पावसाळ्यात फुगुन घट्ट झालेला दरवाजा मोकळा करा फक्त २ रुपयात…..!!

Uncategorized

मित्रांनो, पावसाळ्याचं वातावरण सगळ्यांनाच आवडते. पावसाळ्यात गरमागरम चहा, भजीचा आस्वाद घेणे, मस्त पावसात भिजणे, पावसाचा आनंद घेणे यासारख्या अनेक गोष्टी आपण पावसाळ्यात करतोच. परंतु हा पावसाळा सगळ्यांनाचं सारखा असतो असे नाही. अनेकांसाठी पावसाळा म्हणजे नकोशी वाटणारी आजारपणं, छताचं लिकेज, घरात साचणारं पाणीदेखील असू शकतं. पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने जवळपास सर्वच वस्तू खराब होऊ लागतात किंवा दुर्गंधी येऊ लागते.

 

विशेष करुन पावसाळ्यात लाकडी वस्तू जसे की फर्निचर, कपाटं, दार, खिडक्या यांची योग्य ती काळजी घेतली नाही तर त्या खराब होतात. पावसाळ्यात लाकडी वस्तूंना वाळवी लागते किंवा काहीवेळा ओलाव्यामुळे या वस्तू फुगून खराब होऊ लागतात. पावसाळ्यात आपल्यापैकी काहींच्या घरी वाढलेल्या आर्द्रतेमुळे लाकडी दरवाजे, खिडक्या फुगतात आणि ते नीट लागत नाहीत. पावसाळ्यात दरवाजे, खिडक्या फुगण्याचा त्रास तर प्रत्येकालाच कमी अधिक प्रमाणात सहन करावा लागतो.

 

पावसाळ्यात, लाकडी दार – खिडक्यांनाही अनेकदा दुर्गंधी येऊ लागते किंवा बुरशीच्या खुणा दिसतात. काही वेळा हे लाकडू फुगून त्यातून तीव्र वास येतो. अशा परिस्थितीत पावसाळ्यात एकही लाकडी दरवाजा – खिडक्या खराब होऊ नये असे आपल्याला वाटत असेल काही उपाय करायला हवेत. काही घरगुती उपायांचा वापर करुन आपण लाकडी दारं – खिडक्या फुगण्यापासून त्यांचा बचाव करु शकतो. याच उपायांची माहिती आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

 

पहिला उपाय म्हणजे पावसाळ्यात, लाकडी दरवाजे कधी कधी फुगतात किंवा बुरशीच्या खुणा दिसतात. अशा स्थितीत, पावसाळ्यात लाकडी दरवाजा खराब होण्यापासून वाचवण्यासाठी आपण ऑयलिंग वापर करु शकतात. त्यामुळे दरवाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्यापासून बचाव करता येतो. तेल लावण्यासाठी आपण ऑलिव्ह ऑईल वापरू शकता. दार – खिडक्यांना तेल लावल्याने ते फुगून गच्च बसणार नाहीत.

 

दुसरा उपाय म्हणजे जर पावसामध्ये तुमच्या दरवाजा घट्ट झाले असतील तर बाजारामध्ये दरवाजांना लावणारे वॅक्सिन मिळते त्या व्यक्तींचा वापर करून आपण दरवाजा फुगण्यापासूनचा बचाव करू शकतो हा उपाय तुम्हाला पावसाळा चालू होण्याआधी करावा लागेल त्यामुळेच तुमचे दरवाजाचे फुगण्यापासून बचाव होऊ शकते

 

तिसरा उपाय म्हणजे मेणबत्तीचा वापर करून आपण खिडक्या-दारांच्या घट्ट बसण्याची समस्याही दूर करू शकता. सर्वप्रथम मेणबत्ती चुरा. मग चुरलेली मेणबत्ती घट्ट झालेल्या कडीवर, लॉकिंग सिस्टमवर, दरवाजाचे हँडलमध्ये भरा आणि तीन चार वेळा उघडबंद करा. असे केल्यास जाम झालेल्या गोष्टी लगेच सैल होतील आणि सहज उघडतील.

 

चौथा उपाय म्हणजे अनेक वेळा दारे खिडक्या उघडल्यावर चर- चर आवाज येतात. तसेच अनेकदा कडी देखील खूप घट्ट होते. तेव्हा यावर मोहरीचे तेल उपयोगी ठरू शकते. तेव्हा एका कोरड्या कपड्यावर मोहरीच्या तेलाचे काही थेंबी ओता. या कपड्याने लोखंडी कडी, दरवाजे आणि खिडक्या पुसा असे कल्याने ते सहज उघडता येईल.

 

पाचवा उपाय म्हणजे पावसाळा म्हणजे जीवजंतू आणि इनफेक्शनचा धोका वाढतो. म्हणूनच घरात सतत स्वच्छता राखली जाते. घराची स्वच्छता करताना जर तुम्ही लाकडी दरवाजे पाण्याने पुसत असाल तर असं करू नका. कारण दरवाजा ओला झाला तर तो पावसाळ्यात लवकर खराब होऊ शकतो. यासाठी कोरड्या कापडाने अथवा एखाद्या तेलाने लाकडी दरवाजा स्वच्छ करा. पावसाळ्यात दरवाजे दमट पडून फुगू नयेत, यासाठी जेव्हा घरात ऊन येत असेल तेव्हा दारे खिडक्या उघड्या ठेवा ज्यामुळे घरातील वातावरण खेळतं राहील. तसंच आठवड्यातून एकदा दारे, खिडक्या नीट पुसून स्वच्छ करा.

 

अशाप्रकारे हे काही पाच उपाय आहेत, ज्यामुळे आपण आपला दरवाजे खिडक्यांचे पुगुण्यापासून बचाव करू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published.