मित्रांनो, जीवनात खऱ्या प्रेमाचं स्थान फार मोठं आहे. प्रत्येक पुरुषाला आवडणाऱ्या स्त्रीमधे त्याचं आयुष्य सुंदर करण्याची क्षमता असते. अशा स्त्रीसाठी पुरुष काही खास गोष्टी करतो, ज्या सामान्यतः तो इतरांसाठी करत नाही. या गोष्टी त्याच्या प्रेमाचा आणि हृदयाच्या आतून आलेल्या भावनेचा भाग असतात. आज आपण अश्या १० गोष्टी पाहणार आहोत, ज्या पुरुष फक्त त्यांना आवडणाऱ्या स्त्रियांसाठीच करतात. या गोष्टी तुम्हाला नात्याचं एक आगळ वेगळं रूप दाखवतील.
१. तुमच्याबद्दल जाणून घेणे. पुरुष एखाद्या स्त्री च्या खऱ्या प्रेमाने आकंठ बुडालेला असेल, तर तो नेहमी तिच्याबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या आवडीनिवडी, स्वभाव, सवयी, तुमचं भूतकाळ आणि तुमची भविष्यातील स्वप्नं जाणून घेण्यासाठी तो विविध मार्ग शोधत असतो. याचा अर्थ असा आहे की, त्याला तुमच्याशी अधिक जवळीक साधायची आहे. तुमची प्रत्येक गोष्ट त्याला महत्त्वाची वाटते. तुम्ही कोणता पदार्थ आवडीने खाता, तुम्हाला कोणता रंग आवडतो किंवा त्याच्या स्वभावातील कोणत्या गोष्टी तुम्हाला प्रभावित करतात, हे तो जाणून घेण्याचा सतत प्रयत्न करीत असतो. यामुळे तुमच्या आयुष्यात त्याची उपस्थिती ठळक पद्धतीने तुम्हाला जाणवायला सुरुवात होते.
२. वडीलांसारखं संरक्षण करणे पुरुष जेव्हा एखाद्या स्त्रीवर प्रेम करतो, तेव्हा तो तिला तिच्या वडिलांप्रमाणेच संरक्षण देतो. संकट कुठलंही असो, तो तुमच्या बाजूने उभा राहतो. तो तुमचं रक्षण फक्त शारीरिक नाही, तर मानसिक आणि भावनिक स्वरूपातही करतो. तुम्हाला कोणी दुखावलं, तर त्याला ती गोष्ट सहन होत नाही. तुमचं आयुष्य सुरक्षित आणि आनंदी कसं होईल, याचा तो कायम विचार करतो. त्याचा हा स्वभाव,तुमच्याबद्दल असलेल्या त्याच्या निस्वार्थ प्रेमाचं प्रतीक आहे.
३. तुमच्या स्वप्नांना प्रोत्साहन देणे तो पुरुष खरा, जो तुमच्या स्वप्नांमध्ये त्याचंही स्वप्न पाहतो. तुमचं शिक्षण, करिअर किंवा इतर कोणत्याही उद्दिष्टांमध्ये तो तुम्हाला प्रोत्साहित करतो. तो कधीही तुम्हाला कमी लेखत नाही, उलट तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेवतो. तुमच्या यशासाठी तो वेळ आणि प्रयत्न आणि खर्चही करायला तयार असतो. तुमच्या आयुष्याची दिशा ठरवण्यात त्याचा सकारात्मक सहभाग असतो. त्याला तुमचं यश हे त्याचं यश वाटतं, आणि त्यासाठी तो नेहमी तुमच्यासोबत राहतो.
४. तुम्ही जश्या आहात तसे स्वीकारणे जग तुम्हाला ज्या प्रकारे बदलायला सांगतं, तसं तो कधीच करत नाही. तुमचं खरं रूपच त्याला हवं असतं. तुमचे दोष, चुका, आणि कमतरताही तो स्वीकारायला तयार असतो. तो तुम्हाला तुमच्या स्वभावाप्रमाणे जगू देतो. तुम्हाला बदलण्याची गरज त्याला वाटत नाही, कारण तुमचं खरं व्यक्तिमत्त्वच त्याला आवडतं असत. ही गोष्टच खऱ्या प्रेमाचं लक्षण आहे.
