जीवनात यशस्वी व्हायचे आहे…. तर हे आहेत सर्वात चांगले दहा मार्ग…..!!

Uncategorized

मित्रांनो, आपला प्रत्येकाचे स्वप्न असे असते की आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी व्हायला हवेत. आपल्याकडून सर्व गोष्टी या साध्य झाल्या पाहिजेत. आपण आपले स्वप्न साकार करू शकतील. सर्वांनाच वाटत असत. यासाठीच आपण मनापासून प्रयत्न करत असतो. परंतु त्या प्रयत्नांमध्ये आपल्या जीवनामधील असलेल्या अडीअडचणीमुळे आपल्या मनावर घातक परिणाम होत असतात. हेच मनाचे परिणाम शांत करण्यासाठी आजच्या लेखांमध्ये आपण सुंदर सुविचार जाणून घेणार आहोत.

 

ज्याच्याजवळ निस्वार्थ असे माणुसकीचे घन असते त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद, पैसा, अथवा प्रतिष्ठेची गरज नसते.

 

अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल.

 

खेळात जिंकल्यावर शाबासकी देणाऱ्या हातांच्या गर्दीपेक्षा खेळात उतरायच्या आधी विश्वासाने पाठीवर ठेवलेले काही हात खुप किमती अस.

 

“तुमचा “हेतू” कितीही चांगला असला तरीही “कृती” काय आहे यावर खुप गोष्टी अवलंबून असतात.

 

जेव्हा तुमची परिस्थिती चांगली असते, तेव्हा तुमची चुक ही गंमत म्हणून स्वीकारली जाते. परंतु जेव्हा तुमची परिस्थिती वाईट असते तेव्हा तुम्ही केलेली गंमत देखील गुन्हा समजला जातो!

 

आपले सत्य-स्वरुप सिध्द करण्यास सोन्याला अग्नीत शिरुन दिव्य करावे लागते आणि हिऱ्याला घणाचे घाव सोसावे लागतात.

 

माणसाने वेळेसोबत चालावे काळाप्रमाणे बदलावे परंतु आपल्या संस्कारांना शेवटपर्यंत आपल्या सोबत ठेवावे.

 

गरजेच्या वेळी सुकलेल्या ओठातून नेहमीच गोड शब्द बाहेर पडतात पण एकदा का तहान भागली की मग पाण्याची चव आणि माणसाची नियत दोन्हीही बदलतात, जोपर्यंत ठिक आहे तोपर्यंत देवाला दुरुनच हात जोडतात आणि थोडसं कमी पडायला लागलं की देवळात जाऊन नारळ फोडतात.

 

जो मनुष्य तोंडावर स्पष्ट बोलून मोकळा होतो त्याच्या बोलण्यात कडूपणा जरूर असतो पण तो कोणाचा विश्वासघात करत नाही.

 

नातं सन्मानित करणारं असावं, अपमानित करणारे नसावं नातं प्रेरणा देणारे असावं, वेदना देणारे नसावं ! नातं बळ देणारे असावं, घाव देणारे नसावं नातं साथ देणारं असावं, पाय ओढणारे नसावं नातं मदत करणारं असवं, तमाशा बघणारे नसाव.

 

शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करा.

 

जीवन खूप सुंदर आहे फक्त जगता आलं पाहिजे माणसं मुळात वाईट नसतात त्यांच्यातलं चांगलंपण शोधता आला पाहिजे, नातं कोणाशीही जोडता येतं पण ती टिकवता आले पाहिजे, अपयश हे जीवनाची सुरुवात असते फक्त दे पचवता आलं पाहिजे जीवन जगणं कठीण नाही, बस ! ! लढता आले पाहिजे.

 

अधिकार तिथेच असतो, जिथे प्रेम असतं आणि जिथे प्रेम असते, तिथे भांडणही असतं! म्हणूनच प्रेमात कोणी रागाने बोललं तर ते मनावर घ्यायचं नसतं कारण राग हा क्षणिक असतो आणि प्रेम कायमचं असतं तसंही त्यांच्या रागाच्या बोलण्यापेक्षा त्याचं न बोलणंच तर जास्त त्रासदायक असतं.

 

कचऱ्यात फेकलेलं जेवन हेच दर्शवतं, की पोट भरून झाले, की माणूस आपली लायकी विसरतो.

 

टेन्शन घ्यायचं नाही, आयुष्य बिनधास्त जगायचं कुणाचं वाईट करायचं नाही, कुणाचं वाईट चितायचं नाही कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही, फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं, काही कमी पडत नाही!! आणि फरक तर अजिबात पडत नाही, कोणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही लोकांचे अनेक रूपं असतात.

 

सकाळी गोड बोलतात आणि रात्री कोणी काही डोक्यात भरवलं की तोंड पाडून बसतात किवा कुठल्यातरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात, ज्याच्याशी तुमचा काहीही संबंधपण नसतो, आजकाल लोकं देवावरपण नाराज होतात, तर आपण कोण…?

 

यशस्वी व्हायचे रस्ते खूप आहेत फक्त त्या रस्त्यावर चालण्याचे कष्ट आपल्या पावलांनी घेतले पाहिजेत.

 

गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा, कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसंच साथ देतात.

 

पुस्तकाशिवाय केला जाणारा अभ्यास म्हणजे आयुष्य आणि आयुष्यात आलेले अनुभव म्हणजे पुस्तक.

 

एकदा जर मन मारून जगायची सवय झाली तर हळूहळू सगळ्या भावना पण नाहीशा होऊन जातात.

 

स्त्रीची विचारशक्ती एवढी तल्लख असते ती पुरुषाची नजर आणि नियत एका क्षणात ओळखते पण ती फसते तेव्हाच, जेव्हा ती स्वतः पेक्षा जास्त प्रेम समोरील पुरुषावर करत असते.

 

समोरचा व्यक्ती जास्त बोलत नाही याचा अर्थ त्याला काही कळत नाही असा नसतो तुमचा तो आदर करतो, म्हणून बोलत नसतो कदाचित तो तुमच्यापेक्षाही हुशार असू शकतो परस्थिती त्याला बोलू देत नाही.

 

आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्या कष्टावर विश्वास ठेवा यश मिळण्याची उमेद नक्की वाढेल.

 

सुखाची अपेक्षा असेल तर दुःखही भोगावे लागेल, प्रश्न विचारायचे असतील तर उत्तरही द्यावे लागेल, जीवनात यश हवे असेल तर संकटांना सामोरं जावंच लागेल.

 

 हे काही सुंदर असे सुविचार आहेत. ज्यामुळे आपले मन प्रसन्न होत असते.

Leave a Reply

Your email address will not be published.