मित्रांनो, आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात की,आपली प्रगती झाली की तुम्हाला तर माहित असेल की आपल्या प्रगतीतून खाली खेचण्याचे काम अनेक जण करत असतात. ते आपल्या प्रगतीवर जवळ असतात. अशा लोकांना आपण हँडल कसे करायचे? याबद्दलची माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
असं म्हणतात की माणूस जेवढ्या लवकर यशस्वी होतो किंवा त्याला यश मिळत जातं तेवढ्या लवकर त्याच्या शत्रू मध्ये वाढ होत जाते. त्याच्यावर जळणाऱ्या लोकांमधे वाढ होत जाते. याचा कोणाला दोष देणं हे चुकीचं ठरेल. कारण हा मनुष्य स्वभाव आहे. म्हणून आपण अश्या 6 गोष्टी बघणार अहोत ज्या करून तुम्ही तुमच्या शत्रू किंवा तुमचं न पटणाऱ्या लोकांना भांडणं न करता हरवू शकता. त्यांना नेसतनाबूत करू शकता.
हे कलियुग आहे आणि इथ आपल्या यशावर खुश होणाऱ्या लोकांपेक्षा जळणारे लोक जास्त मिळतील. आणि या इर्षा करण्याने समोरचा नकळत आपला शत्रू होऊन बसतो. आणि कुठ्ल्याही परिस्थिती तो आपल्यात पडायला खाली खेचायला बघत असतो. आणि अश्या कारण नसताना इर्षा करणाऱ्या लोकांनपासून कसं दुर राहायचं? त्यांना कसं टाळायचं? हा आपला सतत प्रयत्न असतो. अश्या लोकांना न भांडता अद्दल घडवायची तर या काही गोष्टी लक्षात ठेवा.
1) आपली बाजू किंवा आपला मार्ग सत्याचा असेल तर तो कधीच सोडायचा नाही. समोरचा आपल्याला खाली खेचण्यासाठी कितीही खालच्या पातळीवर उतरला तरी आपण त्याच्या सारखं वागायला जायचं नाही. शेवटी गीतेमधील शिकवणं लक्षात ठेवायची नेहमी धर्माचा, सत्याचा विजय होतो आणि अधर्म आणि असत्याचा नाश होतो. जसं पाच पांडवांच्या विजय झाला शंभर कौरावा समोर अगदी तस. म्हणून नेहमी लक्षात ठेवा समोरच खाली पाडण्यासाठी आपल्याला कटकारस्थान करण्याची गरज नाही. आपलं यश पुरेसं आहे. समोरच्याला उत्तर द्यायला.
2) प्रत्येक व्यक्तिला दुसऱ्या व्यक्ती दोष बघण्याची सवय असते. माणूस स्वतःमध्ये काय दोष आहेत ते कधीच बघत नाही. समोरचा किती अपराधी आहे हेच बघतो. आपण स्वतः काय काय अपराध केले आहेत हे कधीच पाहत नाही. काही लोकांना सवय असते एखाद्या कितीही चांगलं काम केलं तरी त्याला नावं ठेवायचे. त्यातले दोष काढायचे. म्हणून अश्या दोष काढणाऱ्या लोकांच्या नादी लागायचं नाही त्यांच्याशी वाद घालण्यात आपला वेळ वाया घालवायचा नाही.
3) शत्रूला कधीही कमी समजायचं नाही. आपण यश मिळवलं आहे म्हणून आपल्या आजूबाजूला आपल्या शर्यतीत आपल्याला टक्कर देण्यासाठी कोणी नाही असा समज करून घेऊ नका. आणि सगळे एकत्र येऊन तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतील तर अश्या वेळेस घाबरून जाऊ नका. स्वतः वर विश्वास कायम असू द्या. कोणी कितीही अडचणी निर्माण केल्या तरी दृढ विश्वास ठेवा. कधीच कोणासमोर हार मानू नका. आपल्या शत्रुची सगळी माहिती जाणून घ्यायची. यातच आपण आपली 80% लढाई जिंकलेली असते. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा स्वतः हून पहिला वार करायला जाऊ नका.
4) आपल्याला रागाला नियंत्रणात ठेवा. स्वतःवर संयम ठेवा. माणूस रागाच्या भरात चुकीचे पाऊल उचलतो किंवा अश्या काही गोष्टी करतो ज्या करायला नकोत. ज्या गोष्टीमुळे तो स्वतः अडचणीत सापडतो ते फक्त त्याच्या रागामुळे. समोरचा आपल्यावर जळतो आहे. इर्षा करतो आहे म्हणून रागात येऊ, त्याच्याशी भांडायला जाऊ नका. रागात येऊन भांडणं करायला जाल तर स्वतः च्या कमजोर बाजू समोरच्याला दिसणार आणि तुमचं नुकसान होणार. तेव्हां स्वतः च्या रागाला कंट्रोल मध्ये ठेवा. रागात माणूस आपली विचारशक्ती गमावतो आणि चुकीचं काही तरी करतो म्हणून ज्याने आपल्या रागावर कंट्रोल मिळवला त्याने अर्धी लढाई जिंकली.
5) बुद्धिहीन व्यक्तिपासून कायम दुर राहायचं. बुद्धिहीन व्यक्ती या पिषाच्य, समान असतात. बुद्धिमान व्यक्ती अश्या लोकांपासून कायम दुर राहते. कारण त्याला माहित असते बुद्धिहीन व्यक्ती दुष्ट लोकांना हाताशी धरून आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. दुष्ट लोकांसोबत कधीही संगत न ठेवलेली बरी. ज्यांची नियत साफ नसते अश्या लोकांपासून कायम दुर राहावे.
6) स्वभावात कठोरपणा असू द्या. कधी आपल्या आजूबाजूला असणाऱ्या, खराब लोकांना सभ्यतेची भाषा कळत नाही जशास तसे उत्तर कळून येते. म्हणून समोरच्या समोर आपण कमजोर आहोत असं कधीही दिसून येता कामा नये. आपण सगळ्या गोष्टींना समर्थपणे तोंड देऊ शकतो. तेवढा आत्मविश्वास समोरच्याचा आपल्या वागण्यात दिसायला हवा. जेणेकरून तो आपल्या वाटेला जाणार नाही. आपल्या स्वभावात कडवटपणा असू द्या आणि शत्रूला तो वेळोवेळी दिसायला हवा.कठोर वागताना किंवा जशास तर उत्तर देताना आपला सत्याचा मार्ग सुटता कामा नये. कितीही अडचणी आल्या तरी आपली लढाई ही चांगल्या हेतूने आणि चांगल्या कामासाठी असायला हवी.
अशाप्रकारे हे काही गोष्टी आहेत की ज्याचा अवलंब करून आपण आपल्यावर जळणाऱ्या लोकांना कंट्रोल मध्ये ठेवू शकतो.