तुम्हाला टोचून बोलणाऱ्या लोकांना आज अशी उत्तर द्या ……!!

Uncategorized

मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये आपल्याला दोन प्रकारचे लोक आपल्या आजूबाजूला वावरत असतात. यामध्ये पहिला प्रकार म्हणजे एक आपल्या प्रगतीला शाबास देणारे लोक आणि दुसरी म्हणजे आपला प्रगतीमध्ये चूक काढून तुम्हाला टोचून बोलणारे आहेत. हे लोक असे काही बोलून जातात की ज्यामुळे आपल्या मनावर खूप मोठा परिणाम होत असतो. तुम्हाला जर टोचून बोलणारा लोकांना उत्तर द्यायचं असतं तर खाली दिलेल्या सुविचारावरून तुम्ही नक्कीच त्यांना योग्य ते उत्तर देऊ शकता.

 

माणूस किमतीवरून नाही तर हिमतीवरून ओळखा, कारण शब्द फिरवणारी लाख मिळतील पण पाळणारा एखादाच मिळत असतो.!

तुम्ही दुसऱ्याकडून काय घेता यापेक्षा दुसऱ्याला काय देता यावर तुमचा आनंद हा अवलंबून असतो.

सत्यासाठी काही सोडून द्यावं पण कोणासाठीही सत्य सोडू नये.

शरीर पाण्यामुळे, मन सत्यामुळे आणि आत्मा ज्ञानामुळे पवित्र राहत असतो.

स्वार्थ साधून तीर्थ करण्यात काहीच अर्थ नाही इतकं जरी समजलं तरी जन्म व्यर्थ नसतो.

परिस्थिती कितीही थंड पडली तरी स्वप्ने कधी गोठली नाही पाहिजेत, त्यांना मस्त उकळी द्यावी आणि चहासारखे घोट घोट घ्यावेत, पण त्यासाठी असावी लागते ती जगण्याची इच्छाशक्ती ! भर थंडीतही शेकोटीसारखी पेटलेली !

संयम म्हणजे वाट पाहत बसणे नव्हे तर योग्य संधी येईपर्यंत प्रयत्न करत राहणे.

बोलणे बंद केल्याने नातं तुटत नाही कधी कधी नातं तुटू नये म्हणून बोलणं बंद करावं लागत असतं.

चांगल्या व्यक्तीची परीक्षा कधीच घेऊ नका कारण त्यांना झालेला त्रास ते तुम्हाला कधीच दाखवणार नाहीत मात्र ते तुमच्या आनंदासाठी तुमच्या आयुष्यातून शांतपणे निघून जातील!

फार कमावून गमावण्यापेक्षा मोजकं कमावून जतन करणे हे महत्त्वाचे असते मग तो पैसा असो किवा माणसं असो !

वय आणि सुंदरता पाहून जुळत नाही ते जुळतं सुंदर मन आणि त्यातील भावनांमुळे हे ठरवून होत नाही स्वभाव आणि मन जुळलं की नकळत प्रेम होत असतं.

शरीरावर प्रेम करणारे एकमेकांची जास्त वाट पाहत नसतात पण मनावर प्रेम करणारी संपूर्ण आयुष्यभर वाट पाहत असतात.

शत्रुने केलेलं कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती असते..!

गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा येणाऱ्या क्षणांसाठी मनमोकळेपणाने हात पुढे करा कदाचित आयुष्यात मागच्यापेक्षा काही चांगलं घडेल.

हवं तर.. भंगार विकून जीवन जगावं पण जीवनाला भंगार होऊ देऊ नये..!

संयमाचं प्रशिक्षण घेतलं की बरीच युद्ध शांतपणे जिकता येत असतात.

नात्यामध्ये या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात ऐकून घेणं, समजून घेणं आणि विश्वास असणं.

नात्यांमध्ये आदर आणि विश्वासाचा तोल घसरला की खाली शिल्लक राहते ती फक्त ओळख!

इमानदारी आणि मेहनत कधीच वाया जात नाही त्याचं फळ उशिरा का होईना पण जरूर भेटत असतं.

आपण ना कोणाचं मन दुखवायचं ना कोणावर हक्क गाजवायचा, फक्त शांत राहून आपलं आयुष्य जगायचं तसं पण आजकाल कोणाला काही फरक पडत नाही, की आपण खुश आहे किवा दुःखी आहोत!

स्वतःच्या तोंडाने खूप मोठेपणा सांगून माणूस मोठा होत नसतो, तो कसा आहे ते त्याच्या वागण्यावरूनच लोकांना दिसून येत असतं.

प्रेम करावे तर असे करावे की चार लोकांनी कितीही कान भरायचा प्रयत्न केला तरी दोघांमधला विश्वास आणि प्रेम थोडं ही कमी नाही झालं पाहिजे…!!

 

अशाप्रकारे हे काही सुंदर सुविचार आहे जे वाचून तुमचे मन अगदी प्रसन्न होईल.

Leave a Reply

Your email address will not be published.