मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना फक्त याच कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार ….!!!

Uncategorized

मित्रांनो, महाराष्ट्र शासन तसेच भारत सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबविण्यात आहेत. ज्यातून गरीब लोकांना त्याचा जास्तीत जास्त फायदा होत आहे त्यांचे आर्थिक स्थिती सुधारावी हीच या योजने मागची उद्दिष्ट आहे. आजच्या लेखांमध्ये आपण कोणता कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार? त्याचबरोबर ही योजना कोणती? याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

 

महाराष्ट्र राज्य सरकारने 2024-25 च्या अर्थसंकल्पात एक महत्त्वाची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. या योजनेअंतर्गत, राज्यातील गरीब कुटुंबांना दरवर्षी तीन मोफत गॅस सिलिंडर दिले जाणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी 28 जून रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे राज्यातील गरीब कुटुंबांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांना आर्थिक मदत करणे. अर्थमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, स्वयंपाकासाठी वापरले जाणारे इंधन आणि महिलांच्या आरोग्याचा जवळचा संबंध असतो.

 

त्यामुळे, आरोग्याच्या समस्या कमी करण्यासाठी स्वच्छ इंधन पुरवणे गरजेचे आहे. या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे 52 लाख 16 हजार कुटुंबांना मिळणार आहे. मात्र, ही योजना सर्वांसाठी नसून, काही विशिष्ट अटी व नियम असतील. या योजनेत आहे दिले जाणारे फायदे म्हणजे गरीब कुटुंबांना गॅस सिलिंडर खरेदीची चिंता कमी होईल. महिलांना स्वयंपाक करण्यासाठी स्वच्छ इंधन मिळेल. स्वयंपाकघरातील धूर कमी होऊन आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल.महिलांचा वेळ वाचेल, ज्यामुळे त्यांना इतर कामांसाठी अधिक वेळ मिळेल.कुटुंबांच्या एकूण जीवनमानात सुधारणा होईल.

 

या योजनेच्या काही पात्रता आहेत आणि अर्ज प्रक्रिया कशी करावी याची माहिती आपण जाणून घेऊया. योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबांना त्यांच्या उत्पन्नाची प्रमाणपत्रे आणि ओळखपत्रे सादर करावी लागतील. अर्ज करण्यासाठी सरकारी कार्यालयात किंवा ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येईल. सरकारने या प्रक्रियेला सोपे आणि सुलभ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. या योजनेसाठी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली आहे. योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती योजनेच्या कार्यान्वयनावर लक्ष ठेवेल आणि आवश्यक ते बदल सुचवेल.

 

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाचे पाऊल मानली जात आहे. स्वच्छ इंधनामुळे महिलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारेल, तसेच त्यांना स्वतःच्या विकासासाठी अधिक वेळ मिळेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता निश्चित केली जात आहे. सोबतच या योजनेच्या अटी व शर्ती देखील ठरवण्यात येत आहेत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये रेशन कार्डवर नमूद कुटुंबाला प्रतिवर्षी 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जातील. त्या पुढील गॅस सिलेंडरसाठी बाजारभावानुसार दर आकारला जाईल.

 

एकाच घरात एकापेक्षा जास्त गॅस कनेक्शन असतील तर अशा घराला 3 पेक्षा जास्त सिलेंडर दिले जाणार नाहीत. रेशन कार्ड वर नमूद कुटुंबाला गॅस कनेक्शनच्या आधारावर नव्हे तर प्रती कुटुंब केवळ 3 सिलेंडर मोफत दिले जातील.रेशन कार्ड वर नमूद असलेल्या एकूण व्यक्ती यांचे एक कुटुंब समजले जाईल आणि त्यानुसारच त्या कुटुंबाला मोफत गॅस सिलेंडरचा लाभ दिला जाईल.या योजनेच्या लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत मिळणारे 3 गॅस सिलेंडर सुरुवातीला बाजारभावानुसार खरेदी करावे लागतील. या सिलेंडरची सबसिडी त्या कुटुंबातील महिलेच्या बँक खात्यावर डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत जमा केली जाईल.

 

या योजनेचा लाभ सरसकट दिला जाणार नाही. पिवळे व केशरी रेशन कार्डधारक कुटुंब या योजनेसाठी पात्र असतील. परंतु पांढरे रेशन कार्ड धारकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. अर्थात ते या योजनेसाठी अपात्र ठरतील.मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय म्हणजेच GR अद्यापही शासकीय संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेला नाही. त्यामुळे या योजनेच्या अटी-शर्थी व नियम तसेच आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज करण्याच्या प्रक्रियेबाबत लवकरच यथायोग्य माहिती प्राप्त होईल.

 

अशा प्रकारे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना द्वारे तीन सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.