मुंबईतील दिनकर महाले दादांना आलेला स्वामींचा थरारक अनुभव वाचून तुमच्याही अंगावर काटा आलयाशिवाय राहणार नाही ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे स्वामीभक्त आहेत. आपण केंद्रामध्ये किंवा ज्यांना जमत नाही ते आपल्या घरामध्ये स्वामींची सेवा करण्यामध्ये मग्न राहतात. म्हणजेच स्वामी आपल्या सदैव पाठीशी आहेत असा विश्वास हा प्रत्येक भक्ताला असतोच. अनेकांना स्वामींचे अनुभव देखील आलेले आहेत म्हणजेच त्यांना संकटातून मार्ग दाखवण्याचे काम स्वामींनी केलेले आहे. तर आज आपण असाच एक अनुभव पाहणार आहोत हा अनुभव मुंबईतील एका दादांचा आहे. म्हणजेच मुंबईपासून जवळच असलेले मालेगाव या गावातील दादांचा हा अनुभव आहे. हा अनुभव खूपच थरारक अंगावर शहारे आणण्यासारखा आहे आणि हा अनुभव आपण त्यांच्या शब्दांमध्ये जाणून घेणार आहोत.

 

नमस्कार मी दिनकर महाले. मी मालेगाव पासून आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गावांमध्ये राहत होतो. हा जो अनुभव आहे हा अनुभव 1994 सालचा आहे. त्यावेळेस माझे वय 26 ते 27 असे होते. माझ्या कुटुंबांमध्ये माझी आई वडील, माझा छोटा भाऊ आणि माझी पत्नी असा परिवार होता. माझं नुकताच लग्न झालं होतं म्हणजेच दोन तीन महिने माझ्या लग्नाला झाले होते आणि मला मुंबईतून जॉब साठी कॉल आलेला होता आणि मला जावच लागणार होतं.

 

परंतु माझं नवीन लग्न झालं असल्यामुळे घरातील सर्वजण म्हणाले की तू अगोदर एकटा जा आणि नंतर मग तू तुझ्या पत्नीला घेऊन जाऊ शकतो. कारण आमची गावाकडे खूपच जमीन देखील होती आणि आमचे बाबा देखील सतत आजारी असतात. त्यामुळे मग मी एकटाच मुंबईला गेलो. मुंबईला गेल्यानंतर काही दिवसांनी म्हणजेच एक थोड्या दिवसांनी मला माझ्या भावाचा माझ्या ऑफिसमध्ये लँडलाईन नंबर वरती कॉल आला.

 

त्यावेळेस मोबाईल फोन अशी सुविधा काहीच नव्हती व त्यामुळे ऑफिस मधील लँडलाईन नंबर वरती भावाचा कॉल आला आणि भावाने सांगितले की बाबांची तब्येत ठीक नाही. मग त्यावेळेस मात्र मला खूपच टेन्शन आलं आणि मग मी नोकरीसाठी हाफ डे साठी अर्ज केला आणि त्या दिवशी मला स्वामी कृपेने हाफ डे देखील मिळाला. म्हणजेच तिथून मला साडेतीन चार वाजता मला सुट्टी मिळाली होती.

 

मी लगेचच घरी येऊन दोन-तीन कपडे घेऊन लगेचच मालेगावला जाण्यासाठी निघालो. परंतु त्यावेळी रस्ते खूप खराब होते आणि गाड्या देखील व्यवस्थित नव्हत्या. म्हणजेच मोजक्याच गाड्या होत्या. तरीही मी मुंबईहून नाशिकला आलो आणि नाशिकहून मी मालेगावला आलो. मालेगावला मला यायला जेमतेम बारा वाजलेले होते.

 

बारा वाजल्यानंतर आमचे गाव हे आठ किलोमीटर पुढे राहत होते व त्यावेळेस खूपच उशीर झाल्यामुळे मला तिथे काहीच मिळणे शक्य नव्हते. त्यामुळे मला पायी जावे लागणार होते म्हणून तर मी मालेगाव म्हणून आमच्या छोट्याशा गावाला पायी जाण्याच ठरवलं आणि असा निश्चय देखील केला. परंतु त्यावेळेस खूपच कडाक्याची थंडी देखील होती आणि आजूबाजूला खूपच अंधार होता. मला मनात थोडीशी भीती देखील वाटत होती. परंतु आपल्या बाबांची तब्येत ठीक नाही आपल्या बाबांचे रिपोर्ट सगळे काढायचे आहेत. हे जेव्हा माझ्या मनी आले त्यावेळेस मी लगेचच पायी जाण्याचा ठरवलं.

