प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अलका कुबल यांना आलेला श्री स्वामी सारामृत या पारायणाची आलेली प्रचिती वाचून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपण प्रत्येक जण हे स्वामी सेवेकर स्वामी भक्त आहोत स्वामि नेहमी आपल्याला अडचणीच्या वेळी मदत करत असतात आपल्यावर कितीही मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या तरी स्वामी आपल्याला कधीही एकटे सोडत नाहीत स्वामी नेहमी म्हणत असतात की अडचणी ना घाबरून जाऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे आपल्यावर कितीही मोठे प्रमाणात संकट आलं तर आपण त्याला कधीही न घाबरता सामोरे जायचे आहे स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय आपण करत असतो.

 

स्वामींची पूजा प्रार्थना जप पारायण असे वेगळे प्रकारचे आपण मार्ग शोधत असतो तर मित्रांनो स्वामींना प्रसन्न करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो पण सर्वांना स्वामींचा अनुभव येत नाही मित्रांनो आज पर्यंत तुम्ही फक्त स्वामींचा अनुभव कुठेतरी ऐकलाअसशीलाग वाचला असशील आपण आज आपण तो अनुभव जाणून घेणार आहोत. मित्रांनो आजचा जो अनुभव आपण ऐकणार आहोत तो म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री अलका कबूल यांना स्वामींचा आलेली प्रचिती त्यांच्या शब्दातच आपण आता वाचूया.

 

माझ्या वहिनी व माझ्या माहेरचे सर्व सदस्य स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी आहेत आणि त्यांच्या सोबतच मला स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जाण्याची संधी मिळाली. कोणत्यातरी कार्यक्रमाच्या निमित्ताने मी चिपळूणला गेले होते व चिपळूण मध्ये असलेल्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्राकडे जाण्यासाठी माझे पाय ओढले जात होते. याआधी मला ‘तोची एक समर्थ’ नावाचा पिक्चर करण्याचा योग आलेला होता.ह्या पिक्चर मध्ये मी चोळापाच्या पत्नीची कारकीर्द करण्याची मला संधी मिळाली होती.

 

 

या फिल्मचे निर्माते होते ते स्वामीभक्त होते आणि चोळापाच्या पत्नीची भूमिका मला मिळाल्यामुळे मी खूप खुश होते. मात्र माझी मुलगी ही खूप लहान होती. ती अवघ्या तीन वर्षांची होती. ह्या लहान मुलीला घेऊन मी कोल्हापूरला जाऊन येऊन माझी भूमिका कशी करणार? असा मला प्रश्न पडलेला होता. मात्र स्वामींचा आशीर्वाद माझ्यावर असल्यामुळे सर्व काही निर्विघ्नपणे माझ्याकडून पूर्ण होत होते. ही भूमिका साकारत असताना मला कोणत्याही प्रकारची अडचण किंवा समस्या आलेली नाही.

 

कोणत्याही प्रकारचे कार्य स्वामी आपल्याकडून कसे करून घेतात. याचा मला अनुभव त्यावेळी आला. माझ्या घरापासून लोखंडवाल्यांचा मठ खूप जवळ आहे. त्यामुळे प्रत्येक गुरुवारी त्या मठामध्ये जाणे माझे होत होते. स्वामी समर्थ महाराजांकडे काहीही मागावे लागत नाही. कारण स्वामी समर्थ महाराज आपल्याला जे हवे आहे. ते कधी देत नाहीत मात्र जे आपल्यासाठी चांगले आहे. ते आपल्याला दिल्याशिवाय राहत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे मला काहीही मागावे लागले नाही.

 

 

न मागताच मला सर्व काही मिळत गेले. कारण स्वामी समर्थ महाराजांची सेवा मनापासून व भक्तिने, निष्ठेने जे करतात त्यांना सर्व काही मिळते. त्यांना कोणतीही गोष्ट सांगावी लागत नाही. आपण न सांगताच त्यांना आपल्या सर्व समस्या किंवा आपल्याला जे काही हवे आहे ते सर्व समजते आणि ते आपल्याला देतात. माझ्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या दोन मुर्त्या होत्या. माझ्या सासुबाई बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. त्यांचे चालणे फिरणे होत होते. मात्र ते आता या जगामध्ये नाहीत. त्यांचे निधन झाले आहे.

 

एके दिवशी मी पेपर वाचत बसले होते व माझ्या सासुबाई ज्या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती ठेवलेली होती. त्या ठिकाणी गेल्या व स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती खाली टाकल्या. मूर्ती खाली टाकल्यामुळे मूर्तीचे तुकडे झाले. मूर्तीचे तुकडे झालेले पाहून मला रहावले नाही. माझ्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. त्यावेळी माझ्या सासूबाईंचे वय 85 होते. त्यांचे वागणे लहान मुलांसारखे झाले होते. त्यांना मी काहीही बोलू शकत नव्हते. स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिना दिवशी आईंनी असे का केले असेल असा मला प्रश्न पडला होता.

 

 

स्वामींची मी माफी मागितली. मात्र तो घडलेला प्रकार माझ्या मनातून जात नव्हता. असे का घडले? असा प्रश्न मला वारंवार पडत होता. जेव्हा मी सोलापूरला गेले, तेव्हा स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती घडवणारे संदीप पवार भेटले. व त्यांनी मला स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती भेट दिली. स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती घेत असताना माझ्या अंगावर सरसरून काटा आला. आणि ती मूर्ती घेऊन मी घरी आल्यानंतर ती मूर्ती आहे. त्या ठिकाणीच ठेवली. मनामध्ये एक वेगळाच आनंद होता. कारण स्वामी समर्थ महाराज पुन्हा माझ्या घरामध्ये आले हा आनंदच वेगळा होता.

 

सासुबाईंच्या हातून स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती खाली टाकली जावी. व त्याचे तुकडे व्हावे, यामागे काहीतरी संकेत असतील. कारण 85 वर्षाच्या सासुबाई असल्यामुळे मी त्यांना काहीही बोलू शकत नव्हते. आमच्या घरावर आलेले कोणते तरी संकट यामुळे दूर होणार असेल असे माझ्या मनात आले. कारण त्यांची तब्येत व्यवस्थित होती. त्यावेळी त्या माझ्यासोबत स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये म्हणजेच केंद्रामध्ये येत होत्या. असे का होते हे मला कळत देखील नव्हते. मात्र माझ्या आयुष्यामध्ये जे काही चांगले घडलेले आहे.

 

मला जे काही यश आलेले आहे. ते स्वामी समर्थ महाराजांमुळेच आलेले आहेत. मला जे काही मिळालेले आहे किंवा मिळत आहे. ते सर्व स्वामी कृपेमुळे व त्यांच्या आशीर्वादामुळेच मिळत आहे. मला स्वामी समर्थ महाराजांच्या परिवारापैकी कोणीही भेटले तर मला खूप आनंद होतो. कळत नकळत स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये असणारी माणसे महाराजांचा परिवार एका माळेमध्ये गुंफलेला असतो आणि आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचे वाक्य तर सर्वांनाच माहित आहे की, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. ते प्रत्येक सुखदुःखामध्ये आपल्या सोबत असतात असा माझा आलेला अनुभव आहे.

 

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.