मित्रांनो थंडीचे दिवस आता सुरू झाले आहेत आणि लहान मुलांना खोकला वगैरे होत असतो. लहान मुलांना सर्दी झाली खोकला देखील लागतो मग हा खोकला कधी कोरडा असतो तर मग कधी छातीमध्ये कप साठतो. अशा खोकलांचा त्रास लहान मुलांना रात्रीच्या वेळी खूप होतो त्यांना याचा त्रास होतो. लहान मुलांना लागणाऱ्या खोकल्यावर तसेच घशामध्ये होणारी खवखव यावर कोणकोणते उपाय करायचे आहेत आणि ते उपाय कशा पद्धतीने केल्याने हा खोकला बरा होईल. याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये घेणार आहोत आणि हे उपाय आपण घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये कमी खर्चामध्ये कसे होतात याची माहिती घेणार आहोत.
पहिला उपाय लहान मुलांना लावलेला खोकला लवकरात लवकर बरा होण्यासाठी आपल्याला आपल्या घरच्या घरी जे स्वयंपाक घरामध्ये आपण मसाल्याचे पदार्थ वापरतो त्यातीलच काही पदार्थ घ्यायचे आहेत. ते म्हणजे लवंग आणि काळीमिरी आपल्याला समप्रमाणात घ्यायचे आहेत. आणि ते तव्यावर थोडे गरम करून घ्यायचे आहेत. म्हणजे जेणेकरून त्यातील ओलसरपणा निघून जाईल. व लवंग आणि काळी मिरची बारीक पावडर आपल्याला तयार करता येईल. लवंग आणि काळी मिरची पावडर तयार करून झाल्यानंतर अर्धा चमचा मध व अर्धा चमचा लवंग आणि काळी मिरची पूड एकत्र मिक्स करून बाळाला खाण्यास द्यायचे आहे.
आपण जे लवंग काळी मिरी व मधाचे चाटण आपल्या बाळाला चारणारा हात ते रात्रीच्या वेळी चालवायचे आहे. हे मिश्रण बाळाला चालवल्यानंतर बाळाला काहीही खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी द्यायची नाही. हे जर आपण रात्रीच्या वेळी बाळाला चारले किंवा खाऊ घातले तर आपले बाळ रात्रभर शांतपणे झोपेल व आपण चे औषध बाळाला चालवलेले आहे. ते पूर्ण बाळाच्या शरीराला लागू होईल. त्याची झोप तर शांतपणे पूर्ण होईलच. त्याचबरोबर त्याचा खोकला देखील कमी होईल. हा एक साधा आणि सोपा खोकल्यापासून सुटका करून देणारा व घरच्या घरी कमी खर्चामध्ये होणारा उपाय आहे.
दुसरा उपाय हा उपाय करण्यासाठी आपल्याला काळी मिरे व सुंठ त्यासोबतच मत देखील लागणार आहे. काळीमिरी भाजून घेतल्यामुळे त्याची पावडर व्यवस्थित होते. काळीमिरी चमचा घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा मध मिक्स करायचा आहे. आणि हे चाटण दिवसातून दोन-तीन वेळा बाळाला गरम पाणी पिण्यास देऊन औषधाची चाटण साठवायचे आहे. जेणेकरून गरम पाण्याने बाळाचा घसा साफ होईल. घशामध्ये असलेले इन्फेक्शन कमी होईल. गरम पाण्याने तर आपल्याला औषधाची चाटण साठवायचे आहे. आणि त्यानंतर पंधरा-वीस मिनिटे बाळाला काही खाऊ द्यायचे नाही. जेणेकरून हे औषध पूर्ण त्याला लागू होईल. हा देखील एक साधा आणि सोपा उपाय आहे.
तिसरा उपाय आपल्याला थोडे आले घ्यायचे आहे. आले किसणीने किसून त्याचा रस एक चमचाभर काढायचा आहे. व त्यामध्ये थोडे मध मिक्स करून याची देखील चाटण आपल्याला बाळाला पाठवायचे आहे. वर लेखांमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रत्येक उपायांमध्ये मध हा घटक कॉमन आहे. कारण मग घशाच्या अनेक विकारांना बरा करणारा व औषधी गुणधर्म असणारा पदार्थ आहे. त्याचबरोबर वरील उपाय करण्यासाठी जे आपण लवंग काळीमिरी आले किंवा सुंठ घेतलेला आहे. याची चव थोडीशी कडवट व तिखट असते. आणि हे तिखट आणि कडवट चवीचे पदार्थ लहान मुल खात नाही. ते पदार्थ रुचकर व चांगले होण्यासाठी त्यामध्ये आपण थोडेसे मध मिक्स करायचे आहे.
त्या मिश्रणामध्ये मध मिक्स केल्यामुळे त्याची चव देखील गोड होते. हा उपाय आपण एक वर्षावरील मुलांना करण्यासाठी आहे. कारण लहान मुलांना म्हणजेच एक वर्षाच्या आतील मुलांना आपण मत खाण्यासाठी देत नाही. त्यामुळे हा उपाय एक वर्षाच्या वरील मुलांसाठी करावा. जर आपण एक वर्षाच्या आतील बाळासाठी जर उपाय करणार असाल तर त्यांच्यासाठी एक ग्लास पाणी घ्यायचे आहे. त्या पाण्यामध्ये थोडी मिरे त्याचबरोबर लवंग आणि तुळशीची काही पाणी टाकून त्या पाण्याचा काढा करायचा आहे. जे पाणी आपण एक ग्लास वर ठेवलेला आहे. ते अर्धा ग्लास पाणी होईल इतका वेळ उकळायचे आहे.
जेणेकरून जे आपण औषधी वनस्पती किंवा औषधी गुणधर्म घातलेले आहेत. ते सर्व त्या काढयामध्ये उतरतील व त्याचा चांगला परिणाम होईल. व खोकला कमी होईल तसेच हा उपाय आपल्याला सहा महिन्याच्या वरील बाळांसाठी करायचा आहे. सहा महिन्याच्या आतील बाळांसाठी हा उपाय नाही. हे लक्षात घेणे खूप गरजेचे आहे. कारण सहा महिन्याच्या आतील बाळाला फक्त न फक्त आईचे दूधच असते. आणि जे काही औषधोपचार असतात. ते सर्व डॉक्टरांच्या सल्ल्याने दिले जातात त्यामुळे सहा महिन्याच्या आतील बाळ्यास वरील कोणताही उपाय करायचा नाही.
मित्रांनो ही माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित केलेली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.अशा प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.