मित्रांनो, तुळशीमध्ये साक्षात विष्णू व लक्ष्मीचा वास असतो असे म्हटले जाते. तुळशीला आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे. असेही म्हणतात ते विष्णूची कोणतीही पूजा केल्यावर त्याला जो प्रसाद केला जातो त्यामध्ये आपल्याला तुळशीचे पान हे घातल्या जातात. शिवाय ते विष्णू देवांना तुळशी पान शिवाय नैवेद्य मान्य नसते. अशा या तुळशीला जर आपण रोजच्या रोज पूजा केली किंवा जर अर्पण केले तर यामुळे आपल्याला फळ देखील मिळत असते.
हे जल अर्पण केल्यामुळे आपल्याला कोणत्या फळ मिळते? त्याबद्दल आपण एक कथा पाहणार आहोत. ही जी कथा श्रीकृष्णाने सत्यभामाला सांगितलेली आहे.
इतके दिवशी सत्यभामा देवी श्रीकृष्णांना प्रश्न विचार की, ‘हे देवा तुम्ही सतत या तुळशीला पाणी का अर्पण करत असतात?’ यावर श्रीकृष्ण म्हणतात, ‘तुळस ही साक्षात लक्ष्मीच्या रूप आहे आणि ज्या ठिकाणी लक्ष्मी असते त्या ठिकाणी कधीही धनाची कमतरता पडत नाही. या तुळशीला जल अर्पण केल्यामुळे मनुष्याची अनेक पाप कर्म नष्ट होतात. याबद्दलची मी तुला कथाच सांगतो या कथेमधून तुला असणारा सर्व प्रश्नांची उत्तरे तुला मिळतील.’
यावर देवी सत्यभामा श्रीकृष्णांना म्हणते, ‘हे प्रभू मला ही कथा संपूर्ण ऐकायचे आहे. त्यामुळे तुम्ही कृपा करून मलाही कथा सांगावी.’ असे म्हटल्यावर श्रीकृष्ण कथा सांगासाठी आरंभ करतात. श्रीकृष्ण म्हणतात, ‘पुरातन काळातील ही एक गोष्ट आहे. त्या काळामध्ये एक ब्राह्मण होता आणि तो ब्राह्मण खूपच नीच स्वभावाचा होता. ब्राह्मण असून देखील मास खात होता. अतिशय वाईट कर्म करणार होता. त्याच्या मनामध्ये सतत वाईट विचारच येत असत.
तो सगळे काम वाईटच करत असे. या ब्राह्मणांनी शास्त्राचे पठण कधीच केले नव्हते आणि त्याचे मन हे दुसऱ्याचा धनावरच नेहमी असायचे. असा तो ब्राह्मण हा कधीही त्याच्या मनामध्ये चांगले विचार करत नव्हता. तो त्याच्या मुखामध्ये कधीच कोणत्याही देवी देवतांचे नाव घेत नव्हता. तो अतिशय पाप करणारा मनुष्य होता. त्याच्या जीवनामध्ये त्याने एकही पुण्याचे काम केले नव्हते. असे करता करता एक दिवशी तो ब्राह्मण काही खरेदी विक्री करण्यासाठी दुसरा राज्यात जातो.
आणि त्या नग्रात नर्मदा नदी वाहत असते. विश्राम करण्यासाठी खूप जण वेगवेगळ्या ठिकाणाहून म्हणजेच लांब लांबच्या अंतरावरून आलेले असतात. अशा ठिकाणी तो ब्राह्मण नदी किनारे असलेल्या आश्रमामध्ये थांबतो. या आश्रमामध्ये अनेक ब्राह्मण देवाची पूजा करण्यात तसेच भगवान विष्णूची सेवा करण्यात मग्न होऊन गेलेले असतात. हा ब्राह्मण देखील त्या ठिकाणी पूजा करण्यासाठी बसतो. ते मनापासून नाही तर दुसऱ्यांना दाखवण्या पुरते. तो असे करत असतो आणि त्यामुळेच त्याचा कानावर श्रीहरी विष्णूंचे नाव येऊ लागले.
अशा या आश्रमामध्ये हा ब्राह्मण एक महिना इतका कालावधी राहिला आणि एका महिन्याचा कालावधीमध्ये कळत नकळत दररोज तुळशी ल पाणी अर्पण करत होता. एके दिवशी तो झोपला असताना त्याला एक साप घेऊन दंश करतो व त्या रात्रीच तो ब्राह्मण मरतो. सकाळी उठून तिथे दुसरी ब्राह्मण त्याला पाहतात तर त्या वेळेला त्याला कळते की हा मेला आहे. थोड्या वेळाने यम दुत येऊन त्याची आत्मा घेण्यासाठी येतात व ते आत्मा घेउन नर्क लोकात जात असतात.
नर्क लोकात गेल्यानंतर सित्र्गुप्त त्यांनी केलेल्या सर्व वाईट कर्म यमला सांगतो आणि यम यानुसार शिक्षा म्हणून या ब्राह्मणाला उकळत्या तेलामध्ये घालावे असा आदेश दुत ला देतो. दूत त्याप्रमाणे त्याला उकळत तेला मध्ये घालण्यासाठी जातात. ज्यावेळी ते त्या ब्राह्मणाला उकळता तेल यामध्ये घालतात त्यावेळी त्या तेलाचे पानीत रूपांतर होते. असे का होते ते त्यांना कळत नाही. यावेळी यम देवाच्या जवळ नारद मुनी येतो.
आणि नारद मुनी त्याने केलेल्या एका पुण्यची माहिती यमाला देतो. म्हणजे तुळशीला जल अर्पण केल्याचे पुण्य त्याला प्राप्त झालेले आहे असे सांगतात. यानुसार त्याला विष्णू लोट जाण्यासाठी सोडावी असा आदेश यमाला देतात. त्यावर यम म्हणतो की या ब्राह्मणाला संपूर्ण नरक लोक दाखवून मग त्याला विष्णू लोका मध्ये न्यावे. यानुसार त्याला विष्णू लोकात नेले जाते. कृष्णा म्हणतात लक्ष्मीचा संबंध तुळशीही साक्षरता आहे आणि ती विष्णू ला अधिक प्रिय आहे. त्यामुळे जो व्यक्ती या तुळशीची अत्यंत मनो भावाने पूजा करतो त्याच बरोबर तुळशीला झोप लागते दररोज जल अर्पण करतो अशा व्यक्तींना पुण्य प्राप्त होते. त्यांनी कितीही वाईट कमी केले तरी या एका पुण्य कर्म मुळे त्यांच्या सर्व वाईट कर्माचे शिक्षा माफ होते.
अशाप्रकारे तुळशीला जल अर्पण का करावे याबद्दलची कथा श्रीकृष्णाने त्यांचा पत्नीस सांगितलेले आहे. तुम्ही देखील दररोज नित्यनेमाने तुळशीची पूजा करत राहावी. व तिला जल अर्पण करावे. कारण यामुळे जर आपल्याकडून कळत न कळत काही वाईट कर्म घडले असेल तर ते या पुण्य कर्म मूले माफ होते.