मित्रांनो, आपला हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्याचे काही ना काही महत्त्व आहे. त्याचप्रमाणे मार्गशीष महिन्यात देखील खूप महत्त्वाचा मानला जातो. कारण या महिन्यांमध्ये प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. आपल्या घरातील सर्व सुख, समाधान, संपत्ती टिकुन राहावी. सर्व दारिद्र दूर व्हावे व माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळावा. यासाठी मार्गशीष महिन्यातील गुरुवारचे व्रत केले जाते व माता लक्ष्मीची पूजा देखील केली जाते. ही पूजा करते वेळी जर आपण हे फुल माता लक्ष्मीला अर्पण गेलेत तर आपल्या घरातील सर्व दारिद्र दूर होईल. आता हे फुल कोणते? तर याबद्दलचीच माहिती आजच्या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत.
प्रत्येकांची इच्छा असते की आपल्या घरातील सर्व दारिद्र दूर व्हावे. माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपला घरावर राहावा. त्याचबरोबर श्रीहरी विष्णूचा देखील वास्तव्य आपल्या घरामध्ये राहावे. कारण श्रीहरी विष्णूंच्या वास्तव ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी माता लक्ष्मी देखील वास्तव्य करत असतात यासाठीच आजच्या लेखांमध्ये आपण एक उपाय जाणून घेणार आहोत की जो केल्यामुळे आपल्या घरामध्ये श्रीहरी विष्णू व माता लक्ष्मीचे वास्तव्य घरातून राहील व आपल्या घरातील सर्व दारिद्र दूर होईल. घरात सुख समृद्धी व संपत्ती टिकून राहील.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक फुल घ्यायचा आहे. ते फुल म्हणजे गोकर्णीचे फुल. हे फुल माता लक्ष्मी व श्रीहरी विष्णूंना प्रिय आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते व व्रत देखील केले जातात. ही पूजा मांडण्याआधी आपल्याला हे फुल आपल्या घरामध्ये आणायचे आहे. घरामध्ये हे फुल आणल्यानंतर आपल्याला पूजा मांडायचे आहे. पूजा मांडल्यानंतर आपल्याला गोकर्णी चे फुल आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि थोडेसे कुंकू घ्यायचं आहे. कुंकु थोडेसे ओले करून घ्यावे व फुलाचा पुढचा जो भाग आहे तो त्या कुंकवामध्ये बुडवायचा आहे.
त्यानंतर आपल्याला अखंड 11 अक्षदा घ्यायचा आहे. या अक्षदा हळदीने पिवळा करून घ्याव्या. ते फुल व ह्या अक्षदा आपल्या उजव्या हातामध्ये घ्याव्यात आणि महालक्ष्मीच्या पूजेसमोर बसून ‘ओम श्री महालक्ष्मी नमो नमः’ या मंत्राचा जप 108 वेळा करायचा आहे. महालक्ष्मी अष्टकम किंवा सुक्तम यांचे पठण करायचे आहे. श्रीहरी विष्णूचे नामस्मरण करायचे आहे. त्यानंतर आपल्या मनातील ज्या काही इच्छा असतील त्या सर्वांची प्रार्थना आपल्याला लक्ष्मीला करायची आहे. त्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये थोडा अक्षदा घ्यायचा आहेत आणि आपण ज्या उजव्या हातामध्ये घेतलेले फुल व पिवळास केलेला अक्षदा या त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि लक्ष्मीच्या पूजा समोर आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे.
त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस लक्ष्मीपूजनाची कथेचे पठण करायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ही प्लेट आपल्याला घ्यायचे आहे आणि पिवळ्या किंवा लाल रंगाच्या कापडामध्ये आपल्याला या प्लेटमध्ये सर्व वस्तू त्या कापडात घालायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये एक रुपयाचे नाणी घालायचे आहे. आणि याची एखादी पोटली करून आपण ज्या ठिकाणी आपले धन ठेवतो त्या ठिकाणी ठेवायचे आहे. किंवा आपला जर कोणता व्यवसाय असेल तर तेथील धनाच्या ठिकाणी आपण ते ठेवू शकतो. जर तुम्हाला कुठेच ठेवू नये शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देखील हे ठेवू शकता.
हा उपाय तुम्हाला प्रत्येक गुरुवारी करायचा आहे. म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील जर तुम्ही पहिल्या गुरुवारी हा उपाय केला तर पुन्हा दुसऱ्या गुरुवारी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. असेच जर प्रत्येक गुरुवार तुम्हाला करणे शक्य असेल तर तुम्ही करू शकता. जर शक्य नसेल तर तुम्ही पाच गुरुवार, सात गुरुवार किंवा 11 गुरुवार हा उपाय करू शकता. ज्यावेळी आपण पुढच्या गुरुवारी हा उपाय करत असतो त्यावेळी मागच्या गुरुवारी केलेल्या उपायाची पोटलीतील फक्त फुल आपल्याला विसर्जित करायचे आहे आणि जे नाणे व अक्षदा आहेत तर त्या आपण परत त्याच वापरायचा आहे.
अशाप्रकारे हा साधा आणि सोपा करावयाचा उपाय आहे. जो केल्यामुळे तुमच्या घरातून सर्व दारिद्र दूर होईल, तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होतील, तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता चे वास्तव राहील, त्याचबरोबर श्रीहरी विष्णूचे देखील वास्तव्य टिकून राहील, घरामध्ये तुम्हाला कशाचीही कमतरता भासणार नाही, घरात सुख समृद्धी आणि आयुष्यभर होईल.
तुम्ही देखील हा उपाय नक्कीच करून बघा त्याचा फरक झालेला तुम्हाला नक्कीच जाणवेल.