मित्रांनो आपले आयुष्य सुखकारक, दुःखकारक, चांगले, वाईट, आनंदी हे सर्व घडवण्यासाठी आपणच कारणीभूत असतो. याला आपल्या काही सवयी कारणीभूत ठरत असतात. आणि यामुळेच आपल्या आयुष्याची माती होत असते. आपले आयुष्य फुकटचे जात असते. याचा परिणाम आपल्याबरोबरच आपल्या घरातील सर्व सदस्यांना काही ना काही अंशी भोगावा लागतो. त्यामुळे अशा सवयींपासून जेव्हा आपल्याला समजले तेव्हापासून तरी दूर राहणे उचित ठरू शकते.
चला तर जाणून घेऊ कोणत्या आहेत अशा वाईट सवयी…
1. कधीच कुणाला जामीन राहू नका. आपल्या आजूबाजूचे लोक हे नेहमी सज्जन आणि सदवर्तन करणारे असावेत याची काळजी घ्या.
2. उधार दिलेले पैसे मागण्यास संकोच करू नका. असे जर तुम्ही केलात तर तुमचे ते पैसे बुडालेच म्हणून समजा.
3. तुमच्या पगाराचा आकडा हा कोणालाच कधी सांगू नका. कारण तुमच्या पगारावरूनच लोक तुम्हाला किती मानसन्मान द्यायचा हे ठरवतात.
4. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. कारण हा विश्वास आपणाला कधीही अडचणीत आणू शकतो आपल्या आयुष्यात येणारी माणसं ही नेहमी पारखून घेत चला.
5. आपल्या घरातील खाजगी गोष्टी या बाहेर कोणाला सांगू नका कारण लोक कधी कधी हे आपल्या पाठीमागे मस्करी करतात तर कधी गैरफायदा देखील घेतात.
6. तुमच्याकडे असलेले ज्ञान अनुभव हे कधीही फुकट वाटू नका. आज-काल फुकट मिळालेले ज्ञान याची कोणालाही काहीही किंमत राहिलेली नाही.
7. सोडून गेलेल्या व्यक्ती बाबत जास्त काळ शोक करत बसू नका. तुमच्याजवळ जे लोक आहेत त्यांची काळजी घ्या. कारण सोडून गेलेली व्यक्ती ही परत येत नसते. म्हणून आपल्याजवळ जे आहे ते जपायला शिका.
8. आपल्या भावनांना वाट मोकळी करू द्या. आपल्या भावना या मनातच ठेवल्याने त्याचा कधीतरी विस्फोट होऊ शकतो. यामुळे तुमची मानसिक स्थिती बिघडू शकते आणि मोठा अनर्थ घडू शकतो.
9. देवावर विश्वास ठेवा अगर न ठेवा मात्र आपण जपलेली माणुसकी यातच देव पण असतं याची जाणीव नेहमी ठेवा. माणुसकीने चांगले राहिलात तर कुठल्याही देवाला जाण्याची गरज नाही.
10. टीव्ही मालिका सोशल मीडियावरील विविध मालिका या काल्पनिक तसेच खोट्या बनविलेल्या असतात त्यामुळे त्या जगताचा आपल्या जगताशी अजिबात संबंध जोडू नका.
11. सतत तक्रार करण, रडणं या गोष्टी आत्ताच सोडून द्या कारण या गोष्टीमुळे तुमच्यामध्ये तसेच तुमच्या संपूर्ण वातावरणामध्ये नकारात्मकता वाढत राहते आणि सर्व काही नकारात्मकच घडत राहते.
12. मूर्खांच्या नादी लागू नका. आपल्याकडे एक म्हण आहे शहाणांचा नोकर व्हावं पण मुर्खांचा मालक होऊ नये. हे सतत लक्षात ठेवा.
13. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. मग ते आपलं खान पिन असू द्या. प्रेमाबद्दल असू द्या खेळणं बागडण असू द्या. अति झाले की त्याचा त्रास आहे तुम्हाला होणारच.
14. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. कारण हा विश्वासघात लगेच होऊ शकतो. सध्याचे हे कधी युग आहे कोणीही कुणाच्या स्वार्थाशिवाय कुणाच्या जवळ जात नसतं याची जाणीव मनामध्ये नेहमी ठेवा.
15. स्तुती करणारे ओळखा. कारण स्तुती करणारे हे चांगलेही असू शकतात आणि वाईट देखील असू शकतात. ती वेळेत ओळखलं नाही तर तुमचं नुकसान होऊ शकतं.
16. तारुण्य परत येत नाही. त्यामुळे या काळात कोणतीही वाईट वर्तन करू नका. सगळ्या गोष्टीचा आनंद घ्या मात्र कोणत्याही चुकीच्या कामात किंवा अडचणीत अडकून पडू नका.
17. तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात येणारी माणसे नीट पारखून पहा. पारखण्यात चूक झालीच तर आयुष्य बरबाद झाले म्हणून समजा.
18. स्वतःच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडा रिस्क घेऊन काम करा. रिस्क घेऊन काम केल्याशिवाय प्रगती होत नसते हे लक्षात ठेवा.
19. आळसामुळे आपले कर्तुत्व, बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्व हे नेहमीच मागे पडते. त्यामुळे आळस झटकून कामाला लागा.
20. मनात न्यूनगंड बाळगू नका. स्वतःला कमी लेखण्याने आपला आत्मविश्वास कमी होतो. आणि आत्मविश्वास कमी झाला तर आपण काहीच करू शकत नाही आणि समाजात ठळकपणे वावरू शकत नाही.
मित्रांनो या सांगितलेल्या आम्ही काही सवयी आपणाला नक्कीच लागू पडतील आणि आपण नक्कीच यामध्ये बदल करून आपल्या आयुष्याची नवी सुरुवात कराल हे आम्ही ठामपणे येथे सांगतो. हे विचार आपणाला ऐकले असल्यास नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा. आणि आमच्या पेजला लाईक करायला विसरु नका.