सुंदर विचार…. नाती जिवंतपणीच सांभाळा नंतर कावळ्याला खायला घालून माणसं परत येत नाहीत?

Uncategorized

मित्रांनो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये असं काही क्षण येतात ज्यामध्ये प्रत्येक माणूस हा आतून तुटतो. अशा वेळेला त्याला कोणताच गोष्टीचा प्रभाव पडत नाही. तो कोणाच्या ऐकण्यास देखील तयार नसते. परंतु या वेळेतून त्याला बाहेर काढायचे असेल तर ज्या गोष्टीचा त्याच्यावर परिणाम करेल तो म्हणजे सुंदर विचार. असेच काही आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

 

उगाच काळजी करत राहणं म्हणजे पाऊस येईल या भीतीने सतत छत्री उघडून चालण्यासारखं आहे…

बीना रडता तर कांदापण कापता येत नाही; मग हे तर आयुष्य आहे. सुखातच कसे जाईल !

जखमी सिंह कधीच माघार घेत नाही.

स्वाभिमानाचा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहणं कधीही चांगलं.

भीती Confusion ची असायला हवी. Decision ची नाही..

जेव्हा आपण आपला वेळ एखाद्या व्यक्तीला प्रमाणापेक्षा जास्त देतो तेव्हा समोरच्याला त्याची किंमत राहत नाही.

आयुष्यात कुठे थांबायचं हे ज्यांना वेळेवर समजतं त्यांना जास्त प्रॉब्लेमला तोंड द्यावं लागत नाही.

मोठमोठ्या माणसांची नावं सांगून काम करुन घेण्यापेक्षा, मोठमोठ्या लोकांनी तुमच्या एका निरोपावर काम केलं पाहिजे. असं काहीतरी करा.

अंतरात्म्याचा आवाज येणं बंद झाला की, मनुष्य सहज खोटं बोलायला लागतो.

लहानपणी शाळेत असताना वाटायचं कधी एकदा या तुरुंगातून सुटतोय, पण जेव्हा शाळेतून कायमच आपण बाहेर पडतो तेव्हा समजतं खरा स्वर्ग तर शाळाच होती.

आपले लक्ष्य, साध्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले तेवढ्यावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल.

स्वतःच्या आयुष्याची तुलना इतर कुणाशीही करु नका. सगळी फुलं एकाचवेळी फुलत नाहीत.

पैसा त्या लोकांकडे जात नाही ज्यांना त्याची गरज असते, पैसा त्यांच्याकडे जातो ज्यांना त्याचा वापर करता येतो.

सिंहाचा एक गुण आपण घेतला पाहिजे. शिकार मोठी असो वा छोटी, सिंह पूर्ण ताकदीने शिकार करतो.

कोणी कौतुक करत नाही म्हणून तुम्ही करत असलेलं चांगलं काम थांबवू नका.

नाती जिवंतपणीच सांभाळा. नंतर कावळ्याला खायला घालून माणूस परत येत नाही.

एका मेलेल्या व्यक्तीने किती छान म्हटलंय… श्वासासोबत एकटाच चालत होतो.. जेव्हा श्वास गेला तेव्हा सर्व सोबत चालत होते…

मनुष्य केवळ आपल्या गुणांनी आणि कर्मानेच मोठा होतो. उत्तम वस्त्र व सौंदर्य असूनही उत्तम गुण नसतील तर ती गोष्टी शेवटी मातीमोल ठरतात.

आयुष्य आपल्याला रडवण्याचा प्रयत्न करत असतो… आपण मात्र हसण्यावर ठाम रहायचं..!

जेंव्हा भावना बोलकी होते तेंव्हाच वेदना हलकी होते ..

प्रत्येक वेळेस मदत म्हणून पैसा च गरजेचा नसतो, सहानुभूती चे काही शब्द ही माणसाला खूप मोठा आधार देऊ शकतात.

अधिकार मागणारे सगळेच असतात, जबाबदारी घेणं मात्र प्रत्येकालाच जमत नाही.

माणसाचे दोन गुरू असतात एक अनुभव आणि दुसरे कर्म हे… दोघेही सोबत राहतात. कर्म हे लढायला शिकवत असतो आणि अनुभव हा जिंकायला शिकवत असतो.

जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते आणि ते कोठे जमिनीवर नाहीं तर आपल्या मनात रुजवावे लागते.. कोणाच्याही सावलीखाली उभा राहील्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही.. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते..

