मित्रांनो, स्त्री ही घरची लक्ष्मी मानली जाते घरातील प्रत्येक वस्तूंची काळजी ही घरची स्त्री घेत असते. त्यामध्ये प्रामुख्याने घराची स्वच्छता होय. जर ही स्वच्छता काही विशिष्ट पद्धतीने केले नाही तर आपले घर दारिद्र्याच्या दिशेने वाटचाल करते. तुमच्या घरातील स्त्रीया जे काम करतात त्यावर आपण गरीब होणार की श्रीमंत हे ठरत असते.कारण घरातील वस्तू, कामांमुळेच आपली वास्तू तथास्तु म्हणत असते.
भारतीय धर्मशास्त्रानुसार घरातील स्त्रियांनी अशी काही कामे केल्यास त्याचे परिणाम परिवाराला श्रीमंत बनवतात किंवा काही कामे गरीब बनवतात. जर आपल्या घरातील फरशी पुसताना काही चुका होत असतील तर याने घरात दारिद्र्य येऊ शकते.पण काही विशेष काळजी घेतली तर ते घर श्रीमंत होते. या सर्वांचेच माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
यामध्ये प्रामुख्याने जर तुमच्या घरात फरशी दुपारी 12 च्या पुढे पुसत असाल तर तुमच्या घरात माता लक्ष्मी कधीच निवास करत नाही. शास्त्रानुसार घरातील फरशी पुसण्याची वेळ ही दुपारच्या आधी असते. म्हणून आपण सकाळी लवकर उठून जितक्या लवकर फरशी पुसता येईल तितक्या लवकर पुसावी.सकाळची वेळ ही माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ असते. ज्या घरात लवकर फारशी पुसली जाते त्या घरात लवकर आ-जारपण येत नाही , ते घर प्रसन्न राहते. ते घर कायम पैशानी भरलेले असते.
आपल्या घरातील फरशी आठवड्यातुन एकदा तरी कडुलिंबाच्या पानाचा वापर करून पुसुन घ्यावी. यासाठी कडूलिंब 1 लिटर पाण्यात उकळून घ्यायचे आहे. मग त्यातील पाने बाहेर काढुन ते पाणी एक बादलीत ओता आणि त्यात साधे पाणी घालून फारशी पुसा. याने घरातील रोग आणि जं तू नाश हटवण्यासाठी मदत होते. कारण कडूलिंबात आयुर्वेदिक घटक आहेत आणि आयुर्वेदिक औ-षधामध्ये त्याला महत्त्वाचे स्थान आहे. त्याने घरातील अनेक प्रकारच्या जंतूपासून आपल्या बचाव होतो.
खास करून घरातील लहान मुलांचा सं-सर्गजन्य रोगांपासून बचाव करते. त्याने घरातील माणसे आ-जारी पडत नाहीत.अश्या प्रकारे फरशी पुसल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. त्याने घरात माता लक्ष्मी निवास करते. गुरुवारी फरशी कधीही पुसू नका कारण गुरू ग्रहावर याचा फार मोठा परिणाम होतो. आपल्या घरातील ईशान्य दिशेला गुरूचा कारक मानले आहे.त्यामुळे गुरुवारी फरशी पुसल्याने घरात दारिद्र्य येते. खासकरून घरातील स्त्रीयांनी याची काळजी घ्यावी आणि आपल्या घराला दारिद्र्यपासून वाचवावे.
अशाप्रकारे फरशी पुसण्याचे नियम आजच्या या लेखातून आपण जाणून घेतलेले आहेत.