५. संकटात तुमच्यासोबत राहणे आयुष्यात प्रत्येकाला चढउतार येतात, आणि अशा वेळीच खरा साथीदार ओळखता येतो. जो पुरुष खऱ्या अर्थाने तुमच्यावर प्रेम करतो, तो संकटात तुमची साथ कधीच सोडत नाही. तुम्हालाआधार देण्यासाठी तो स्वतःचा वेळ, पैसा आणि ऊर्जा खर्च करतो. तो तुमच्या डोळ्यातील अश्रू पुसतो आणि तुम्हाला संकटातून उभं राहायला पाठबळ देतो. संकट कितीही मोठं असो, तो कधीही तुमचं साथ सोडत नाही, हेच त्याच्या खऱ्या प्रेमाचं लक्षण आहे.
६. तुमच्या कुटुंबियांना आणि मित्र मैत्रीणीनाही आदर देणे तुमचे आई-वडील, भावंडं आणि मित्रमंडळी यांच्याशी तो नेहमी आदराने वागतो. तुम्हाला जस तुमच्या कुटुंबाबद्दल प्रेम वाटतं, तसंच प्रेम तोही व्यक्त करतो. तुमच्या जवळच्या व्यक्तींना तो कधीही दुर्लक्षित करत नाही. त्यांच्या सण-समारंभात सहभागी होतो, त्यांना योग्य मानसन्मान देतो, आदर राखतो. त्याचा हा स्वभाव तुम्हाला आणि तुमच्या नात्याला अधिक घट्ट बनवतो.
७. एकटं पडू देणार नाही कोणतंही संकट असो, तो तुम्हाला कधीच एकटं पडू देत नाही. तुमच्या सोबत उभं राहण्याची जबाबदारी तो नेहमी पार पाडतो. तुमचं मनोबल वाढवण्यासाठी तो प्रत्येक प्रसंगात सहभागी होतो. एखाद्या कठीण प्रसंगी, जिथे सगळेजण तुमचं साथ सोडतात, तुमच्यावर विश्वास ठेवत नाहीत, तिथे तो तुमच्या सोबत खंबीरपणे उभा राहतो. तुम्हाला भावनिक आणि मानसिक आधार देण्यासाठी तो कायम तयार असतो.
८. त्याचं प्रत्येक गुपित शेअर करतो खऱ्या नात्यात गुपितं नसतात. ज्या पुरुषाला तुम्ही खरोखरच आवडता, तो त्याच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करतो. त्याच्या भूतकाळातील सुख-दुःख, सध्याच्या योजना, भविष्याचे स्वप्नं आणि त्याचं मन, तो तुमच्याबद्दल काय विचार करतो या सर्व गोष्टींबाबत तो प्रामाणिक राहतो. तुम्हाला त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवता यावा, याची तो काळजी घेतो.
९. त्याच्या दृष्टीने तुम्हाला प्राधान्य असतं तुमच्यावर खर प्रेम करणाऱ्या पुरुषासाठी, तुम्ही त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती असता. तो कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला दुय्यम स्थान देत नाही. तुमचं सुख, आनंद आणि समाधान यासाठी तो नेहमी प्रयत्नशील असतो. इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा तुम्हाला तो अधिक प्राधान्य देतो.
१०. त्याग करण्यास घाबरत नाही प्रेमात त्याग हा फार महत्त्वाचा असतो. जो पुरुष तुम्हाला खऱ्या अर्थाने आवडतो, तो तुमच्यासाठी कोणत्याही गोष्टींचा त्याग करण्यास तयार असतो. तो त्याच्या सोयी, वेळ, आणि कधीकधी स्वतःच्या स्वप्नांनाही बाजूला ठेवतो. तुमचं सुख त्याला महत्त्वाचं वाटतं.
मित्रांनो, प्रेम हे फक्त शब्दांमधून व्यक्त होणारं नसतं, अनेकवेळा ते कृतीतूनही दिसतं. पुरुष जर तुमच्यावर खऱ्या अर्थाने प्रेम करत असेल, तर तो वर सांगितलेल्या गोष्टी तुमच्यासाठी नक्कीच करेल. त्याचं तुमच्यावर असलेलं प्रेम त्याच्या कृतीतून स्पष्ट दिसेल. नात्याचा असा सुंदर अनुभव तुम्हाला, तुमच्या आयुष्याला एक वेगळी दिशा देण्यास मदत करतो. म्हणूनच, खऱ्या प्रेमाची कदर करा आणि ते जपण्यासाठी नेहमी प्रयत्नशील रहा.
अशा प्रकारे पुरुष आपल्या आवडत्या स्त्री सोबत या दहा गोष्टी करतात.