मित्रांनो, या जगात अनेक प्रकारची लोकं आहेत. यामध्ये काही लोकांची मानसिकता ओळखून आपण त्यांच्यापासून चार हात लांब राहिले पाहिजे. कारण अशी लोक जर आपल्या आयुष्यात असतील तर आपले आयुष्य पूर्णपणे उध्वस्त होऊ शकते. महाभारतामध्ये सगळ्या प्रकारच्या लोकांबद्दल चर्चा केली गेली आहे. आचार्य चाणक्य यांनी सुद्धा काही लोकांपासून सावध राहण्यास सांगितले आहे.
आयुष्य जगत असताना आपला अनेक लोकांशी संबंध येत असतो. अनेक लोक आपल्या आयुष्यात काही काळासाठी येतात निघून जातात. काही लोक तुमच्या आयुष्यात वादळ उठवतात तर काही लोक तुमच्या आयुष्य समृद्ध करून टाकतात. अशी पण काही लोक असतात जे तुम्हाला अक्षरशः कंगाल बनवतात. जर तुम्ही लोकांना ओळखण्याची कला शिकला नाही तर आयुष्यभर तुमची फसवणूक होत राहील.
ज्या व्यक्तीला आयुष्यात प्रगती करायची असते त्याचा हजारो लोकांबरोबर संबंध येत असतो. अशावेळी खूप गरजेचे असते कोणत्या लोकांबरोबर संबंध ठेवले पाहिजे. कोणत्या लोकांपासून लांब राहिले पाहिजे. आचार्य चाणक्यांनी दहा प्रकारच्या लोकांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे पहिला आहे. या दहा प्रकारांची संपूर्ण माहिती आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.
पहिला आहे मूर्ख व्यक्ती. मूर्ख व्यक्तीची ओळख काय असते अनेक प्रकारचे मूर्ख लोक असतात. सुशिक्षित लोक सुद्धा मूर्ख असतात. जर तुम्ही मूर्ख नसाल आणि मूर्खांपासून लांब राहाल तर नेहमी फायद्यात राहाल. सुद्धा मूर्खांमध्ये मोजले जाल. मूर्ख व्यक्तीला तुम्ही तुमचा मित्र समजून जर काही तुमची रहस्य सांगा तर ते कधीच रहस्य राहणार नाही. आजकाल प्रत्येक ठिकाणी अशी लाखो मूर्ख तुम्हाला सापडतील जे आपले आणि आपल्या प्रियजनांच्या गोष्टी जग जाहीर करण्यात व्यस्त आहेत. मुर्खांची कोणतीच निश्चित विचारधारा नसते. असे पण म्हटले जाते की मूर्खांबरोबर ज्ञानाच्या गोष्टी करू नये. ते काहीच काही अर्थ लावतील तो कधी पलटी खाईल काही सांगता येत नाही. मूर्ख व्यक्तीबरोबर विचारपूर्वकच व्यवहार केला पाहिजे शक्य असेल तर अशा व्यक्तींपासून चार हात लांब राहिलेले चांगले. जर तुम्ही त्यांचा विरोध करायला जाल तर तुम्हीच मूर्ख ठराल. चाणक्य म्हणतात सुशिक्षित मूर्खांमुळे समाजाचे आणि राष्ट्राचे सगळ्यात जास्त नुकसान होते.
दुसरा आहे दारू पिणाऱ्या व्यक्ती. आता तुम्ही असे म्हणत असाल की दारू पिण्यात काय वाईट आहे. या देशांमध्ये सगळ्यात जास्त गुन्हे दारू पिणाऱ्यांनीच केली आहे. दारोडी सुद्धा अनेक प्रकारचे असतात. देवदास, शौकीन, व्यसनाधीन, अपराधी, राजश्री वगैरे वगैरे यामध्ये काही बरोबर आणि काही चुकीचे असतात. शक्यता आहे की तुम्ही सुद्धा यापैकी एक असाल. तुमचे सुद्धा अनेक मित्र असतील जे दारू, बाई खाण्यापिण्याची शॉपिंग असतील. दारू पिणाऱ्या व्यक्ती कधीच होष मध्ये नसतो. तू कधी पण काहीही चुकीचे करू शकतो आणि समजा त्यावेळी तुम्ही जर त्याच्यासोबत असाल तर तुम्हाला खूप मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते. दारू पिणाऱ्या व्यक्तीबरोबर राहून तुम्ही अशा संकटामध्ये सापडू शकता. ज्याच्यातून बाहेर यायला तुम्हाला अनेक वर्ष लागतील. शिवाय तुमचे पैसे सुद्धा खर्च होतील. त्यामुळे तुम्हाला जर तुमचा परिवार पैसे आणि वेळेची किंमत असेल तर अशा व्यक्तींपासून नेहमी लांब राहा.