 

आमच्या गावापासून थोड्या अंतरावरती स्मशानभूमी होती आणि त्या स्मशानभूमीमध्ये आमची आई वगैरे आम्हाला पाठवून देत नव्हती. परंतु आता मी मोठा झाल्यामुळे मला सर्व काही ही अंधश्रद्धा आहे हे मी मनी बाळगलं होतं आणि तसेच मी अगदी निश्चयाने जाण्यासाठी मी पुढे पाऊले टाकत होतो. मी इकडे तिकडे न पाहता सरळ पुढे पाहत मी गुरु दत्ताचे नाव घेत चालत होतो.

 

मी त्यावेळेस स्वामींना मानत होतो. कारण आमच्या घरातील सर्वजण हे स्वामींना खूपच मानत होते. स्वामींची मूर्ती देखील आमच्या घरामध्ये आहे आणि मी स्वामींना म्हणत होतो की स्वामी महाराज मला कोणीतरी आमच्या गावचे ओळखीचे भेटू देत आणि माझ्या प्रवासामध्ये ते माझ्या साथ देऊ देत. असे म्हणत म्हणत मी गुरु दत्ताचे नाव घेत मी पुढे चालत होतो आणि स्मशानभूमी जवळच येणार होती आणि एकदम अचानक पाठीमागून कोणीतरी माझ्या खांद्यावरती हात टाकला.

 

मी पाहिलं तर आमच्या गावची एक व्यक्ती होती. मग मी खूप खुश झालो आणि ती व्यक्ती मला म्हणाली की एवढ्या रात्री का तू निघालास तर मी म्हणालो की बाबांची तब्येत ठीक नाही त्यामुळे मी उशिराने निघाल्यामुळे मला वेळ झाला. मी त्यांना म्हटलं की तुम्ही काय एवढा वेळ केला? तर ते म्हणाले की माझं थोडं काम होतं बाहेरच्या गावी त्यामुळे मला देखील यायला उशीर झाला.

 

त्यानंतर आम्ही दोघेजणही आमच्या गावापर्यंत आलो. नंतर संध्याकाळी मी घरी गेल्यानंतर झोपलो आणि सकाळी उठल्यानंतर मला बाबांना दवाखान्यात दाखवायचं होतं त्यामुळे सर्वजण गडबडीत होते आणि मी बाबांना दवाखान्यात घेऊन जात असतानाच अचानक मला पाठीमागून दिनकर म्हणून हाक मारली. त्यावेळेस मी मागे वळून पाहिले तर जी व्यक्ती मला रात्री भेटलेली होती तीच व्यक्ती होती आणि त्यावेळेस तो व्यक्ती मला म्हणाला की तू कधी आलास? कसा आहेस? असा प्रश्न विचारताच मला काहीच कळेना.

 

कारण जी व्यक्ती मला संध्याकाळी भेटलेली होती आम्ही गप्पा मारत आम्ही घरी आलेलो होतो आणि तीच व्यक्ती मला परत का विचारते आहे. त्यावेळेस मी त्यांना म्हणालो की आपण रात्री दोघेजण मिळून आलो आहोत. तर ती व्यक्ती म्हणाली की, तू माझी चेष्टा करतोस की काय व त्यावेळेस मी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही आणि बाबांना मी दवाखान्यात घेऊन गेलो आणि टेस्ट वगैरे करून परत आम्ही घरी आलो.

 

घरी आल्यानंतर मी सगळी जी काही रात्रीची हकीकत होती सर्व कुटुंबीयांना सांगितली आणि त्यावेळेस माझ्या वडिलांच्या मुखातून श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त हे नाम बाहेर पडले. त्यावेळेस माझ्या वडिलांना बोलायला येत नव्हतं. परंतु एकदम अचानकपणे ते स्वामी समर्थ म्हणून बोलू देखील लागले आणि त्यावेळेस मला त्यांनी सांगितले की तुझ्यासोबत जे रात्री होते ते स्वामी महाराज होते आणि तुला भीती वाटत होती त्यामुळे ते तुझ्या पाठीशी उभी राहिले.

 

तेव्हा माझ्या बाबांची तब्येत देखील व्यवस्थित झाल्यामुळे सर्वजण खुश होते आणि स्वामींचा हा चमत्कार पाहून देखील आमची भक्ती अधिकच दृढ देखील बनली. कारण स्वामी हे आपल्या प्रत्येक भक्ताच्या संकटांमध्ये पाठीशी उभे राहतात. त्यांना संकटातून मार्ग दाखवतात आणि आपण मनापासून जर श्रद्धेने स्वामींना हाक दिली तर स्वामी आपल्या सदैव पाठीशी राहतात. हे मात्र मला त्यावेळेस समजले आणि तेव्हापासून माझा स्वामीवरचा विश्वास अधिकच वाढत गेला.

Leave a Reply

Your email address will not be published.