पंक्चर काढणारा माणूस निघाला कलेक्टर मॅडमचा घटस्फोटित नवरा… मग झालं अस की…….!!

Uncategorized

मित्रांनो, आज आपण जिल्हा दंडाधिकारी डी एम या एका मॅडम बद्दलची कहाणी जाणून घेणार आहोत. की ज्यांचा पती हा एक पंक्चर काढणारा असतो. यात संपूर्ण कथा आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

 

जितेंद्र नावाचा एक मुलगा असतो. तो एका मेडल क्लास फॅमिलीतून असतो. त्याच्या एका नातेवाईकाचे लग्न असते आणि त्या लग्नासाठी तो तिथे गेलेला असतो. लग्नामध्ये त्याचे अनेक भावंडे देखील आलेली होती. तो त्या भावंडांसोबत इकडे तिकडे खूप मजा करत होता. अचानकपणे त्याचे एका सुंदर मुलीकडे लक्ष जात. त्या मुलीचे नाव सुनिता असे होते. ती देखील त्या लग्नासाठीच आलेली होती आणि तो बघताच सेमीच्या मुलीच्या प्रेमात पडतो. तो सतत त्या मुलीकडे पाहत होता हे तिला माहीत होते. तेही तिच्याकडे बघून हसते आणि तोही तिला आवडू लागतो.

 

जितेंद्र आपल्या प्लेटमध्ये जेवण घेऊन तो एका टेबलावर येऊन बसतो. सुनीता देखील गडबडीने प्लेट घेऊन त्या टेबलावर जितेंद्र ला लागून जाऊन बसते. घाबरत घाबरत दोन्हीही एकमेकांना हाय हॅलो करू लागतात व एकमेकांबद्दल विचारपूस करू लागतात. त्यांच्या विचारप्रसांमधून त्यांना कळते की ते दोघेही एकमेकांचे लांबचे नातेवाईक आहेत. ते एवढे लांबचे नातेवाईक होते की त्यांनी लग्न जरी करायचं ठरवलं तर ते त्यांचे लग्न सहज होऊ शकत होते. थोडा वेळ बोलल्यानंतर ते दोघेही एकमेकांना आपला फोन नंबर देतात आणि तिथून बाजूला होता.

 

लग्न समारंभ संपतो. सर्वजण आपापल्या घरी जातात. जितेंद्र आपल्या घरी पोचल्यानंतर सुनीताला फोन करतो आणि ते दोघे बोलू लागतात. एकमेकांबद्दल विचारपूस करू लागतात. असेच काही दिवस निघून जातात. ते एकमेकांचे खूप चांगले मित्र बनतात. काही दिवसानंतर जितेंद्रला कळते की सुनीता खूप श्रीमंत घरातील मुलगी आहे आणि आपण मिडल क्लास. त्यानंतर त्यांचे बोलणे इतके वाटते की हळूहळू त्यांची मैत्री प्रेमात कधी बदलते हे त्या दोघांना देखील कळत नाही. एके दिवशी सुनीता म्हणते की आपण लग्न करूया. त्यावर जितेंद्र म्हणतो की तू श्रीमंत घरातील मुलगी आहेस आणि मी मेडल क्लास घरातील मुलगा आहे. जर तुमच्या आई-वडिलांना आपले हे नाते समजले तर ते आपले लग्न करून देणार कधीही तयार होणार नाहीत.

 

सुनिता देखील सहमत होते. त्यानंतर असेच आणि काही दिवस उलटून जातात. त्यानंतर सुनीता पळून जाऊन लग्न करण्याचा विचार करते. यावर ते दोघे कोणालाही माहिती न देता खोटामध्ये रजिस्टर मॅरेज करतात आणि आपली मुलगी सुनीता ही घरातून सारखी सारखी बाहेर का जात आहे याचा शोधामध्ये त्याच्या घरचे लागतात. त्यावर त्यांना असे कळते की त्या दोघांनी लग्न केलेले आहे आणि त्यांचे मॅरेज सर्टिफिकेट हे पक्क्या मॅरेज सर्टिफिकेट आता मध्ये तोवर रूपांतर झाले होते. त्यामुळे त्यांनी कायद्या च्या साक्षीने लग्न केली होती. यावर सुनीताच्या घरचे विचार करतात की या दोघांना आता वेगळे करून आपली इज्जत घालवण्यापेक्षा आपण त्यांचे लग्न करून देऊया.

