मित्रांनो, बहुतांश जणांच्या घरी पांढरं किंवा तशाच फिकट रंगाचं वॉश बेसिन असतं. तुमच्या घरीदेखील असंच बेसिन असेल, तर ते स्वच्छ ठेवण्यासाठी किती मेहनत लागते, हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. कित्येक जण ओळखीच्या सफाईवाल्याला बोलवून किंवा मग एखाद्या अॅपच्या माध्यमातून स्वच्छता कर्मचारी बोलवून बेसिन साफ करून घेतात. हे प्रकार भरपूर खर्चिक आणि वेळ खाणारे आहेत. तुम्हाला कमी खर्चात आणि कमी मेहनतीत स्वतःच बेसिन साफ करायचं असेल, तर त्यासाठी काही सोप्या ट्रिकची माहिती घेऊया. आणि मित्रांनो आजच आपण आपल्या घरामध्ये असणारे वॉश बेसिन साफ करण्यासाठी चे उपाय आणि ट्रिक्स पाहणार आहोत हे आपण अगदी कमी खर्चामध्ये आपल्या घरात करू शकतो.
मित्रांनो यामधील सर्वात पहिला उपाय म्हणजे मित्रांनो हा उपाय करताना आपल्याला आपल्या वॉश बेसिनचे जे झाले असते ते आपल्याला कंपनी करून मिळते हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. परंतु मित्रांनो बाजारांमध्येही अगदी थोड्या किमतीमध्ये वॉश बेसनचे एक वेगळे जाळे आपल्याला मिळते ते आणून आपण आपल्या वॉश बेसिन ला बसवायचे आहे.
मित्रांनो हे जाळे कसे असते आता आपण हे जाणून घेऊया. तर मित्रांनो अगदी बारीक बारीक जाळे या जाळीला असतात म्हणजेच आपल्या घरामध्ये आपण चहा गाळण्यासाठी जे गाळण वापरतो त्या पद्धतीचे हे जाळे असते आणि मित्रांनो तेच आपल्याला आपल्या बेसिनच्या तोंडाला बसवायचं आहे. यामुळे आपल्या पाईप मध्ये जे काही बारीक बारीक कचरा आणि घाण अडकते याचे प्रमाण कमी होईल.
त्यानंतर मित्रांनो दुसरा जो उपाय आणि ट्रिक आपण आपले वॉश बेसिन स्वच्छ करण्यासाठी करू शकतो तो म्हणजे मिठा संबंधीत. मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये मीठ असतंच आणि मित्रांनो याच मिठाचा वापर करून आपण हा उपाय करायचा आहे. तर मित्रांनो तुमच्या घरामध्ये असणारे मीठ तुम्ही या उपायासाठी वापरायचे आहे आणि जर मित्रांनो मोठे मीठ तुम्ही या उपायासाठी वापरले तर अति उत्तम यामुळे चांगला रिझल्ट तुम्हाला दिसून येईल.
जर शक्य असेल तर तुम्ही ते मीठ वापरू शकता. तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला एका वाटीमध्ये वाटी भरून मीठ घ्यायचा आहे आणि हे मीठ आपल्याला आपल्या वॉश बेसिनच्या जाळीमध्ये टाकायचे आहे.
त्यानंतर मित्रांनो त्यामध्ये आपल्याला ते मीठ टाकल्यानंतर दोन ते तीन मिनिटानंतर एका भांड्यामध्ये कोमट पाणी करून घ्यायचा आहे आणि ते पाणी त्यावर ओतायचा आहे, म्हणजेच मित्रांनो सर्वात आधी आपल्याला एका वाटीमध्ये मीठ घ्यायचा आहे. ते मीठ आपल्या बेसिनच्या जाळ्यामध्ये टाकायच आहे आणि त्यानंतर आपल्याला कोमट पाणी त्या जाळीवर ओतायचं आहे.
मित्रांनो हे पाणी आपल्याला कोमटच ओतायचं आहे जास्त गरम पाणी जर आपण ओतलं तर यामुळे आपली जी बेसिनची प्लास्टिकची पाईप आहे ती वितळण्याची शक्यता असते. म्हणूनच कोमट पाणी आपल्याला त्यामध्ये ओतायचं आहे मित्रांनो यामुळे तुमच्या जाळीमध्ये जी काही घाण अडकलेली आहे ती निघून जाईल आणि त्याचबरोबर तुमची संपूर्ण वॉश बेसिन ची पाईप स्वच्छ होईल.
मित्रांनो आता शेवटची तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची जी ट्रिक आहे म्हणजेच जो सोपा उपाय आहे तो आता आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो या ट्रिकसाठी तुम्हाला अगदी घरगुती गोष्टींची गरज भासणार आहे. तुम्हाला कोणतंही महागडं डिटर्जंट आणावं लागणार नाही. केवळ बेकिंग सोडा आणि व्हिनेगार या गोष्टींच्या मदतीने तुम्ही बेसिन चकाचक करू शकणार आहात.
बेसिन स्वच्छ करण्यासाठीची ही प्रकिया अगदी सोपी आहे. यासाठी तुम्हाला विशेष मेहनत करण्याची गरज भासणार नाही. सर्वांत आधी तुम्हाला दोन ते तीन चमचे बेकिंग सोडा संपूर्ण बेसिनवर पसरायचा आहे.
मित्रांनो बेसिनच्या पाइपमध्येही एक चमचा बेकिंग सोडा टाकू शकता. त्यानंतर अर्धा ग्लास व्हिनेगार बेसिनमध्ये टाकून ठेवा. एक ते दोन तासांसाठी हे तसंच राहू द्या. त्यानंतर एका स्क्रबरच्या मदतीने बेसीन घासून काढा. तुम्हाला डिटर्जंटनेही मिळणार नाही अशी चमक बेसिनवर दिसेल.
या ट्रिकची विशेष बाब म्हणजे, या पद्धतीने बेसिन स्वच्छ केल्यास केवळ वरचा भागच नाही, तर पाइपदेखील स्वच्छ होतो. तसंच, बेसिनच्या पाइपमध्ये ब्लॉकेज असल्यास तेदेखील क्लिअर होते. सोबतच, बेसिनमधून दुर्गंधी येत असेल तर तीदेखील या ट्रिकमुळे नाहीशी होते. अशा प्रकारे तुम्हाला या घरगुती उपायामुळे अनेक फायदे मिळतात. तेव्हा आता तुम्हीदेखील अगदी कमी खर्चात आपलं वॉश बेसिन स्वतःच स्वच्छ करू शकता.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.