जेव्हा मन दुःखी असेल एकटे पडले असाल त्यावेळी… हे नक्की वाचा?

Uncategorized

मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीच्या मनावर काही परिणाम घडत असतात. हे परिणाम काही चांगले असतात, तर काही वाईट असतात. ज्यामुळे आपले मन दुखी व आनंदी होत असते. मन दुखी होते तेव्हा आपल्याला खूप एकटे पडल्यासारखे वाटते. अशावेळी काय करावे हे आपल्याला सुचत नाही. म्हणूनच आज आपण या लेखांमध्ये काही चांगले विचार जाणून घेणार आहोत की ज्यामध्ये आपल्याला माहिती मिळते. जेव्हा मन आपले दुःखी असते एकटे पडले सारखे वाटते त्यावेळेला आपण काय करावे?

 

1) ज्यांनी तुम्हाला त्रास आणि दुःख दिले. त्रास आणि दुःख त्यांना पण मिळेल आणि विश्वास ठेवा ते पाहण्याची संधी पण तुम्हाला मिळेल.

2) जीवनामध्ये बऱ्याच वेळा अशीच लोकं आपल्याला रडवतात ज्यांच्या आनंदासाठी आपण आपलं हसू सुद्धा विसरतो.

3) जेव्हा शेवटी सगळं एकट्यानेच सोडून जायचं आहे तर आत्तापासूनच एकटं राहणं का शिकू नये?

4) जास्त पण चांगलं असू नये नाहीतर लोकं वेडं आणि बावळट समजतात.

5) कधीकधी तुम्ही काही न करता चुकीचे ठरवले जाता कारण लोकांना जसे वाटते तसे तुम्ही वागत नाही.

6) कधीही दुसऱ्यांचे बोलणं ऐकून स्वतःचे नाते संपवू नका. कारण नाते आपले असतात दुसऱ्यांचे नाही.

7) खऱ्या लोकांना कधी कौतुकाची गरज नसते कारण खऱ्या फुलांना अत्तर लावायची गरज पडत नाही.

8) तुमच्या चांगल्या वागण्यामुळे तुम्ही एखादी किमती वस्तू मिळवू शकता जी तुम्ही पैसे देऊन सुद्धा खरेदी करू शकत नाही.

9) एका माणसाला धोका देऊन दुसऱ्या माणसाला खुश करणे सगळ्यात मोठा धोका आहे. आणि या गोष्टीला देव पण माफ करत नाही.

10) वेळ असतो तोपर्यंत स्वतःला बदलण्यामध्ये शहाणपणा आहे कारण, वेळेने तुम्हाला बदलले तर खूप त्रास होतो.

11) काही लोक वर्ष बदलताना पाहतात. आणि आपण वर्षभर लोकांना बदलताना पाहतो.

12) कोणी आज तर कोणी उद्या बदलते. पण विश्वास ठेवा या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती बदलतो.

13) जीवनामध्ये वाईट काळात मिळालेली साथ सफल झाल्यानंतर मिळालेला टाळ्यांपेक्षा खूप जास्त चांगली असते.

14) आजकाल हे कोणीच नाही पाहत की तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं आहे. लोक फक्त हेच पाहतात तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं नाही.

15) मन तर अजूनही जिवंत आहे. फक्त भावना मेल्या आहेत.

16) तुमच्या दुःखी होण्यामुळे आणि रडल्यामुळे कोणाला काहीही फरक पडत नाही म्हणूनच लोकांसमोर रडणं सोडून द्या आणि जीवनामध्ये नेहमी खुश रहा.

17) या जगाला खोटे लोकच आवडतात. थोडं जरी खरं बोललं तर लोकांना आजकाल राग येतो.

18) जे लोक धोका खाल्ल्यानंतर आणि दुःख मिळाल्यानंतर सुद्धा चुकीच्या रस्त्यावर जात नाहीत आणि प्रामाणिकपणे आपलं काम करत राहतात अशी लोक देवाला सगळ्यात जास्त आवडतात आणि हेच लोक आयुष्यात जिंकतात.

19) या गोष्टीचे दुःख करू नका की तुम्ही काय गमावलं. पण या गोष्टीचा आनंद माना की तुम्ही जे बोलाल ते करून दाखवताल.

20) कोणी तुमचं कितीही जवळचं असलं तरी सगळ्यात आधी तो स्वतःचा फायदाच पाहतो.

21) अशा ठिकाणी तुम्ही एकदम शांत बसले पाहिजे ज्या ठिकाणी तुम्हाला काहीही महत्त्व दिले जात नाही.

22) आपला तोच असतो जो कोणाही दुसऱ्यासाठी तुम्हाला टाळत नाही.

23) आयुष्य अशा परिस्थितीतून जात आहे जिथे मन तर दुःखी आहे पण तोंडावर हसू ठेवावं लागतं.

24) महाभारतातील कर्णानंतर एक वकीलच असा आहे जो चुकीचं असून सुद्धा तुमची साथ देतो.

25) अडचणी आयुष्याचा हिस्सा आहे. स्वतःच्या अडचणींवर ज्याने पाय ठेवला तो आयुष्य जिंकला. आणि ज्याने अडचणी डोक्यांवर ठेवल्या तो आयुष्य हरला.

