मित्रांनो, तंत्रज्ञान जसजशी प्रगती करतंय, तसतसं अशा प्रकारच्या स्पाय डिव्हायसेसमध्ये मोठी वाढ झाली आहे. तसंच त्यांची उपलब्धतादेखील वाढली आहे. अशी डिव्हाईस आपल्या वैयक्तिक आयुष्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतात.सोशल मीडियावर हल्ली व्हायरल व्हिडिओंचा ट्रेंड सुरू आहे. आपण अनेक प्रकारचे व्हायरल व्हिडिओ पाहत असतो.
ते व्हिडिओ पाहिल्यावर ते कॅमेरामनने किंवा व्हिडिओ तयार करणाऱ्या व्यक्तीने कसे कॅप्चर केले असतील, असा प्रश्न अनेकदा पडतो; पण ते व्हिडिओ लोकांनी कॅप्चर केलेले नसतात. बहुतेक व्हिडिओ हे सीसीटीव्ही किंवा छुप्या कॅमेराद्वारे घेतले जातात. तंत्रज्ञान जसजशी प्रगती करतंय, तसतसं अशा प्रकारच्या स्पाय डिव्हायसेसमध्ये मोठी वाढ झाली आहे. तसंच त्यांची उपलब्धतादेखील वाढली आहे.
अशी डिव्हाईस आपल्या वैयक्तिक आयुष्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतात. कधी, कुठे, कसा कॅमेरा असेल सांगता येत नाही. त्यामुळे कधीही एखाद्या हॉटेलच्या रुममध्ये जाणं किंवा चेंजिंग रूममध्ये जाणं धोकादायक ठरू शकतं. या संदर्भात हर जिंदगी डॉट कॉमने वृत्त दिलंय. छुपे कॅमेरे केवळ आरशात टेबलमध्ये किंवा मोबाईलमध्येच नाही तर कपड्यांमध्ये, भिंतीत, दरवाजाच्या किहोलमध्येही लपवले जात आहेत.
मागे एकदा प्रयागराजमध्ये एका डॉक्टरच्या मुलाने मुलींच्या वसतिगृहाच्या बाथरूममध्ये छुपा कॅमेरा लावल्याची घटना समोर आली होती. अशी कोणतीही घटना टाळण्यासाठी, कोणत्याही नवीन ठिकाणी जाण्यापूर्वी असे कॅमेरे आहेत की नाही हे तपासून घ्या. याबद्दल काही बेसिक टिप्स आजच्या लेखातून आपण जाणून घेनार आहोत.
छुपे कॅमेरे कुठे असू शकतात?
छुपे कॅमेरे जिथे लपवले जाऊ शकतात, अशा जागा सर्वांत आधी शोधायला हव्या. टिश्यु बॉक्स, स्टफ टेडी बेअर, डिजिटल टीव्ही बॉक्स, घड्याळ (Watch), पेन, कपडे, टेबलाखाली, बाथरूममध्ये शॉवर हेडवर, दाराच्या वरच्या किहोलमध्ये, एसीमध्ये (AC), छतावरील पंखा (Fan) या ठिकाणी छुपा कॅमेरा असण्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यामुळे तिथे तपासायला हवं.
छुपा कॅमेरा आहे की नाही, कसं तपासायचं?
फक्त पाहिल्याने एखाद्या ठिकाणी कॅमेरा लपवला आहे की नाही, हे कळणार नाही. बहुतेक कॅमेरे सिग्नल, लाईट किंवा इतर प्रकारचे संकेत देतात, त्यावरून तुम्ही त्यांचा शोध घेऊ शकता.
हिडन लाइट चेक करा.
छुप्या म्हणजेच हिडन कॅमेऱ्यात LED लाइट चालू असते. हे नाईट व्हिजन कॅमेराचं (Night Vision) एक फीचर असतं. त्यामध्ये लाल किंवा अत्यंत हलका हिरव्या रंगाचा लाइट जळत असतो. तुम्ही जर रुममधील सर्व लाइट बंद करून अंधार केला तर हा लाइट तुम्हाला दिसू शकतो.
मोबाईल सिग्नलमध्ये अडथळा.
छुपे कॅमेरे रेडिओ फ्रीक्वेन्सीद्वारे काम करतात आणि ते मोबाइल सिग्नलमध्ये अडथळा निर्माण करतात. परिणामी, तुमचा कॉल वारंवार कट होईल किंवा आवाज नीट ऐकू येणार नाही. त्यामुळे तुम्ही कॅमेरा शोधण्यासाठी अशा ठिकाणी जाऊन कॉल करा, जिथे तुम्हाला कॅमेरा लपवल्याचे संकेत मिळतात.
आरशामागे असू शकतो कॅमेरा
ट्रायल रूम किंवा चेंजिंग रूममध्ये आरशामागे कॅमेरा लपवलेला असू शकतो. त्यामुळे आरशाचे कोपरे चेक करा आणि आरशाला बोट लावून तपासून पाहा. जर, तुमचं बोट जसं आहे, तसंच आरशात दिसत असेल तर आरसा ओके आहे. पण फरक दिसत असेल तर त्या आरशात गडबड असू शकते.याशिवाय अनेक मोबाईल फोन अॅप्सदेखील छुपे कॅमेरे शोधण्याचा दावा करतात, परंतु, त्यापैकी अनेकांचे दावे फोल ठरतात. त्यामुळे कुठेही गेलात, तरी सतर्क राहिलेलं कधीही चांगलं असतं.
अशाप्रकारे या काही ट्रिक्स वापरून आपण हिडन कॅमेरा चा शोध घेऊ शकतो.