मित्रांनो, प्रत्येकाने आपला आयुष्य हे आनंदामध्ये जगायचे आहे. कारण येणारी वेळ आणि गेलेली वेळ कधीही आपल्याला परत मिळत नसते. कोणीही आपल्या सोबत कसाही वागुद्या तो विषय तिथेच सोडून नव्याने सुरुवात करायची. कारण प्रत्येक जण हा आपल्याशी नाते स्वार्थासाठी जोडत असतो. त्यांचा स्वार्थ सिद्ध झाला की ते आपल्याशी असलेली नाते तोडत असतात.
म्हणून कोणाचाही विचार न करता आपला विचार करून आपले आयुष्य आपण जगावे. त्यांच्या कर्माची शिक्षा ही वेळ आली की परमेश्वर त्यांना देतच असतो. म्हणून त्याचा विचार करत बसायचा नाही. आजच्या या लेखांमध्ये आपण असेच काही सुंदर सुविचार जाणून घेणार आहोत.
मैत्री केली, तर जात पाहू नका आणि मदत केली तर ते बोलून दाखवू नका, कारण कोणत्याही बाटलीचा सील आणि दोस्तांचा दिल एकदा तोडला, की विषय संपला मित्र गरज म्हणून नाही, तर सवय म्हणून जोडा, कारण गरज संपते पण सवय कधीच सुटत नाही..!
शब्दच माणसाला जोडत असतात आणि शब्दच माणसाला तोडतही असतात, शब्दच असतात जे कधी रामायण तर कधी महाभारत रचत असतात..!
कुणी कुणाला अधिक करतो कुणी कुणाला वजाबाकी करतो, कुणी कुणाला गुणुले करतो कुणी कुणाला भागाकार करतो, पण परमेश्वर मात्र वेळ आली की सगळ्यांना बरोबर करत असतो..!
ती राहील, तर तुम्ही राहणार, ती नाही तर तुम्हाला कोणीही नाही, ती म्हणजे “माणुसकी”.
ज्यांना आपली चूकच समजत नाही अशा लोकांना कधीच त्यांची चूक दाखवण्याचा प्रयत्न करू नका कारण ते इतके मूर्ख असतात, की ते स्वतःची चूक तर मानतच नाहीत उलट आपल्याला चुकीचं ठरवत असतात..!
आपले प्रयत्न संपतात, तेव्हा हिमत साथ देत असते आणि जेव्हा आपलीच लोकं तोंड फिरवतात, तेव्हा परमेश्वर साथ देतो, फक्त स्वतःमध्ये विश्वास पाहिजे..!
आपले प्रयत्न संपतात, तेव्हा हिमत साथ देत असते आणि जेव्हा आपलीच लोकं तोंड फिरवतात, तेव्हा परमेश्वर साथ देतो, फक्त स्वतःमध्ये विश्वास पाहिजे..!
अत्तर सुगंधी व्हायला फूल सुगंधी असावी लागत असतात, आणि नाती सुंदर व्हायला माणसांचं स्वभाव निर्मळ असावं लागतं असतात..!
समोरच्याच्या गरजेवर आपली किंमत ठरत असते, पायपुसनी कितीही सुंदर असली तरी कोणी हात पुसत नाही त्याला..!
ईश्वरी निर्णयात उशीर होतो पण निर्णय मात्र स्थिर असतो, फक्त माणसाला विश्वास आणि धीर ठेवायची गरज असते..!
लोकं बोलतात बाईच्या डोक्यावर पदर असावा त्यापेक्षा आपल्याच डोळ्यात आदर असावा..!
जन्माला आलो म्हणून आयुष्य रेटायचं की एकच जन्म आहे म्हणून आयुष्य सुंदर जगायचं हे ज्यानं त्यानं ठरवायचं असतं..!
आजचा माणूस रक्ताच्या नात्यात बेईमानी करतो आणि परक्या नात्यात इमानदारी शोधतो..!
प्रत्येकाला आपण आवडलो पाहिजे हा अट्टाहास सोडा आपल्याला तरी कुठं प्रत्येक जण आवडत असतो..!
सुख हा साधासरळ शब्द आहे पण आयुष्यभर धावायला लावून आयुष्य गिळून घेत असतो दुःख हा वेदनादायक शब्द आहे, पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगायचं कसं याचं मार्गदर्शन करत असतो..!
आपल्या मनातील प्रत्येक भावना ही गुंतागुंतीची असते, ती प्रत्येकाला समजेल असं नाही, मात्र जे आपल्या मनाच्या जवळ असतील त्यांना ती समजल्याशिवाय राहत नसते..!
अंधार झालातर स्वतःच्या सावल्या सुद्धा साथ सोडत असतात म्हणून आयुष्याच्या वाटेवर एकटं चालण्याची हिंमत ठेवायचीच लागत असते..!
व्यक्तीचं मोल समजण्यासाठी एकतर ती गमवावी लागते किंवा कमवावी लागते..!
आज आयुष्यात येणारा प्रत्येक घडा तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी तयार करत असतो..!
संवादाची गोळी घेतली की बरीच दुखणी बरी होत असतात..!
रानामध्ये खत बाजारामध्ये पत आणि घरामध्ये एकमत असणाऱ्याच्या संसार हा नेहमीच सुखाचा होत असतो..!
कुणी नाकारलं म्हणून कुणाचं श्रेष्ठत्व हे कमी होत नसतं..!
शांतता ही बऱ्याच समस्यावर औषध असू शकते, पण सर्वच नाही, जेव्हा मान-सन्मान आणि स्वाभिमानावर वार केले जातात तिथं तोंड उघडल्याशिवाय पर्याय राहत नाही..!
मी ही चुकू शकतो हे एकदा मान्य केलं, की अनेक वाद आणि विरोध हे कमी होत असतात..!
स्पष्ट बोला, पण असं बोला की ज्यामुळे समोरच्याला कष्ट होणार नाहीत आणि तुमचं असलेलं नातं नष्ट होणार नाही..!
काही लोकांची सवय अशी असते की आपली समोरच्या व्यक्तीबद्दल कान भरणी करतात आणि स्वतः मात्र त्या व्यक्तीसोबत गोड राहतात, म्हणून कधी कोणाच्या सांगण्यावरून कोणाशी नातं बिघडवायचं नसतं..!
अशाप्रकारे हे काही सुंदर सुविचार आहेत त्यामुळे आपले मन अगदी प्रसन्न होऊन जाते.