स्वतःची किंमत वाढवायची असेल तर या ” 20 गोष्टी ” नेहमी लक्षात ठेवा ..!!

Uncategorized

मित्रांनो, समाजामध्ये जर तुम्हाला स्वतःची किंमत वाढवायची असेल किंवा लोकांनी तुम्हाला चारचौघांमध्ये नोटीस करावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर आज आपण या व्हिडिओमध्ये अशा काही 20 गोष्टी पाहणार आहोत ज्यामुळे तुमची समाजामध्ये एक वेगळी इमेज तयार होईल. याची माहिती आपण आजच्या या लेखातून जाणून घेणार आहोत.

 

1. कोणाच्याही पुढे पुढे करू नका – एखाद्याने आपल्याला काही विचारलं नसेल किंवा काही काम सांगितले नसेल तर त्याच्या पुढे पुढे करू नका यामुळे त्या व्यक्तीला तुमची किंमत राहत नाही तो तुम्हाला फक्त गृहीत धरतो. म्हणून जोपर्यंत कुणीही स्वतःहून येऊन तुम्हाला काही सांगत नाही तोपर्यंत त्याच्या पुढे पुढे कधीच करू नका.

 

2. जशास तसे वागावे – नेहमी लक्षात ठेवा जो आपल्याशी जसा वागतो आपण देखील त्याच्याशी तसेच वागलं पाहिजे, तेव्हाच लोक आपल्याला किंमत देतात. कोणी कसाही वागला आणि तुम्ही जर त्याच्याशी फक्त चांगलेच वागत गेलात तर समोरचा व्यक्ती तुमची किंमत करत नाही. तुम्हाला महत्व देत नाही जो तुमच्याशी जसा वागतो त्याच्याशी तसच वागा तेव्हाच लोक परळ वागतात.

 

3. जिथे आपल्याला बोलावले नसेल तिथे जाऊ नका – जिथे तुम्हाला बोलावलेलं नसेल त्या ठिकाणी कधीही जायचं नाही. आणि समोरच्या व्यक्तीने आपल्याला बोलावले नाही हे देखील दुसऱ्यांजवळ सांगायचे नाही. यामुळे समोरच्या व्यक्तीला वाटते की आपण त्या गोष्टीची खंत करतोय.एखाद्याने आपल्याला बोलावले नसेल तर मनाला अजिबात वाईट वाटून घ्यायचे नाही, मात्र ही गोष्ट विसरायची देखील नाही. आज त्याची वेळ आहे, उद्या तुमचीही वेळ येणार आहे. त्या वेळी आपण देखील त्या व्यक्तीशी तसेच वागायचे.

 

4. स्वतःचा आदर करा – तुम्ही जर स्वतःचा आदर केला नाही तर लोक देखील तुम्हाला आदर देणार नाहीत त्यामुळे स्वतःला महत्त्व द्या. स्वतःमध्ये बदल करा आणि नेहमी स्वतःचा आदर करा.

 

5. राहणीमान सुधारा – आपण इतरांमध्ये वेगळे तेव्हाच दिसतो जेव्हा आपल्यामध्ये काहीतरी वेगळेपणा असतो म्हणून आपल राहणीमान अतिशय चांगल असल पाहिजे. गबाळ्यासारखे राहू नका. नेहमी स्वतःला प्रेझेंटेबल ठेवा.

 

6. नवनवीन गोष्टी शिकत रहा – नेहमी काही ना काही शिकत राहिले. पाहिजे जगासोबत स्वतःला अपडेट ठेवले पाहिजे यामुळे इतरांवर आपली एक वेगळीच छाप पडते आणि पर्यायाने आपली इज्जत वाढते लोक आपली किंमत करायला लागतात. आपल्याला खूप काही येते म्हणून लोक आपल्या संपर्कात येऊ लागतात.

 

7. सर्वांपासून थोडं अंतर ठेवूनच राहा- जर आपण रोजच एखाद्याच्या घरी गेलो तर काही काही दिवस तर त्या व्यक्तीला ते चांगलं वाटते. परंतु काही दिवसानंतर तो व्यक्ती आपला कंटाळा करायला लागतो. म्हणून काही दिवस तरी एखाद्यापासून दूर राहून बघा, त्या व्यक्तीला तुमची किंमत कळेल. तुम्ही जर नेहमीच कोणासाठी अवेलेबल राहाल तर ती व्यक्ती तुम्हाला किंमत देणार नाही. नवरा बायको मध्ये देखील थोडासा दुरावा आला तर प्रेम वाढते. म्हणून जर तुम्ही गावी कुठेतरी गेला असाल तर परत परत आपल्या लाईफ पार्टनर ला फोन करू नका. त्याला देखील आपण नसल्याची जाणीव होऊ द्या.

 

8. प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्याची मदत घेऊ नका – कुठल्याही लहान सहान गोष्टींसाठी लगेचच दुसऱ्याची मदत घेणे टाळा. यामुळे तो व्यक्ती तुम्हाला कमी समजायला लागतो. थोडीफार स्वतःची बुद्धी देखील चालवून स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्ही सक्षम आहात असे समोरच्याला वाटते आणि तो तुमचा आदर करायला लागतो.

 

9. नवरा बायको मध्ये भांडण होत असेल तर नेहमी दुसऱ्याला मध्ये पाडून तुमचे भांडण मिटवू नका, यामुळे समोरच्याचे फक्त मनोरंजन होते म्हणून तुमच्यामध्ये काही पर्सनल वाद असतील तर ते तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमचे वाद सोडवण्यासाठी नातेवाईक किंवा मित्रमंडळींना बोलावू नका, यामुळे तुम्ही नेहमी भांडत राहता अशी तुमची इमेज तयार होते आणि हीच लोक तुमची किंमत कमी करतात.

