणे शक्य नसते. परंतु नवरा- बायकोने रात्रीचे जेवण एकत्र बसून करावे. जर शक्य असेल तर दोघांनी एकमेकांना आपल्या हाताने भरवावे. असे केल्याने दोघांमध्ये प्रेम टिकून राहते. इतकेच नाही तर एकमेकांप्रती सन्मान आणि आत्मविश्वासही वाढतो.
2) जोडीदाराकडे लक्ष द्याः- जोडीदाराच्या इच्छेकडे कधीच दुर्लक्ष करू नका. असे केल्याने तुमच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशी चूक होणार नाही याची काळजी घ्यावी. काही कारणामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराची एखादी इच्छा पूर्ण करू शकत नसाल तर ते नम्रपणे सांगा.
3) एकमेकांसोबत गप्पा माराः- नवरा- बायकोने रात्री झोपण्यापूर्वी एकमेकांसोबत थोड्या तरी गप्पा मारून मगच झोपावे. यामुळे दिवसभराचा थकवा कमी होण्यास मदत मिळते. तसेच दोघांमधील प्रेम अधिक घट्ट करण्यासाठी एकमेकांसोबत गप्पा मारणे आवश्यक असते.
4) पन्नीच्या समस्या ऐकून घ्याः- जर रात्री झोपण्याआधी पन्नी पतीला काही समस्या सांगत असेल तर पतीने ती ऐकून घ्यावी. कदाचित तिची समस्या गंभीर स्वरूपाची असू शकते. पन्नीच्या समस्या ऐकून त्यांचे निराकारण करणे हा पतीचा धर्मच आहे. यांपासून पळ काढणारे पुरुष भेकड असतात.
5) रोमांस कराः- रात्री झोपण्यापूर्वी पती- पन्नीने एकमेकांसोबत रोमँटिक गोष्टी कराव्यात. यामध्ये एकमेकांना मिठी मारणे, चुंबन घेणे आणि शेवटी प्रणय क्रीडा करणे अपेक्षित असते. कारण पती- पन्नीच्या नात्यामधील या अटळ गोष्टी आहेत.
काही लोकांना या गोष्टी वाचायला विचित्र वाटत असतील परंतु हेच सत्य आहे. दांपत्य जीवन सुखी आणि समाधानी ठेवायचे असेल तर एकमेकांच्या भावना समजून घ्या. आपल्या जोडीदाराच्या भावना समजून घेतल्या तर नाते घट्ट होत जाते.
अशाप्रकारे या काही पाच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला तुमच्या पत्नीसोबत करायलाच हव्यात.