ज्यांची सुरुवात शून्यातून होते त्यांना हारण्याची भीती नसते.

यश मिळवायचं असेल, तर स्वतःच स्वतःवर काही बंधनं घाला.

मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा, ज्ञानाचा प्रकाश कुठून येईल हे सांगता येत नाही.

काही लोकांच अस असते, जिथे खायला भेटल, बाजू त्याच माणसांची घेणार, मग ते खोट का असेना, एखाद्याच खरं असलं तरी, त्याला खोट्यात काढणार, अशा लोकांच पोट आयुष्यभर कधीच भरत नाही.

दुसऱ्याच्या पराभवाची वाट बघणाऱ्याला हे समजतच नाही की, दुसऱ्याच्या वेगावर लक्ष ठेवता ठेवता त्याचा स्वतःचा वेग आपोआपच कमी होत असतो.

माणूस मुहूर्ताविना जन्म घेतो आणि मुहूर्ताविना जग सोडून जातो, तरीही चांगल्या मुहूर्ताच्या मागे धावत राहतो. मुळात आपले विचार चांगले आणि आचरण शुद्ध असेल, तर कोणतीही वेळ आणि कृती वाईट असूच शकत नाही.

माझ्याकडे किती पैसे आहेत हे जगाला दाखवण्यासाठी वायफळ खर्च करणं हे लवकर गरीब होण्याचं लक्षण आहे.

जास्त पैसे कमावण्यापेक्षा कमावलेल्या पैशांचं नियोजन करणं जास्त महत्त्वाचं आहे.

प्रत्येक संकटात काहीतरी फायदा मिळवून देणारे बीज दडलेले असते.

लोक जेव्हा तुम्हाला नकार देतात तेव्हा त्याला नवीन काहीतरी मिळण्यासाठीचा होकार समजून पुढे जा.

काही करायचं असेल तर स्वतःच्या हिमतीवर करा. उद्या कुणी म्हणायला नको, ह्याला मी मोठं केलंय.

तोपर्यंत प्रयत्न करा जोपर्यंत तुम्हाला स्वतःची ओळख करून देण्याची गरज भासणार नाही.

तुम्ही एका दिवसात झाडाला कितीही पाणी घातले तरी त्याला फुले तेव्हाच येणार जेव्हा हंगाम येईल म्हणून संयम बाळगा आणि प्रयत्न चालू ठेवा.

मनातले विचार हे लाटेसारखे असतात. आपण त्यांना थांबवू शकत नसलो तरी कुठल्या लाटेवर आरूढ व्हायचं हे नक्कीच ठरवू शकतो.

आईवडीलांनी दिलेल्या सल्ल्यावर औषधाप्रमाणे विश्वास देवा… सल्ले थोडे कड़वट असतील पण नक्कीच जीवनात संजावनी ठरतील.

एकमेकांसारखे असणं गरजच नाही. एकमेकांसाठी असणं गरजेच आहे.

जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका. कारण जग ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतं आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळतं.

एकीकडे जिवंत माणसाची मन दुखवायची. दुसरीकडे खूप देवपूजा करायची. म्हणजे सगळी पापं धुतली जातात. ही जगातली सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे.

बुध्दीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोकं जास्त चांगली असतात… कारण बुद्धीचा वापर करणारे लोकं आधी स्वतःचा विचार करतात पण मनाचा वापर करणारी लोकं सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करतात !!

विश्वास जपणं खुप महत्त्वाचं असतं कारण दिलेला शब्द खाली पडला की ‘सॉरी’ या शब्दाला काहीच अर्थ राहत नाही.

नवर्याचा आत्मसन्मान जपणार्या बायकोला नवरा आयुष्यभर जपतो.

आपल्यामध्ये क्षमता असताना दुसऱ्याचा आधार घेणं म्हणजे आपलं अस्तित्व वाया घालवणे.

आपणच पेरलेल्या कर्माचं जेव्हा एक मोठं झाड होतं आणि ते झाड आपल्याला कर्माचं फळ द्यायला लागतं तेव्हा ते फळ गोड असो की कडू खावंच लागतं.

वेड्या सारखं धावण्यापेक्षा, विचार करून शांततेने चालणे केव्हाही फायदेशीर ठरतं!!

 

अशा प्रकारे आजच्या या लेखांमध्ये आपण सुंदर सुविचार जाणून घेतलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.