मित्रांनो आता काही दिवसांमध्येच महाशिवरात्रीला सुरुवात होणार आहे दरवर्षीप्रमाणे माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते मित्रांनो यावर्षी पंचांगानुसार महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11: 08 ते 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 08: 54 पर्यंत आहे पूजा मुहूर्त पहिले तर महाशिवरात्री बुधवार 26 फेब्रुवारी रोजी आहे महाशिवरात्रीचे उपवासाने पूजा त्याच दिवशी होणार आहे.
आपण वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतो किंवा महादेवाची जी काही व्रतवैकल्य वर्षभरामध्ये करतो त्या सगळ्या आवरतांच पुण्य आपल्याला फक्त एका महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळत असते त्यामुळे प्रत्येकानेच महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून करायचे आहे ज्या मुला मुलींचा विवाह होण्यास अडचण येत आहे त्यांनी देखील महाशिवरात्रीचे व्रत करायची आहे ज्यामुळे लवकर असताना मनासारखा जोडीदार मिळणार आहे तसेच सौभाग्यवती महिलांना हे व्रत केल्या सौभाग्य अखंड राहते अशी देखील मान्यता आहे
मित्रांनो काही महाशिवरात्रीचे उपवासाचे नियम आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत..
मित्रांनो पहिला नियम आहे तो म्हणजे महाशिवरात्रीमध्ये उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यामध्ये काळे तीळ टाकून आंघोळ करायची आहे शक्य असल्यास गंगास्नान करावे किंवा आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिक्स करून देखील तुम्ही आंघोळ करू शकता.
मित्रांनो दुसरा नियम आहे तो म्हणजे उपवासाचे इच्छित फळ मिळण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलहार करून उपवास पकडावा परंतु ज्यांना काही कारणास्तव फलहार वर उपवास करायचा नसेल तर ते फराळ करू शकतात पण पांढरे मीठ वापरणे ऐवजी सैंधव मीठ वापरावे असे म्हटले जाते. शेवटी उपवास आपला श्रद्धा आणि भक्तीवर असतो तुम्ही फलहार करून उपवास करा किंवा फराळ करून फक्त मनोभावे तुम्हाला उपवास करायचा आहे मनातील इच्छा भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करतील
मित्रांनो तिसरा नियम आहे तो म्हणजे कांदा, लसूण मांसाहार दारू यासारखे तामसिक पदार्थाचे उपवासाच्या दिवशी सेवन करणे टाळायचे आहे उपवास करायचा असेल तरीदेखील आणि जे उपवास करत नसतील त्यांनी देखील किमान महाशिवरात्री दिवशी या पदार्थांचे सेवन करू नका.
मित्रांनो चौथा नियम आहे तो म्हणजे उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवांची मनोमन आराधना करायची आहे या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करायचा आहे यामुळे आयुष्यातले दुःख संकटे नष्ट होतात.
मित्रांनो पाचवा नियम आहे तो म्हणजे व्रताच्या दिवशी दिवसाला झोपू नये शास्त्रानुसार दिवसाला झोपल्याने आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील ते झोपू शकतात.
मित्रांनो सहावा नियम आहे तो म्हणजे महाशिवरात्रीचे प्रत काहीजण निर्जला म्हणजेच काही न खाता पिता किंवा केवळ पाण्यावर काहीजण फलहार तर काही फराळ करून करतात आपल्या इच्छाशक्ती नुसार आणि शारीरिक क्षमतेनुसार व्रत कसे करायचे ते ठरवायचा आहे दुसऱ्यांच्या हेवा करून व्रत करू नका.
मित्रांनो सातवा नियम आहे तो म्हणजे जर फराळ करून व्रत करत असाल तर साध्या मिठाऐवजी सेंधव मीठाचा उपयोग करावा.
मित्रांनो आठवा नियम आहे तो म्हणजे उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावे म्हणून स्त्री पुरुष दोघांनी ब्रह्मचर्याने पालन करावे.
मित्रांनो नववा नियम आहे तो म्हणजे उपवासाच्या दिवशी कोणाशी भांडण तंटा करू नये किंवा निंदा करू नये खोटे बोलून दुसऱ्यांचे मन दुखावू नये आपले आचरण केवळ सातविक ठेवावे.
मित्रांनो दहावा नियम आहे तो म्हणजे शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय महत्त्व सांगितले आहे काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवांची पूजा मंत्र जप केला जातो यामुळे व्रताचे फळ दुप्पट मिळते अशा मान्यता आहे हे केवळ आपल्या श्रद्धेवर अवलंबून आहे.
मित्रांनो अकरावा नियम आहे तो म्हणजे उपवासाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी व्रत सोडावे त्यासाठी सात्विक अन्नपदार्थ घ्यावे.
मित्रांनो बारावा नियम आहे तो म्हणजे ज्या स्त्रियांना मासिक पाळी आली असेल त्यांनी व्रत करा केवळ पूजा करू नये मनापासून श्रद्धेने व्रत केल्यास पुजा न करता देखील तुम्हाला व्रताचे फळ मिळणार आहे.
