मृत्यूच्या आधी आपल्याला यमराज कडून मिळतात हे संकेत? एकदा नक्की पहा … गरुड पुराण

Uncategorized

मित्रांनो, हिंदू धर्माच्या सर्व 18 पुराणांमध्ये गरुड पुराणाचे खूप महत्त्व आहे. यामध्ये भगवान विष्णु आणि त्यांचे वाहन गरुडमधील बातचीतचे वर्णन करण्यात आलेले आहे. या पुराणात मृत्यू आणि त्या नंतरविषयीचं सविस्तर सांगण्यात आलंय. हे पुराण कुणाचा मृत्यू झाल्यानंतरच वाचावं लागतं. यामध्ये स्वर्ग, नरक, पाप, पुण्य ज्ञान, नीति, नियम आणि धर्माच्या गोष्टींविषयी वर्णन दिलंय.. गरुड पुराणात सांगितल्याप्रमाणे जेव्हा कोणाचा मृत्यू होत असतो तेव्हा त्याला त्याआधी काही संकेत मिळतात. याचीच माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

 

कोण आपल्याला कधी कायमचं सोडून जाईल हे सांगता येत नाही. आता तर अगदी कमी वयात देखील मृत्यू होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे लोकांना मृत्यूची भीती वाटायला लागली आहे.मृत्यूच्या वेळी कसे वाटते किंवा मृत्यूपूर्वी चिन्हे कशी दिली जातात हे जाणून घेण्याची सर्वसामान्यांच्या मनात उत्सुकता असते. धार्मिक ग्रंथांमध्ये मृत्यूबद्दल बरेच काही लिहिले गेले आहे. यामध्ये मृत्यू, त्यानंतरचा आत्म्याचा प्रवास आणि पुनर्जन्म यांच्याबद्दल बरंच काही सांगण्यात आलं आहे. गरुड पुराणात सांगितले आहे की मृत्यूपूर्वी माणसाच्या शरीरात कोणते बदल होतात आणि त्याला कसे वाटते.

 

माणसाला आपल्या मृत्यूच्या आधी त्याच्या आयुष्यातील जुने दिवस पुन्हा आठवायला लागतात. ज्याद्वारे त्याला त्याच्या आयुष्यातील चांगले वाईट कर्म आठवतात. तो इच्छा नसतानाही हे थांबवू शकत नाही. यामुळे त्याचं मन अशांत होत जातं. गरुड पुराणमध्ये सांगितल्या प्रमाणे जेव्हा व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याला एक रहस्यमयी द्वार दिसायला लागतं. कुणाला आगीचा ज्वाळा दिसतो तर कुणाला तेज प्रकाश दिसतो. हे संकेत सांगतात की त्याचा मृत्यू जवळ आलाय.

 

हातावरील रेषा माणसाचं संपूर्ण आयुष्य दाखवतं. जेव्हा व्यक्तीचा मृत्यू जवळ येत असतो तेव्हा हातावरील रेषा पुसली जाते. जेव्हा व्यक्तीचा मृत्यू जवळ येतो तेव्हा त्याला यमदूत दिसतं. व्यक्तीला वाटतं की नकारात्मक शक्ति त्याच्याजवळ आली आहे. व्यक्तीला मृत्यूआधी अनेक विचित्र स्वप्ने दिसायला लागतात. स्वप्नात पूर्वज दिसतात आणि त्यांची भेट होताना दिसते. याशिवाय स्वप्नात पूर्वजांना स्वप्नात रडताना पाहणे, हे सुद्धा मृत्यूपूर्वीचे एक संकेत असते. गरुड पुराणात सांगितले आहे की जर मृत्यू जवळ आला असेल, तर व्यक्तीला सूर्य आणि चंद्राचा प्रकाश दिसणे बंद होते.

 

मृत्यूपूर्वी व्यक्तीच्या शरीरात किंचित पिवळसरपणा किंवा पांढरेपणा दिसू लागतो. जणू त्याच्या शरीरातील रक्त कमी होत चालले आहे. मरणासन्न व्यक्तीला आपली सावली दिसत नाही. हे ती व्यक्ती मृत्यूच्या अगदी जवळ असल्याचे लक्षण आहे. त्याच वेळी, मृत्यूच्या दोन-तीन दिवस आधी, व्यक्तीला त्याच्या आजूबाजूला अदृश्य शक्तींचे अस्तित्व जाणवू लागते. त्याला यमराजाचे दूत दिसू लागतात. यमराजाच्या दूतांना पाहून तो घाबरतो म्हणून जवळ उभे असलेत लोकही त्याला दिसत नाहीत. याशिवाय मृत्यूच्या काही वेळापूर्वी व्यक्तीच्या शरीरातून विचित्र वासही येऊ लागतो.

 

गरुड पुराणानुसार, मृत्यूच्या २४ तास आधी व्यक्तीला आरशात आपला चेहरा दिसणे बंद होते. तेल किंवा पाण्यातही त्याचा चेहरा दिसत नाही. मरण्यापूर्वी माणसाला अनेक प्रकारची चिन्हे दिसतात. मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी, त्याच्या शरीराच्या अनेक भागांवर परिणाम दिसू लागतो. व्यक्तीची जीभ काम करणे थांबवते, ती चव गमावू लागते. बोलण्यात अडचण येते.

 

अशाप्रकारे हे काही संकेत आहेत जे गरुड पुराणांमध्ये सांगण्यात आलेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.