सर्वसामान्य लोकांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे, ती आहे रेशन बाबत. केंद्र सरकार तसेच महाराष्ट्र शासनातर्फे अनेक योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. ज्याचा मुख्य उद्देश हा आर्थिक दुर्बल लोकांना आर्थिक सहाय्य देणे असा आहे.
याद्वारे अनेकांना आर्थिक मदत केली जात आहे. केंद्र सरकारची एक योजना जी रेशन कार्ड द्वारे लोकांना धान्य पुरवठा करण्यासाठी सुरू करण्यात आली होती. या रेशन कार्ड च्या योजनेमध्ये काही नवीन नियम काढण्यात आलेले आहेत. ते एक जुलैपासून लागू करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.तुम्हाला तर माहीतच असेल की रेशन कार्ड हे तीन प्रकारचे आहेत पिवळे, केशरी आणि पांढरे. पिवळ्या व केशरी कार्ड धारकांना शासनातर्फे मोफत राशन वितरित करण्यात येते या रेशन कार्डचा बाबतीमध्ये काही नवीन नियम सुरू करण्यात आलेला आहे. ज्याचा फटका 80 कोटी लाभार्थ्यांना होणार आहे. आजच्या लेखामध्ये आपण कोणते नवीन नियम चालू करण्यात आलेले आहेत याची माहिती पाहणार आहोत व हे काम केले तर नक्की आपल्याला कोणत्याही प्रकारचा फटका बसू शकणार नाही ते कोणते काम करावे. याबाबतची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
तुम्हाला तर सर्वांना माहीतच आहे की प्रत्येक रेशन कार्डधारकांना प्रति व्यक्ती पाच किलो गहू व तांदूळ याप्रमाणे वितरित करण्यात येत होते आता यापुढे नवीन रेशन कार्ड तर तयार होणारच नाही. त्याच बरोबर जे रेशन कार्ड धारक आहेत व त्यांचे आर्थिक उत्पन्न जास्त आहे अशा रेशन कार्ड धारकांना देखील याचा दंड भरावा लागू शकतो.
जर तुमचे उत्पन्न रेशन कार्ड घेणाऱ्या रूल प्रमाणे असतील तर तुम्हाला कोणत्याही फटका बसणार नाही. पण जर या रुल च्या बाहेर तुमच्या आर्थिक उत्पन्न असेल तर तुम्हाला प्रत्येक किलो 35 रुपये प्रमाणे तुमच्याकडून दंड आकारला जाऊ शकतो.
त्याचबरोबर जर तुमचा 100 वर्ग स्क्वेअर फुट प्रमाणे कोणतेही जागा किंवा घर असेल तरी देखील तुमचे रेशन कार्ड बंद केले जाऊ शकते आणि जर तुम्ही तुमचे घर किंवा जागा असेल आणि रेशन घेत असाल तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. म्हणून अशा व्यक्तींनी रेशन घेऊच नये. त्याचबरोबर जर तुमची चार चाकी गाडी असेल ट्रॅक्टर असेल किंवा बंदुकीचे लायसन असेल तरी देखील तुम्ही रेशन घेण्यास अपात्र ठरत आहात.
तुम्ही देखील रेशन अजिबात घेऊ नये. नाहीतर तुमच्यावर देखील कारवाई होऊ शकते. त्याचबरोबर जर तुम्ही गावामध्ये राहत असाल आणि वर्षाला दोन लाख रुपये कमवत असाल तरी देखील तुम्ही रेशन घेण्यास अपात्र ठरत आहात आणि जर तुम्ही शहरांमध्ये राहत असाल आणि वर्षाला तीन लाख रुपये कमवत असाल तरी देखील तुम्ही रेशन घेण्यास अपात्र ठरत आहात.
अशा व्यक्तींनी आपले रेशन कार्ड आपल्या शहरातील किंवा गावातील विभागाकडे सरेंडर करावे. नाहीतर त्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल.
अशाप्रकारे हे काही बदल रेशन कार्ड मध्ये करण्यात आलेले आहेत आणि जर तुम्ही या कोणत्याही गोष्टींमध्ये येत असाल तर तुम्ही रेशन घेण्यास अपात्र ठरत आहात. त्यामुळे जर तुम्ही तुमचे रेशन कार्ड वेळीच तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जमा केले नाही तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते व आतापर्यंत घेतलेल्या रेशनवर प्रति किलो 28 रुपये आणि तुमच्याकडून दंड वसूल करण्यात येईल. हे काही नियम आहेत.
त्याचबरोबर अजून देखील काही नियम चालू करण्यात आलेले आहेत
ते म्हणजे तुमचं रेशन कार्ड जे आहे ते रेशन कार्ड ला आधार कार्ड लिंक करून घ्यायचा आहे. रेशन कार्ड वर व्यक्तींचे नाव आहेत त्या व्यक्तींची आधार कार्ड रेशन कार्ड ला लिंक करून घ्यायचे आहे. जेणेकरून तुमची ई-केवायसी कम्प्लीट होईल व याचा फायदा म्हणजे रेशन कार्डचा संबंधित ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा लाभ तुम्हाला घेता येईल आणि हे बंधनकारक करण्यात आलेले आहे. म्हणून लवकरात लवकर तुम्ही ekyc करून घेणे खूप गरजेचे आहे. हे तुम्हाला तुमच्या शहरातील सेवा केंद्रामध्ये किंवा तुम्ही ज्या ठिकाणी रेशन घेत आहात त्या ठिकाणी करता येते.
अशाप्रकारे रेशन कार्ड संबंधित हे काही नवीन नियम काढण्यात आलेले आहेत. ते एक जुलै पासून अमलात आणणार आहेत.