हजारो रुपये वाचवणारा उपाय, कमी चालत असलेल्या गॅसची फ्लेम घरच्या घरी ठीक करा, मोजून फक्त पाच मिनिटात १००% घरच्या घरी ….!!

Uncategorized

मित्रांनो, कामाच्या ऐन गडबडीत शेगडीच्या एखाद्या बर्नरची फ्लेम कमी झाली की खूप गोंधळ उडतो. स्वयंपाक करण्याचा वेग तर कमी होतोच, यासह दुसरी कामं देखील या एका गोष्टीमुळे खोळंबली जातात. घाईबडीच्या या जीवनात एक जरी वस्तू बिघडली तर, संपूर्ण कामं रखडतात. कामं रखडली की खूप वैताग येतो.

 

शेगडीच्या एखाद्या बर्नरची फ्लेम कमी झाली की, आपण बर्नर रिपेयर करणाऱ्या व्यक्तीला बोलावतो. यात आरामात ४ ते ५ तास वाया जातात. अशा वेळी काय करावं हे सुचत नाही. अशा परिस्थितीत आपण शेगडीच्या बर्नरची फ्लेम घरच्या घरी रिपेयर करू शकता. म्हणूनच आज आपण या लेखांमध्ये काही टिप्स जाणून घेणार आहोत की ज्यामुळे आपण घरीच शेगडी रिपेरी करू शकतो.

 

या काही टिप्समुळे कमी झालेली फ्लेम पुन्हा नव्यासारखी काम करेल. शेगडीच्या बर्नरची फ्लेम कमी होत असेल तर, सर्वात आधी सिलेंडर रेग्युलेटर बंद करा आणि कनेक्शन डिस्कनेक्ट करा. कोणतेही शेटे रिपेअर करत असताना सिलेंडरचे लग्न प्रबंध करून लिहिले तर जास्त किंमत काढण्यास करावे. अन्यथा कोणत्याही रिपेअर करून नाही. सोबत पाईप बाहेर काढून बाजूला ठेवा.

 

बर्नरची फ्लेम अनेकदा अन्न शिजवताना बंद पडते, किंवा कमी जळते. अशा परिस्थितीत अन्न शिजायला वेळ लागतो. त्यामुळे बर्नरच्या छिद्रांमध्ये काही अडकले तर नाही ना, याची तपासणी करून घ्या. त्यानंतर गरम पाण्यात बेकिंग सोडा मिसळून मिश्रण तयार करा. त्यात बर्नर काही वेळेसाठी ठेवा. नंतर टूथपिकच्या मदतीने प्रत्येक छिद्र स्वच्छ करा, शेवटी स्वच्छ पाण्याने धुवा आणि कोरडे करा. अशाप्रकारे आपण बर्नर स्वच्छ करू शकतो.

 

जर तरी देखील तुमची गॅसची फ्लेम मोठी होत नसेल तर प्रथम गॅस उलटा करावा आणि बर्नर असतात ते एक प्रकारच्या स्कूलने बांधलेल्या असतात. ते काढावेत ते काढल्यानंतर ज्या ठिकाणी बर्नर असतात. गॅस जाण्यासाठी प्रकारचे पाईप असते. त्या पाईपच्या पुढे एक नट बोल्ड सारखा भाग असतो त्यातून गॅस जातो. त्या ठिकाणी एक नटा सारखे पार्ट असतो तो काढावा. तो काढून सुईच्या साह्याने स्वच्छ करावा. एक फुंकर मारावी. जेणेकरून त्यामध्ये अडकलेला कचरा बाहेर निघेल व व्यवस्थित रित्या गॅस बर्नर पर्यंत जाईल.

 

जर आपला गॅस पाईप ३ महिन्यांपेक्षा जुना असेल तर, गॅस पाईप आधी चेक करा. गॅस पाईप काही कालावधीनंतर खराब होतात. ज्यामुळे गॅस बर्नरपर्यंत योग्य प्रकारे पोहचत नाही. ज्यामुळे बर्नरमधील फ्लेम कमी जळते. अशा स्थितीत गॅस पाईप नीट चेक करा.बर्नर आणि गॅस पाईप तपासल्यानंतरही फ्लेम कमी येत असल्यास, ही समस्या त्याच्या इतर भागांमध्ये देखील असू शकते. अशा वेळी स्क्रू ड्रायव्हरसारख्या गोष्टींचा वापर करून शेगडी उघडून स्वच्छ करा. तरी देखील फ्लेम लो असेल तर, शेगडी रिपेयर करणाऱ्याला बोलावून शेगडी ठीक करा.

 

अशा प्रकारे आपण घरच्या घरी शेगडी रिपेअर करू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published.