तिसरा आहे अति गोड बोलणारी व्यक्ती. तुम्हाला तुमचे मित्र ओळखता येतात का? तुमच्या मित्रांच्या ग्रुप मध्ये जर अशा प्रकारची लोक असतील तर सावध राहा. दोन तोंडी असणारी, प्रत्येक गोष्ट जाणून घेणारी, अति गोड बोलणारे, खोटे खोटे असणारे, जळू वृत्ती ठेवणारे, तुमच्याबरोबर स्पर्धा करणारे, वेळ पडल्यावर तुमची मदत न करणारे , फालतू गप्पा मारणारे अशी लोकं प्रचंड घातक असतात. अशा लोकांपासून तर तुम्ही सावध राहिले पाहिजेत. पण अति गोड बोलण्यांपासून जरा जास्त सावध रहा. अनेक मुली अशा प्रकारच्या लोकांना बळी पडतात. ही लोकं पहिले जाणून घेतात की कोणाला नक्की काय आवडतं आणि मग ते त्याच प्रकारच्या गोष्टी करता ते सतत खोटं असं चेहऱ्यावर ठेवतात आणि ते किती पॉझिटिव आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. मैत्री करण्याची ही त्यांची पद्धत असते अशी लोकं खूप हुशारीने तुमच्या आयुष्याचा भाग बनतात आणि मग तुमच्या सांगून कोणाचा फायदा उचलतात आणि जोपर्यंत तुम्हाला याची जाणीव होते त्यांनी त्यांची काम पूर्ण केलेले असते.
चौथी व्यक्ती आहे नकारात्मक व्यक्ती. तुम्ही त्यांच्यासमोर कितीही पॉझिटिव्ह गोष्टी मांडा ते काहीतरी तर्क वितरक लावून त्यामध्ये सुद्धा नकारात्मकता शोधून काढतील. त्यांच्या तोंडूनही मी नकारात्मक गोष्टीच बाहेर पडतात. या लोकांच्या प्रत्येक वाक्यात नाही हा शब्द तुम्हाला ऐकायला मिळेल. हे काम मिळत होणे शक्य नाही, तिथे जाऊन आपण काय करणार आहे न गेल्यानेच बरं, असे केल्याने काही साध्य होणार नाही, या कामात तुला कधीच यश मिळणार नाही, तू जर हे केले तर तू उध्वस्त होशील अशा प्रकारची हजारो वाक्य नकारात्मक व्यक्तीच्या तोंडामध्ये असतात. नकारात्मक व्यक्तींबरोबर राहिल्यामुळे तुमच्या मध्ये नैराश्य तणाव आणि उद्या चिंता निर्माण होईल आणि तुम्ही सुद्धा आयुष्यामध्ये स्वतःला एक हरलेली व्यक्ती समजाल. नकारात्मक विचार असणारी लोकं ब्लॅक होल सारखे असतात जे अचानक घेऊन आपली सगळी एनर्जी शोषून घेतात. आपण पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करतो पण ह्या लोकांची निगेटिव्हिटी आपल्यावर हवी होते त्यामुळे नकारात्मक लोकांपासून नेहमी सावध राहा. ते कधी तुम्हाला निगेटिव्ह बनवतील तुम्हाला सुद्धा कळणार नाही.
पाचवा आहे घमंडी व्यक्ती. अशी अनेक लोक असतात ज्यांचे कर्तृत्व शून्य असते पण ते प्रचंड घमंडी असतात आणि लोकांवर जबरदस्ती दबाव टाकतात. अशी पण काही लोक असतात जे खूप मोठे असतात त्यांच्याकडे संपत्ती, पद, मानसन्मान सर्वकाही असते याचाच त्यांना अहंकार असतो. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या लोकांपासून सावध राहाल तर फायद्यात राहाल. नाहीतर ही लोकं तुमचे खच्चीकरण करत राहतील आणि तुम्हाला कमी लेखत राहतील. ही गोष्ट मी मान्य करतो प्रत्येक व्यक्तीमध्ये थोडाफार अहंकार हा असतोच. पण प्रमाणापेक्षा जास्त अहंकारी व्यक्ती खूप त्रासदायक ठरते. जर तुमच्या मित्राला तुम्ही बोलायच्या आधी त्याला बोलायचे आहे किंवा तुमचे बोलणे मध्येच थांबवून तू स्वतःची नेमकी वाजवत असेल तर अशी लोक अहंकारी आहे असे समजावे. अशा लोकांना तुमच्याशी काही घेणं नसतं. त्यांना तुमच्याबरोबर बोलण्यात सुद्धा इंटरेस्ट नसतो. ही लोक स्वतःची चूक कधीच मान्य करत नाही. अशा लोकांबरोबर फक्त कामापुरतेच बोलावे. त्यांच्या हाल हा मिळवणे शहाणपणाची लक्षण आहे.