 

त्यावर ते त्या दोघांचे लग्न करून देतात. दोघांचे लग्न होते. काही दिवस निघून जातात. सुनीता एके दिवशी जितेंद्रला म्हणते की मला खूप शिकण्याची इच्छा आहे. त्यावर जितेंद्र म्हणतो की अग तू शिक्षणाकडे लक्ष द्यायला लागलीस तर घराकडे कोण पाहणार. त्यावर सुनीता म्हणते मी दोन्ही देखील मॅनेज करेन. असे म्हटल्यावर जितेंद्र तिच्या मताशी सहमत होतो आणि ती तिचा अभ्यास सुरू करते. सुनीता ही खूप अभ्यासामध्ये हुशार असते आणि तिला जिल्हाधिकारी किंवा जिल्हा दंडाधिकारी होण्याची खूप इच्छा असते. त्याप्रमाणे ती तिचा अभ्यास करू लागते. घरचे देखील तिला कोणत्याही बाबतीत धारेवर धरत नाहीत. तिला अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देतात.

 

काही दिवस उठून जातात. सुनीताला तिच्या जीवनामध्ये काही आर्थिक टंचाई निर्माण झालेली दिसून येते. कारण ती लहानपणापासून खूप श्रीमंत घरात वाढलेली होती आणि आता ती एका मिडल क्लास फॅमिली मध्ये राहत होती. त्यामुळे तिला खूप टंचाई निर्माण झाल्यासारखे वाटत होते. त्यावर ती तिच्या आईला तिच्या सर्व परिस्थितीबद्दल सांगते. तिची आई तिला समजावण्या ऐवजी तिला भडकवण्याचा प्रयत्न करते आणि त्याप्रमाणे सुनीता भडकते देखील. दोघांच्या मध्ये सतत भांडणे होऊ लागतात. सतत भांडणे होऊ लागतात त्यावर जितेंद्र ची आई एके दिवशी सुनीताला म्हणते, ‘अगं सुनबाई तू याचा विचार लग्नाच्या आधी करायचा होतास. माझा मुलगा तुला कोणतेही बंधन घातलेले नव्हते. तू तुझ्या इच्छेने इथे आले आहेस आणि तूच असे वागत आहेस’.

 

त्यानंतर थोडे दिवस असेच निघून जातात. एके दिवशी सुनिता आणि जितेंद्र यांचे खूप मोठे भांडण होते. यावर सुनिता आपल्या सासरचे घर सोडून माहेरी राहू लागते व माहेरातून त्या जितेंद्रला घटस्फोटाचे पेपर पाठवते. काही दिवसातच दोघांचा घटस्फोट होतो. इकडे सुनिता आपला अभ्यास पूर्ण करून ती जिल्हा दंडाधिकारी होते आणि दुसरीकडे जितेंद्र हा खूप खचून जातो. काही दिवसांनी त्याच्या आईच्या आजारपण उद्भवते. त्याने जमा केलेली सर्व पुंजी त्याच्या आईच्या उपचारांमध्ये खर्च होते. एवढे करून देखील त्याची आई बरी होत नाही. काही दिवसांनी त्याच्या आईचे देखील निधन होते. आईचे निधनानंतर देखील जितेंद्र खूपच खचून जातो. त्याचे कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. तो कोणत्याही काम करत नाही. आर्थिक परिस्थिती खूपच हालाखीची होऊन जाते.

 

एके दिवशी तो आपलाच मनाचा ताबा घट्ट करून आपल्या एका मित्राकडे जातो आणि आपली झालेली सर्व हकीकत त्याला सांगतो. त्यावर त्याचा मित्र पंक्चरच्या दुकान काढण्याचे त्याला सल्ला देतो व काम करण्याचा सल्ला देतो. त्याप्रमाणे जितेंद्र आपली थोडी मेहनत लावून एक ऑनलाईन पंक्चर चे दुकान सुरू करतो. ज्यामध्ये पंक्चर झालेली गाडी ज्या ठिकाणी असेल तो त्या ठिकाणी जाऊन पंकजाची सुविधा उपलब्ध करून देत असतो व त्याला त्याचे पैसे देखील मिळत असतात. याद्वारे तो आपला व्यवसाय खूप चांगला रित्या निर्माण निर्माण करतो. ज्यातून त्याला चांगले पैसे देखील कमवता येतात व तो त्याच्या वडिलांची आणि बहिणींची योग्यरीत्या देखभाल ही करू लागतो.

 

काही दिवसांनी अचानकपणे त्याला एका व्यक्तीचा फोन येतो आणि पंक्चर काढण्यासाठी त्याला तेथे बोलायला असते. ते ठिकाण त्याच्या ठिकाणाहून दहा ते पंधरा मिनिटात अंतरावर असते. त्याप्रमाणे तो त्या ठिकाणी जातो. तेव्हा त्याला दिसते की कोणीतरी जिल्हा अधिकाऱ्याची गाडी येथे पंचर झालेले आहेत. आसे दिसते. त्याप्रमाणे तो पंचर काढू लागतो. डिग्गीतील स्टेफनी घेण्यासाठी तो गाडी उघडून दिघी उघडण्याचे बटन दाबण्यासाठी जातो गाडीचा दरवाजा उघडतास त्याला तिथे सुनिता दिसते. ते पाहून तो खूपच गोंधळून जातो आणि सुनीता ही खूप गोंधळते. दोघांनाही खूपच वेगळे वाटत होते. त्यानंतर तो आपले काम पूर्ण करतो. त्यानंतर सुनीताचा ड्रायव्हर त्याला त्याच्या कामाचे पैसे देत असतो.

