मित्रांनो, स्वामी समर्थ हे आपल्या प्रत्येक भक्ताला अनेक अडचणीतून मार्ग हे दाखवतच असतात. तसेच भक्तांच्या ज्या काही अडचणी किंवा संकटे असतात ते स्वामींच्या होऊन जातात. त्या अडचणी, संकटे नक्कीच दूर करत असतात. मित्रांनो कोणी मनामध्ये कोणतेही अविचार न आणता जर आपण मनोभावे सेवा केली तर स्वामी त्या भक्तावर प्रसन्न होतात. आपला कृपा आशीर्वाद त्या भक्ताला देतात. मित्रांनो स्वामींचे अनुभव प्रचिती बऱ्याच जणांना आलेले आहेत.
तर मित्रांनो असाच एक अनुभव आज आपण पाहणार आहोत. हा अनुभव अक्षय राजेंद्र दबडे त्यांना आलेला आहे आणि हा अनुभव आपण त्यांच्याच शब्दांमध्ये पाहणार आहोत.
नमस्कार मित्रांनो मी अक्षय. मी स्वामींचा भक्त आहे. माझा त्यांच्यावर विश्वास देखील आहे. मी स्वामींच्या थोडेफार सेवा देखील करीत होतो. परंतु मला जो अनुभव जी प्रचिती आलेली आहे तेव्हापासून तर माझा स्वामीवरचा विश्वास आणखीनच वाढला. माझा हा अनुभव मी कधीही विसरणार नाही. डोळ्यात पाणी आणण्यासारखा हा अनुभव आहे आणि हा अनुभव आज मी तुम्हाला सांगणार आहे.
माझ्या मोठ्या भावाची तब्येत खूपच बिघडलेली होती. त्यामुळे आम्ही खूपच सगळेजण टेन्शनमध्ये होतो आणि भावाला म्हणजेच माझ्या दादाला दवाखान्यांमध्ये घेऊन गेलो. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांचे ब्लड चेक केले आणि रिपोर्ट आल्यानंतर आम्हाला कळाले की माझ्या दादाला डेंग्यू झाला आहे.
परंतु डॉक्टरांनी सांगितले की ही डेंगू ची पहिली स्टेप असल्यामुळे जास्त घाबरायचे काही कारण नाही. सलाईन आपण जर लावली तर त्याचा त्रास नक्की कमी होईल. मग दिवसभर माझ्या दादाला सलाईन लावले. मग दादाला थोडेसे बरे वाटल्यानंतर आम्ही संध्याकाळी त्याला घरी घेऊन आलो.
दुसऱ्या दिवशी मी माझ्या ऑफिसला गेलो आणि संध्याकाळी मी जेव्हा घरी आलो त्यावेळेस मी आईला विचारले की दादाची तब्येत कशी आहे? त्यावेळेस आई मला सांगायला लागली की सकाळपासून दादाची तब्येत खूपच बिघडलेली आहे. त्याची काहीच हालचाल होत नाही. तेव्हा मात्र मला खूपच टेन्शन आलं . मी आणि माझ्या वडिलांनी पाहिलं तर ते खरंच होतं. कारण कोणत्याही प्रकारची हालचाल माझ्या दादाची होत नव्हती.
दादाला गाडीवर बसवन देखील शक्य नव्हते व त्यावेळेस मी फक्त हात जोडून स्वामींना विनंती केली की माझ्या दादाची थोडीफार तरी हालचाल होऊ दे. मित्रांनो काय चमत्कार तर माझ्या दादाचा पाय आणि हात जो हलत नव्हता तो थोडाफार घालायला लागला. मग आम्ही लगेचच दादाला गाडीवर बसवून आम्ही त्याला दवाखान्यात नेलं.
दवाखान्यात गेल्यानंतर परत ब्लड चेक केले तर त्यामध्ये रिपोर्ट आले की पहिल्यांदा तर डेंगू झालेला होता. परंतु व्हायरल इन्फेक्शन मुळे त्याच्या नसा होत्या त्या नसा काहीच काम करत नव्हत्या. त्यावेळी डॉक्टरांनी माझ्या दादाला जीवाचा धोका आहे असे देखील आम्हाला स्पष्ट सांगितले. मोठ्या दवाखान्यात हलवा असे सांगितले. त्यावेळेस मला आणि माझ्या पप्पांना काही सुचत नव्हतं.
