मित्रांनो, आपल्या आहारात फळांचा खूपच फायदा होतो. फळे हे आपल्या आरोग्यास फायदेशीर ठरतात. अनेक आजारांपासून सुटका करून घेण्यासाठी फळांचा आहारात समावेश असणे कधीही चांगले. सकाळी 2 अंजीर असे खाल्ले, तर पायाखालची जमीन सरकेल कारण इतके फायदे आहेत की तुम्ही विचारच करू शकणार नाही. मित्रांनो, तुम्ही नेहमी इंटरनेट वर या सुक्या अंजीर म्हणजेच ड्राय फिग्ज खाण्याची खूप माहिती वाचली व बघितली असेल. असे सांगितले जाते की सुके अंजीर खाण्याचे हे फायदे आहेत. पण तुम्ही सगळे जाणता की सगळ्यांच्या शरीराची ठेवण प्रकृती एकसारखी नसते. कोणाच्या पोटात खूप जास्त प्रमाणात उष्णता असते, तर कोणाचे शरीर आतून थंड असते तर आपल्या आयुर्वेदामध्ये असे सांगितले आहे की वात, कफ व पित्त या प्रकृतीच्या लोकांनी अंजीर कशा प्रकारे खाल्ला पाहिजे.
मित्रांनो दुधाबरोबर कोणी खायचा आहे, मधाबरोबर कोणी खायचा आहे व रात्री भिजवून सकाळी कोणी खायचा आहे व सुके अंजीर कोणाला खायचे आहेत. याविषयी देखील माहिती असणे खूप गरजेचे आहे. मित्रांनो वेगवेगळे आजार, स्फूर्ति येण्यासाठी, अशक्तपणा दूर करण्यासाठी, थकवा दूर करण्यासाठी, कॅल्शियम कमतरता दूर करण्यासाठी, रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी, आळस जास्त असेल, चेहर्यावर चमक येण्यासाठी, रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी, केसांना मजबूत करण्यासाठी अंजीर कशा प्रकारे खाल्ला पाहिजे ते मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन वाचा.
मित्रांनो आपण सगळ्यात प्रथम जाणून घेऊया फायद्यांविषयी व कोणत्या वेळी व किती प्रमाणात अंजीर सेवन करायचे आहे. अंजीर हे चेहर्यावर चमक आणण्यासाठी खूपच फायदेशीर आहे. चेहर्यावर चमक राहात नसेल, गोरेपणा पाहिजे असेल, तर अंजीर कशा प्रकारे सेवन करायचा आहे ते बघूया. रात्री झोपताना तांब्याच्या भांड्यात २ ते ३ अंजीर भिजवून ठेवा. सकाळी उठल्यावर ते कोमट पाण्याबरोबर चावून चावून खायचे आहे आणि मित्रांनो अंजीरमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. प्रोटीन विटामीन सी, विटामीन ए, ओमेगा ३ फैटी अॅसिड असते, त्याशिवाय खूप खनिज पोषक तत्वे असतात जे चेहर्यावर चमक आणतात.
मित्रांनो दूसरा फायदा म्हणजे, तुमच्या घरात कोणालाही डोळ्याची दृष्टी कमकुवत होण्याची समस्या असेल, तर २ अंजीर रात्री झोपताना पाण्यात भिजवून ठेवायचे आहेत व त्यामध्ये १ चमचा खडीसाखर व १ चमचा बडीशेप, बदाम पाऊडर मिसळायची आहे आणि एकतर दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये मिसळून हे रिकाम्या पोटी सेवन करायचे आहे. प्राणायाम व व्यायाम करायचा आहे. अनुलोम विनोलम करायचे आहे. अंजीर खाण्याचा आणखी फायदा आहे. जर तुम्हाला बद्धकोष्टता असेल, पोट साफ होत नसेल, तर सकाळी उठून हिवाळ्यात पाण्यात न भिजवता मधाबरोबर अंजीराचे सेवन करायचे आहे. उन्हाळ्यात मातीच्या भांड्यात भिजवून सेवन करायचे आहे.
मित्रांनो अंजीरमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड असतात जे व्यायाम करताना स्नायूंना अधिक कॅलरी बर्न करण्यास मदत करतात. हे वजन कमी करण्याच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावते. हे हृदयाचे हृदयविकारांपासून रक्षण करते. अंजीरमध्ये खनिजे असतात जे वजन कमी करण्याचे ध्येय साध्य करण्यात मदत करतात. केवळ खनिजेच नव्हे तर जीवनसत्त्वे ए आणि बी ची उपस्थिती देखील पचन गती वाढविण्यात मदत करते आणि तुमची केसांची समस्या असेल, तर गाईच्या दुधात अंजीर भिजवून तो खायचा किंवा शिजवून खायचा आहे किंवा जर तुम्ही दररोज रात्री गाईच्या दुधामध्ये दोन अंजीर भिजत ठेवले आणि सकाळी त्याचे सेवन केले तरीही यामुळे आपल्याला अनेक फायदे होऊ शकतात.
तर मित्रांनो वरीलपैकी कोणत्याही प्रकारचा आजार तुम्हाला असेल आणि त्यापासून तुम्हाला सुटका हवी असेल तर तुमच्या आहारामध्ये अंजीरचा वापर अवश्य करा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.