 

10. तुमचे सर्वच दुःखवटे इतरांसोबत वाटू नका – तुम्ही जर प्रत्येक वेळेस तुमच्या आयुष्यात काही वाईट घडत असेल ते दुसऱ्यांजवळ शेअर करत गेलात तर समोरच्याला वाटते की काय याचं रोज रोज तेच ते असते. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सुखामध्ये सगळे आपल्या सोबतीला असतात दुःखामध्ये कोणीही आपल्या सोबत नसते. दुःखाच्या किंवा संघर्षाच्या काळात आपल्याला एकट्यालाच सामना करावा लागतो म्हणून स्वतःमध्ये जिद्द ठेवा आणि सर्वच दुःखवटे इतरांसोबत वाटत फिरण्यापेक्षा त्यामधून मार्ग काढून ताठ मानेने जीवन जगा यामुळे लोक तुमची आपोआपच इज्जत करायला लागतात.

 

11. कामापुरता मामा : हल्लीच जग अतिशय स्वार्थी आहे. कोणीही गरजे शिवाय आपल्याशी बोलत नाही. म्हणून मग आपली वागणूक अशी पाहिजे ज्या व्यक्तीसोबत आपल्याला जेवढे काम असेल तेवढेच त्यांच्या संपर्कात रहावे. रिकामे तासंतास गप्पा मारत बसू नये. जेवढी आपली जवळीक वाढते तेवढीच किंमत कमी होत जाते. काम असेल तर इतरांजवळ जायचे इतर वेळेस स्वतः साठी वेळ देऊन तुमच्यामध्ये काय कमी आहे त्यावर अभ्यास करावा.

 

12. अनेक वेळेस आपण लोकांना जास्तच महत्त्व देतो आणि हीच आपली सर्वात मोठी चूक असते कारण गरजेपेक्षा जास्त महत्व दिलं तर लोक आपल्या डोक्यावर बसतात. स्वतःचा मानसन्मान ठेवायचा असेल तर लोकांपासून अंतर ठेवा. आणि आपण कुणाला किती महत्त्व देतो याची नेहमी काळजी घ्या.

 

13. लोकांचा स्वभाव ओळखायला शिका – काही वेळा आपल्याला समोरच्या व्यक्तीचा स्वभाव माहीत नसतो आणि आपण त्याच्याशी सहजच आपलं मनमोकळेपणाने वागत जातो, परंतु याचा समोरचा व्यक्ती काहीतरी चुकीचा अर्थ काढू शकतो. कोणाशीही जवळीक निर्माण करण्याआधी त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखूनच त्याच्याशी वागावे.

 

14. एखाद्याने जर आपला अपमान केला असेल तर त्याचा अपमानाचा बदला नेहमी त्याच्यासोबत भांडून नाही तर त्याच्या पेक्षा जास्त यशस्वी होऊन घ्यायचा. कोणाशीही वाद घालत बसण्यापेक्षा सर्व वेळेवर सोडून द्याव. वेळ प्रत्येकाचीच येते आणि वेळच त्या व्यक्तीला उत्तर देते.

 

15. जर तुम्हाला नेहमी आनंदी राहायचं असेल आणि लोकांनी तुमची किंमत करावी असं वाटत असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा कोण काय करतोय ? कशासाठी करतोय ? कोणासाठी करतोय ? याकडे अजिबात लक्ष देऊ नका तुम्ही जर सगळ्या गोष्टींपासून जितक स्वतःला लांब ठेवाल तुम्ही तितके जास्त आनंदी राहाल. दुसऱ्याच्या आयुष्यात सारख डोकावून पाहण्यापेक्षा स्वतःच आयुष्य चांगलं बनवण्याचा प्रयत्न करा.

 

16. तुमच्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांना सांगत जाऊ नका. लोकांना तुमच्या गोष्टी ऐकण्यात काहीही इंटरेस्ट नसतो त्यामुळे मोजक्याच गोष्टी इतरांसोबत शेअर करावेत बाकीच्या गोष्टी आपल्या पर्सनल ठेवल्या पाहिजे.

 

17. गरजेपेक्षा जास्त बडबड करणे – आपले शब्द नेहमी मोजून मापूनच बोलले पाहिजे, गरजेपेक्षा जास्त बडबड केल्यास लोक आपल्याला अतिशहाणा समजतात, म्हणून बोलताना जेवढं गरजेचं असेल तेवढेच बोलाव. यामुळे लोकांमध्ये आपल इम्प्रेशन पडते आणि लोक आपल्या स्वभावाने प्रभावित होतात.

 

18. एक चांगली व्यक्ती व्हा – आपल्या स्वतःमधील कमतरता ओळखून त्यावर नेहमी काम करा. आपले ध्येय, स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या. स्वतःच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुम्हाला यश मिळेल आणि तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकाल. जेव्हा तुम्ही आयुष्यात काहीतरी साध्य करता तेव्हा आपोआपच लोकांच्या नजरेत तुमची किंमत वाढते.

 

19. दुसऱ्यावर अवलंबून राहू नका – प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहिलात तर समोरचा व्यक्ती तुम्हाला कमजोर समजू लागतो. म्हणून स्वबळावर जगण्याचा प्रयत्न करा.

 

20. स्वतःचा स्वाभिमान राखा – एखादी गोष्ट तुम्हाला जमत नसेल तर समोरच्याला एकदा विचारून पहा जर समोरच्या व्यक्तीने तुमची मदत केली नाही तर परत परत त्याची विनंती करून त्याच्याकडे जाऊ नका. कारण शेवटी स्वतःचा स्वाभिमान देखील महत्त्वाचा असतो.

 

अशाप्रकारे हे आपली किंमत वाढवण्याचे 20 मार्ग आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.