मित्रांनो तेरावा नियम आहे तो म्हणजे गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तरच उपवास करावा नाहीतर केवळ भगवान शंकरांची पूजा विधी आणि मंत्र जप केला तरी देखील चालू शकते.
मित्रांनो चौदावा नियम आहे तो म्हणजे महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर हा पदार्थ खाल्ला जातो पण काही भागांमध्ये अशी मान्यता आहे की सोमवारच्या उपवासाला भगर खाऊ नये आमच्याकडे देखील सोमवार आणि महाशिवरात्री उपवासाला भगर म्हणजेच की शाबू खाल्ले जात नाही तुम्ही देखील महाशिवरात्रीला भगर खाऊ नका परंतु तुमच्याकडे खात असतील तर तुम्ही खाऊ शकता.
मित्रांनो पंधरावा नियम आहे तो म्हणजे सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुवू नये धुवायचे असतील तर आधीच्या दिवशी धुवावे.
मित्रांनो सोळावा नियम आहे तो म्हणजे यश समृद्धी शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र धतुराचे फळ कच्चे तांदूळ दूध दही चंदन तूप आणि भांग उस अर्पण करायचे आहे या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेल्या मिठाई बर्फी पेढा आणि खीर यासारखे पदार्थ भगवान शिवाला अर्पण करायचे आहेत तसेच पार्वतीला शृंगारचे साहित्य अर्पण करायचे आहे महाशिवरात्री व्रताची पूजा चारही प्रहरत करणे अत्यंत शुभ मानले जाते पूजेच्या प्रत्येक वेळी ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा याशिवाय शक्य असल्यास उपवासाच्या काळात रुद्राभिषेकही करावा.
मित्रांनो सतरावा नियम आहे तो म्हणजे उपवासाच्या दिवशी सकाळी शक्य असल्यास ब्रह्म मुहूर्तावर उठून भगवान शिवांची मनोभावे पूजा मंत्र जात केल्यास इच्छित फळ मिळते. त्यानंतर न सूर्योदय झाल्यावर सूर्यदेवाला अर्ध जल देखील अर्पण करायचे आहे आणि व्रताचा संकल्प घ्यायचा आहे.
मित्रांनो 18 वा नियम आहे तो म्हणजे महाशिवरात्री उपवासासाठी शुद्धतेला विशेष महत्त्व आहे या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे त्यानंतर नित्याची पूजा करायची आहे
मित्रांनो विसावा नियम आहे तो म्हणजे संतती प्राप्तीची इच्छा असेल तर जोडीने श्रद्धापूर्वक भगवान शंकरांची पूजा करून उपवास केल्यास निश्चितपणे फळ मिळते आणि संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होते.
मित्रांनो एकविसावा नियम आहे तो म्हणजे भगवान शंकराची पूजा करण्यापूर्वी शिवलिंगाला पंचामृताने म्हणजेच की दूध दही तूप मध आणि साखर केव्हा गंगाजलाने स्नान करायचे आहे त्यानंतर पूजा करून दिवा आणि धूप लावायचा आहे.
मित्रांनो 22 वा नियम आहे तो म्हणजे शिवरात्रीची पूजा रात्री एकदा किंवा चार प्रहर म्हणजे चार वेळा देखील करता येते ते आपल्या इच्छेनुसार करावे.
मित्रांनो 23 वा नियम आहे तो म्हणजे भगवान शिवाला अर्पण केलेल्या कोणत्याही वस्तूचे सेवन करू नका कारण असे मानले जाते की ते दुर्दैव आणते
मित्रांनो 24 वा नियम आहे तो म्हणजे केवढा आणि चंपा सारखी फुले अर्पण करू नका कारण त्यांना भगवान शिवाने शाप दिला आहे अशी पूर्वापासून म्हटलेली मान्यता आहे.
मित्रांनो 25 वा नियम आहे तो म्हणजे या पूजेदरम्यान भाविकांनी कधीही कुंकूचा तीलक लावू नये त्या ऐवजी चंदनाचा तीलकाला प्राधान्य द्यावे.
मित्रांनो 26 वा नियम आहे तो म्हणजे उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो त्यामुळे शरीराला अतिरिक्त त्रास देऊन उपवास करू नका जे तुम्हाला शक्य होईल आणि जमेल त्यानुसार उपवास करायचा आहे.
मित्रांनो 27 वा नियम आहे तो म्हणजे उपवास करणाऱ्या भाविकांनी तांदूळ डाळी आणि गहू यापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळायचे आहे.
मित्रांनो 28 वा नियम आहे तो म्हणजे पूजा करताना शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये चुकूनही भोलेनाथांना तुळशीची पाने अर्पण करू नयेत..
मित्रांनो 29 वा नियम आहे ते म्हणजे पूजेत शेंदूर किंवा हळद लावणे टाळायचा आहे.
मित्रांनो तिसावा नियम आहे तो म्हणजे मधुमेह उच्च रक्तदाब किंवा इतर वैद्यकीय समस्यांसारखे आरोग्यविषयक समस्या असलेल्या व्यक्तींनी उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्यायचा आहे.
तर मित्रांनो हे काही उपाय आहेत हे तुम्हाला आवश्यक आणि आवर्जून पाळायचे आहेतच.