मित्रांनो, जर तुमच्या छातीमध्ये कफ साठला असेल, घशामध्ये इन्फेक्शन झाले असेल, घशामध्ये खवखव जाणवत असेल किंवा सूज झाली असेल. तसेच सर्दी होण्याच्या पूर्वीची काही लक्षणे तुम्हाला जाणवत असतील. तर तुमच्या ह्या समस्यांवर हा उपाय तुम्ही करू शकता. ह्या साध्यासोप्या उपायाने तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या चुटकीसरशी बरा होण्यास नक्कीच मदत होणार आहे. सध्याच्या या भयावह वातावरणामध्ये आपण जीवन जगत आहोत. यामध्ये जर आपल्या घशामध्ये थोडेसे जरी इन्फेक्शन झाले तरी आपण घाबरतो. तर आपण घाबरण्यायेवजी साधेसोपे घरगुती उपाय करा आणि आरोग्य निरोगी बनवण्यासाठी आयुर्वेदाची मदत घ्या.
जेव्हा आपल्याला सर्दी, पडसे होते. तेव्हा आपल्या छातीमध्ये कफ साठतो आणि वारंवार आपल्याला खोकला यायला सुरू होतो. आपल्या छातीतील कफ बाहेर काढण्याची जी प्रकिया होते त्याला खोकला म्हणतात. मित्रांनो जर आपल्याला वारंवार खोकला आला तर तो ओला खोकला असो, कोरडा खोकला असो, कफाचा खोकला किंवा कोणत्याही ॲलर्जीचा खोकला असो तर या सर्व प्रकारच्या खोकल्याच्या समस्या नष्ट करण्यासाठी तुम्हाला हा उपाय नक्कीच मदत करणार आहे. तर मित्रांनो चला मग पाहू तो रामबाण उपाय.
तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला प्रमुख जे पदार्थ लागणार आहेत एक म्हणजे विड्याचे पान आणि दुसरा म्हणजे ओवा आणि थोडीशी खडीसाखर. एक विड्याचे पान यालाच खाऊचे पान म्हणतात. काही ठिकाणी नगिनीचे किंवा नागवेलीचे पान या नावाने ओळखले जाते. तर हे पान आपल्याला सहजासहजी पान टपरीवरदेखील उपलब्ध होते. ही सर्व पाने मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावीत व कोरडी करावीत. सुरुवातीला त्याचे देठ कट करून घ्यावेत आणि देठ कट करून घेतल्यानंतर पान उलटे करून त्यामध्ये एक छोटा चमचा ओवा घालायचा आहे.
मित्रांनो, ओवा हा तिखट असल्यामुळे आणखीन एक उपयुक्त पदार्थ घालू शकतो तो म्हणजे मध. यामुळे या पानाची आणखीन चव व आयुर्वेदिकता वाढेल. विड्याचे पान मधासोबत खाल्ल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आपला खोकलादेखील थांबण्यास मदत होईल. तर अशाप्रकारे पानाचा विडा तयार करायचा आहे.
सकाळी उपाशी पोटी याचे सलग 3 दिवस सेवन करायचे आहे. तर मित्रांनो हे जे विड्याचे पान आहे या विड्याच्या पानांमध्ये कॅल्शिअम, प्रोटीन, थायमिन इत्यादी घटक भरपूर प्रमाणात आढळतात, तसेच पानात असलेल्या अँटी बॅक्टेरियल गुणांमुळे तोंडातील रोगाणू बॅक्टेरियाशी निगडीत इतर रोगांपासून आपला बचाव होतो.
त्याचप्रमाणे ओव्यामध्ये अँटी ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात असतात. ओवा हा उष्ण व पाचकदेखील आहे. ओव्यामध्ये थायमॉल नावाचा जो घटक आहे. तो आपल्या छातीमध्ये साठलेला कफ पूर्णतः पातळ करून छातीतील कफ नाहीसा करण्यासाठी आपणास मदत होते. मित्रांनो जरी तुमच्याकडे विड्याचे पान नसेल व फक्त ओवादेखील खाल्लात तरी तुमच्या घशातील इन्फेक्शन पूर्ण बरे होण्यास मदत होईल. तर अशाप्रकारे विड्याचे पान तुम्ही सेवन केल्यास तुमचा कसलाही भयंकर खोकला नक्कीच संपुष्टात येईल. तर मित्रांनो असा हा सोपा आणि घरगुती उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.