26) कधी एकटच चालावं लागलं तर घाबरू नका कारण स्मशान, शिखर आणि सिंहासनावर माणूस एकटाच चालतो.

27) या जगामध्ये तीन प्रकारचे लोक खूप खतरनाक असतात. एक चुगली करणारे, जळणारे, स्वार्थी आणि मतलबी. असे लोक कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचं बोलणं तुम्हाला असं सांगतात जसे काही ते तुमचे खूप जवळचे आहेत. पण खरं पाहिलं तर ते स्वतः शिवाय त्यांच्या आई-वडिलांचेपण नसतात.

28) ज्यांना स्वप्न पाहिला आवडतात त्यांना रात्र छोटी वाटते आणि ज्यांना स्वप्न पूर्ण करायला आवडतात त्यांना दिवस छोटा वाटतो.

29) अशी पसंत काय कामाची. जिला पसंत पडण्यासाठी आपल्याला स्वतःला बदलावं लागतं.

30) समोरच्याला जाणीव पण नसते की त्याने तुमचं फक्त मन नाहीतर भरवसा पण तोडलेला असतो.

31) काही लोक येतात तुमचं दुःख कमी करायला. पण तुम्ही जेव्हा त्यांना आनंदी दिसता तेव्हा ते चिडून निघून जातात.

32) शांतपणे सगळं सहन करत राहिले तर तुम्ही सगळ्यांपेक्षा चांगले आहात. आणि तुम्ही थोडं जरी बोलले तरी तुमच्या पेक्षा वाईट कोणीही नाही.

33) ताकती पेक्षा जास्त बुद्धीचा उपयोग करा कारण ताकत लढायला शिकवते आणि बुद्धी जिंकायला शिकवते.

34) नशीब आणि आपल्या लोकांचा काही भरोसा नाही, हे दोन्ही कधीही पलटू शकतात.

35) आजच्या जमान्यामध्ये तोच मोठा आहे ज्याच्या जवळ पैसा आणि पद आहे.

36) कदर करायची असेल तर जिवंतपणीच करा. अर्थी उठताना तर द्वेष करणारे पण रडतात.

37) जेव्हा मन नाराज कोणा आपल्या व्यक्तीवर असेल तर माणूस ओरडत नाही तर रडतो.

38) विंचू जर कोणावर प्रेम करेल तर तो प्रेमात सुद्धा डंखच मारेल. काही लोकं या विंचू सारखी असतात.

39) तुम्ही कोणत्याही कामांमध्ये फक्त तेव्हाच सफल होऊ शकता जेव्हा तुम्हाला त्या कामावर गर्व असेल.

40) ज्या कपड्यांचा रंग गेला ते कपडे शरीरावरून काढून टाका आणि जी लोक रंग बदलतात त्यांना तुमच्या मनातून काढून टाका आणि सांभाळून रहा अशा लोकांपासून. रोज रंग बदलत असतात या लोकांचे. जोपर्यंत काम आहे तोपर्यंत बरोबर राहतात नंतर बोलण्याची पद्धत बदलून जाते या लोकांची.

41) त्रास आपोआप कमी होतो जेव्हा आपल्या लोकांपासून अपेक्षा करणं बंद होतं.

42) स्वभावात शांतपणा कधीही कारणाशिवाय येत नाही. काही दुःख अशी असतात जे आवाज पण हिरावून घेतात.

43) प्रत्येक नात्याच्या काही मर्यादा असतात. पण गोष्ट जेव्हा आत्मसन्मानाची असते, तेव्हा काही नाते संपवून टाकणेच बरोबर असते.

44) काही लोक आपली प्रॉपर्टी तर नसतात पण त्यांना गमावून आपण आपलं सगळं गमावून बसतो.

45) जेव्हा तुम्हाला जाणवेल की आपलीच लोक तुम्हाला टाळत आहेत. मग कधीही त्यांना त्रास द्यायला जाऊ नका.

46) कोणत्याही वाईट माणसाच्या वागण्यामुळे स्वतःच्या मनाची शांती आणि समाधान कधीही घालवून घेऊ नका .

47) महालामध्ये येऊन घर विसरतात. आजकालचे लोक थोडे पैसे मिळाले तर स्वतःची लायकी विसरतात.

48) ज्यांचं मन स्वच्छ असतं बऱ्याच वेळा अशा लोकांना नाकारलं जातं.

49) कोणाकडूनही अपेक्षा करणं चुकीचं नाही पण चूक ही आहे की आपण चुकीच्या लोकांकडून अपेक्षा ठेवतो.

50) कोणालाही फोर्स करू नका की ती व्यक्ती तुमची आठवण काढेल तुम्हाला वेळ देईल. काही दिवस शांत राहून पहा. मग तुम्हाला स्वतःलाच कळेल की त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तुमची काय व्हॅल्यू आहे.

51) आवड आणि निवडीचा मुद्दाच नाही. आता मुद्दा मनाचा आहे आणि मनच शिल्लक राहिलं नाही.

52) ज्या जगामध्ये प्रामाणिक धोकेबाज फक्त एक पानवाला असतो जो तुम्हाला विचारून चुना लावतो.

 

अशाप्रकारे हे काही चांगले विचार आहेत. त्यामुळे जर आपण दुःखी झालो असलो तर त्यातून आपल्याला मार्ग काढता येतो.

Leave a Reply

Your email address will not be published.