त्यावेळेस जो मला पाठबळ देणारा व्यक्ती होता ते म्हणजे सचिन सर. ते माझ्या ऑफिसमध्ये मॅनेजमेंटचे काम पाहत होते. ते स्वामींचे भक्त होते. त्यांचा स्वामी वरती खूपच विश्वास होता. तर मी त्यांना फोन केला तर त्यांना हे सर्व काही सांगितलं. तर ते म्हणाले की आता संध्याकाळ झाली आहे आपण दादाला त्या हॉस्पिटल मधून हलवायला नको आणि सकाळी आपण बघू काय होते आणि सकाळपर्यंत नक्कीच दादा ची तब्येत ठणठणीत होईल.
मग मी ठीक आहे म्हणालो आणि डॉक्टरांच्या केबिन मध्ये गेल्यानंतर तेथे स्वामींचा फोटो लावलेला दिसला. मी अगदी मनोभावे स्वामी समर्थांच्या फोटोला नमस्कार केला आणि सर्व काही ठीक होऊ दे एवढेच म्हणालो. नंतर मी घरी आलो. आईला सांगितले त्यावेळेस आई खूपच रडायला लागली.
त्यावेळेस आईने मला सचिन सरना फोन करायला सांगितले आणि ती बोलली की, माझ्या बाळाला बरे करा. तेव्हा सचिन सर आईला म्हणाले की सकाळी सर्व काही ठीक होईल. तुम्ही आता शांत झोपा. आम्ही सर्वजण झोपलो तर मला स्वप्नमध्ये डॉक्टरांच्या केबिनमध्ये जो फोटो होता त्या फोटोतून स्वामी प्रकट झालेले आहेत आणि ते माझ्या दादा जवळ येऊन माझ्या दादाच्या हातावरून, पायावरून, सर्व शरीरावरून ते हात फिरवत होते.
ते नंतर परत त्या फोटोमध्ये विलीन झाले. मला एकदम जाग आली तर पाहतो तर अडीच वाजलेले होते म्हणून मी परत झोपलो. त्याच रात्री सचिन सरांना देखील स्वप्नांमध्ये असे जाणवले की, त्या दवाखाण्याच्या गॅलरी वरती स्वामी बसलेले आहेत. नंतर सकाळी आम्ही जेव्हा दवाखान्यात जाणार होतो त्यावेळेस पप्पांचा दवाखान्यातून फोन आला की, दादाची तब्येत ठीक आहे. पूर्ण शरीराची हालचाल होत आहे.
तर मी लगेच सचिन सरांना फोन केला आणि हे सर्व झालेली हकीकत सांगितले. आम्ही लगेच दोघेजण दवाखान्यात गेलो. डॉक्टरांच्या केबिनमध्ये स्वामी समर्थांचा फोटो होता त्याला अगोदर वंदन केले आणि मगच दादाला बघायला गेलो.
आम्हाला खूप आश्चर्यच वाटले. त्यावेळी सचिन सरांनी सांगितले की ज्या वेळेस आईने रात्री फोन केला होता त्यावेळी सचिन सरांनी स्वामी समर्थांना साकडे घातले होते की, दादांना बरे करा. 21 अध्याय वाचतो. तुमच्याशिवाय आम्हाला कोणीही नाही अशक्य ते तुम्ही शक्य करून दाखवा आणि हे सगळे साकडे त्यांनी मला सांगितले.
मला खरंच विश्वास बसत नव्हता की माझा दादा जो मृत्यूच्या मृत्यूच्या दाढेत अडकलेला होता परंतु स्वामींनी त्याला बाहेर काढलं होतं. स्वामींनी आपली कृपा माझ्या दादावर ठेवली तसेच माझ्या कुटुंबावर ठेवली. तर मी हा स्वामींचा अनुभव कधीही विसरणारा नाही. हा अनुभव मी तुम्हाला सांगत आहे परंतु माझ्या शरीरावर शहारे येत आहेत. खरंच स्वामी हे आपल्या भक्ताला प्रत्येक अडचणीतून मार्ग दाखवतात. बाहेर काढतात. अशक्य ही गोष्ट शक्य करून दाखवतात.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.