 

त्यावर तो त्याचे पैसे घेत नाही. तो म्हणतो की तुम्ही मोठी माणसे आहात. तुमच्याकडून काय पैसे घ्यायचे तुमच्या मॅडमना सांगा की मला कोणत्याही कामात अडचण आली तर त्या मला एका कामात मदत कराव्यात. त्याप्रमाणे सुनीता देखील या अटीला मान्यता देते आणि एका कार्डावर आपला नंबर लिहून तो कार्ड त्याला देते. त्यानंतर ते दोघेही आपापल्या वाट्याला निघून जातात. संध्याकाळी जितेंद्र ते कार्ड उघडतो त्यामध्ये त्याला पंधराशे रुपये असलेले दिसतात आणि त्यात तिचा फोन नंबर देखील लिहिलेला असतो. काही वेळ तो तसाच पडून राहतो आणि त्याच्या मनात होते की एकदा तरी फोन करून पहावे. त्यावर तो फोन लावतो. फोन लावतात पटकन एका रिंग मध्ये सुनिता फोन उचलते. जणू तू फोनची वाट बघत असते. असेच झाले होते. त्यानंतर ते दोघेही बोलू लागतात.

 

एकमेकांची विचारपूस करतात. सुनिता जितेंद्र ला विचारते की तू पंचर केव्हापासून काढत आहेस काय झाले आहे. त्यावर जितेंद्र म्हणतो ही कहाणी मी तुला फोनवर सांगू शकत नाही. त्यासाठी तुला मला भेटावे लागेल. त्याप्रमाणे ती म्हणते तू सांगशील त्या ठिकाणी मी येईल. त्यावर जितेंद्र म्हणतो की घरी ये. त्यावर सुनिता म्हणते मी जिल्हा दंडाधिकारी आहेत त्यामुळे घरी येणे हे चुकीचे आहे. दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी तू मला घेऊन चल मी येईल. त्याप्रमाणे दोघेही एका बाईकवर बसून एका ठिकाणी भेटतात व एकमेकांचे सर्व विचारपूस करतात. जितेंद्र सर्व काही आपली हकीकत तिला सांगतो व तिला विचारतो की तू दुसरे लग्न केले आहेस का? त्यावरती नाही म्हणते.

 

मग हे कुंकू का लावत आहेस. त्यावर ती म्हणते की मी जरी तुझ्याशी घटस्फोट घेतला असला तरी मी अजून पण तुलाच आपला नवरा मानते. त्यामुळे हे कुंकू तुझ्याच नावाचे आहे आणि ती पुन्हा लग्न करण्याची मागणी जितेंद्रला घालते. त्यावर जितेंद्र त्याला नकार देतो. कारण आता तर आपल्या दोघांची मार्ग खूपच वेगळी झालेले आहेत. तू जिल्हा दंडाधिकारी आहेस आणि मी एक साधा पंचरवाला आता तर आपला दोघांचे कोणतेच सूर जुळत नाहीत. त्यामुळे तो सरळ सरळ नकार देतो. त्यावर ती विचारते की तुझे दुसरे लग्न झालेले आहे का?

 

त्यावर जितेंद्र म्हणतो की मी याचा विचारच देखील करू शकत नाही. कारण प्रेम, लग्न एकदाच होते आणि ते पुन्हा पुन्हा करता येत नाही. यावर सुनीता खूपच भावुक होते आणि ती जितेंद्रला म्हणते की मला एका मंदिरामध्ये जायचं आहे. तू मला घेऊन जाशील का? त्याप्रमाणे तो तिला मंदिरामध्ये घेऊन जातो आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर ती त्याचा हात हातात घेऊन त्याच्या गळ्यात पडून खूपच रडू लागते आणि म्हणून लागते की मला माझी चूक कळलेली आहे आणि माझी खूपच मोठी चूक झालेली होती. त्यावेळी मला काय करावे हे कळत नव्हते. आता पुन्हा आपण लग्न करूया असा की त्याला म्हणते. त्यावर जितेंद्र देखील खूप भाऊक होतो त्याला देखील काहीही कळत नाही. तोही आपली भावना तिच्याशी व्यक्त करतो आणि ते दोघेही पुन्हा देवाचा साक्षीने लग्न करतात.

 

अशाप्रकारे ही एक सुंदर कथा आजच्या या लेखातून आपण जाणून घेतलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.