सहावी आहे इर्षा असणारी व्यक्ती. थोडक्यात तुमच्यावर जळणाऱ्या व्यक्ती. आपल्या आजूबाजूला अशी अनेक प्रकारची लोक असतात. ती लोक तुमच्यावर जळतात त्यांचीही ईर्षा कधी पण दुश्मनी मध्ये बदलू शकते. ती नेहमी तुमच्याबद्दल वाईटच विचार करतात. तुमच्या बरोबर स्पर्धा करणारे सुद्धा शिवसेने भरलेले असतात. अशा लोकांपासून नेहमी लांब राहा. नाहीतर तुमचा स्वभाव सुद्धा त्यांच्यासारखा होईल आणि तुम्ही तुमच्या ध्येयापासून विचलित व्हाल. याशिवाय तुमचा वेळ आणि एनर्जी सुद्धा वाया जाईल हे खरे मित्र असतात ते तुमची प्रगती बघून आनंदी होतात. तुमच्यावर जळत नाही खरे वास्तव हे आहे की ही जळणारे लोक असतात ना ते जास्त करून आपले नातेवाईकच असतात. ते बाहेरून तुम्हाला दाखवतात की त्यांना तुमची किती काळजी आहे पण त्यांच्या आत मध्ये इरशाची अग्नी धगधगत असते. त्यांच्या डोळ्यात तुम्ही हे बघू शकता अनेकदा तर ते आपल्या बोलण्यातून सुद्धा त्यांची इच्छा जाहीर करता तुम्हाला फक्त सावध राहून निरीक्षण करता आले पाहिजे.
सातवी आहे भांडखोर व्यक्ती. वादविवाद करणे काही वाईट नाही. पण काही लोकं बारीक-सारीक गोष्टीवर भांडत बसतात, त्यांना भांडायची सवय लागलेली असते अशी लोकं कधी कोणती गोष्ट मना लावून घेतील सांगता येत नाही. अशी लोक तुमच्या आयुष्य नरक बनवतात. छोट्या छोट्या गोष्टींवर भांडणारे किंवा सतत टोमणे मारणाऱ्या व्यक्तींपासून तुम्ही जेवढे लांब राहाल तेव्हाच तुम्ही आयुष्यात शांतीपूर्ण प्रगती कराल. तेव्हाच तुम्ही आयुष्यात शांतीपूर्ण प्रगती कराल.
आठवा आहे राजा. आजच्या काळात राजा महाराजाचं राहिले नाही. जुन्या काळात लोक म्हणायचे की राजापासून नेहमी लांब राहिले पाहिजे. नाहीतर कधी राजदंड गळ्यात पडेल सांगता येत नव्हते. असे होऊ शकते तुम्हाला तुमचे सगळे काम धंदे सोडवून राजाचीच कामे करावी लागतील. जसे मी सांगितले आजकाल राजा तर राहिले नाही पण आज राजाची जागा जनता द्वारा निवडलेले शासक प्रशासक यांनी घेतली आहे. जर तुमची त्यांच्याबरोबर दोस्ती असेल तर तुम्हाला त्यांना नेहमी खुश ठेवावे लागेल. नाहीतर तुम्ही अडचणीमध्ये येऊ शकता. हे शासक प्रशासक पूर्णपणे दुसऱ्यांवर अवलंबून असतात.
नववा आहे दृष्ट किंवा मूर्ख स्त्री. दुष्ट स्त्री अनेक प्रकारचे असतात. तर कशा चरित्रहीन आणि वाईट स्वभावाच्या स्त्रीपासून दूर राहणे शहाणपण आहे. नाहीतर तुमचा मानसन्मान तर जाईलच. याशिवाय तुमची धन आणि मौल्यवान वेळ सुद्धा वाया जाईल. चाणक्य म्हणायचे जर सज्जनपुरुष अशा स्त्रीच्या संपर्कात आले तर त्यांना फक्त अपयश मिळेल.
दहावी व्यक्ती आहे नेहमी दुःखी राहणारी व्यक्ती. अनेक लोक कारण नसताना दुःखी असतात अशा लोकांपासून नेहमी लांब राहा. चाणक्य म्हणायचे काही लोकांना देवाने सगळं काही दिलेलं असताना सुद्धा ते सतत तक्रार करत असतात. आपले दुःख प्रगट करत असतात की लोकांवर राहून चांगली सुखी लोकसुद्धा दुःखी होऊन जातात सारखे सारखे दुःखद गोष्टींवर चर्चा करणे आणि फक्त दुःखाबद्दल विचार केल्याने एक दिवस तुमच्या आयुष्यात सुद्धा दुःख प्रवेश करेल आणि तुम्ही सुद्धा दुःखी व्हाल.
अशाप्रकारे आचार्य चाणक्यांनी सांगितलेले हे होते ते दहा प्रकारचे लोक ज्यांच्यापासून आपण नेहमी लांब राहिले पाहिजे.