मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीचे सौंदर्य वाढवण्यात केसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते आणि हे केस गळू लागतात तसतसे अनेक लोक उदास होतात. नाराज होतात आणि त्यावर अनेक उपाय करतात.तरीही केस गळणे थांबत नाहीत. मित्रांनो काही घरगुती उपाय जर तुम्ही केलात तर तुमचे केस गळणे कायमचे बंद होईल. त्यासाठी अत्यंत परिणामकारक उपाय सांगत आहे. मित्रांनो या पाण्याने तुमचे केस धुतले तर हे पाणी तुमच्या केसांसाठी संजीवनी ठरू शकते. तुम्ही नक्कीच या पाण्याचा वापर करा आणि मित्रांनो आपण केस विंचरण्यासाठी बरेच वेळा याचा त्याचा कंगवा वापरतो.
मित्रानो आपण कंगवा वापरतो किंवा प्रत्येकाच्याच घरात सर्व जण एकाच कंगव्याने केस विंचरतात आणि केस गळतीचे मुख्य कारण तिथूनच सुरुवात होते किंवा एक प्रकारचा केस गळतीला आमंत्रण आहे असं म्हणायला हरकत नाही. केसांच्या तक्रारी याच कंगव्यामुळे सुरू होतात म्हणून बऱ्याच व्यक्तींचे केस चांगले असताना देखील अचानक केसांची गळती सुरू होते. ती फक्त कंगव्यामुळेच.
त्याचप्रमाणे मित्रांनो केस गळण्यासाठी अनेक कारणे असतात. जसे रात्रीचं जागरण करणे, अवेळी झोपणे, तानतनाव, केस धुण्यासाठी तसेच आंघोळीसाठी अति गरम पाणी वापरावे. गरम पाणी केसावर टाकल्यामुळे केस वृक्ष, कोरडे होतात आणि केस गळायला लागतात.
त्याचप्रमाणे बऱ्याच ठिकाणी बोअरवेलचे पाणी वापरले जाते. त्यामुळे देखील खूप केस गळतात. मित्रांनो ह्या साठी हे पाणी अत्यंत गुणकारी आहे. मित्रांनो चीनमधील एका संशोधनामध्ये असं दिसून आलं की, चीनच्या महिलांचे केस सिल्की, शायनी आणि लांब असतात. याचे रहस्य काय ते तुम्हाला सांगणार आहे.
मित्रांनो हे पाणी बनविण्यासाठी आपल्याला फक्त तांदूळ आणि एक ग्लास पाणी लागणार आहे. मूठभर तांदूळ लागणार आहे. तर मित्रांनो हे पाणी कसे बनवायचे व केस कसे धुवायचे हे जाणून घेऊयात. आपल्याकडे भात शिजवताना तांदूळ धुतले जातात आणि तांदूळ धुण्यासाठी पाणी वापरलं जातं ते फेकून दिले जाते. आपण या पाण्याचा कुठलाही वापर करत नाही.
मात्र मित्रांनो ते पाणी केसांसाठी अत्यंत उपयुक्त असतं. त्या पाण्याचा परिणाम खूप चांगला असतो. त्यामुळे केस गळती कमी होते. केसांच्या सर्व समस्या कमी होतात आणि या उपायाचा आपल्याला चांगला परिणाम मिळावा म्हणून मी एक विशिष्ट पद्धत सांगणार आहे. तर मित्रांनो आपल्याला यासाठी साधारणत एक ग्लास पाणी लागणार आहे.
एक ग्लास पाणी वापरून हा प्रयोग आपल्याला करायचा आहे. एक ग्लास पाणी यामध्ये आपल्याला मूठभर तांदूळ संध्याकाळी भिजत घालायचे आहेत. ते तांदूळ आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचे आहेत. सकाळी ते फुगून मोठे होतील व त्या तांदळाचा अर्क पाण्यामध्ये उतरेल. अशा पाण्याचा परिणाम आहे तो चांगला मिळेल.
मित्रांनो सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून घ्या आणि तांदूळ बाजूला काढा. आंघोळ करण्यापूर्वी साधारणत दहा मिनिटे अगोदर हे केसांच्या मुळाला तसेच पूर्ण केसांना चांगल मालिश करून लावा. त्यानंतर दहा मिनिटानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे. आंघोळ करत असताना केसे फक्त कोमट पाण्याने धुवायचे आहेत.
साबण किंवा शाम्पू इतर कुठलीही गोष्ट वापरायची नाही. आणि महिलांचे केस खूप गुंतागुंतीचे असेल तर माइल्ड शाम्पू वापरू शकतात किंवा आयुर्वेदिक शाम्पू वापरू शकतात. वाटिका सारखे शाम्पू वापरले तरी चालेल. हा उपाय आठवड्यात दोन वेळेस करायचा. पुरुष सलग दोन ते चार दिवस करू शकतात.
मित्रांनो यामुळे तुम्हाला दोन ते तीन आठवड्यांमध्ये खूप चांगले परिणाम दिसतील. तुमचे केस लांबसडक, सिल्की, चमकदार व काळे देखील होतील. अकाली पांढरे झालेले केस काळे होण्यासाठी मदत होईल. हा उपाय सलग दोन महिने केल्यानंतर खूप चांगले परिणाम मिळतील.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.