मित्रांनो, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाने विशेष ओळख निर्माण करणारा कलाकार म्हणजे श्रेयस तळपदे. आज श्रेयसने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. श्रेयसने बॉलीवुड गाजवलं तरी आजही तो आवर्जून मराठी मालिकांमध्येही काम करतो, त्यामुळे तो अधिकच प्रेक्षकांच्या जवळ गेला आहे. एवढेच नाही तर तो प्रचंड साधा आणि सर्वांशी प्रेमाने वागणारा अभिनेता अशी त्याची ख्याती आहे.
आज जरी त्याने हे यश मिळवलं असलं तरी, त्याच्यासाठी हा स्ट्रगल सोपा नव्हता. त्याने खूप मेहनत घेतली आहे. पण त्याच्या यशामध्ये त्याला साथ दिली ते स्वामी समर्थ महाराजांनी. याचाच किस्सा त्याने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितला आहे. श्रेयस तळपदे व जितेंद्र जोशी यांना ज्यावेळी काम नव्हते त्यावेळी ते श्री स्वामी समर्थ मठा मध्ये गेले होते आणि त्यावेळी त्यांच्या मध्ये एक चमत्कारिक गोष्ट घडून आली. ती चमत्कारिक गोष्ट आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.
अभिनेता श्रेयस तळपदे चर्चेत आहे. ‘इंडस्ट्रीत काम करताना तुम्हाला स्वत:मध्ये सतत बदल घडवावा लागतो. मी गेली पंधरा सोळा वर्ष इथं टिकलोय ते प्रेक्षकांच्या प्रेमामुळंच’, असं तो नेहमीच सांगतो. त्यानं त्याच्या अभिनयाच्या जोरावर मराठीसोबतच बॉलिवूडमध्येही वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘पुष्पा’ ला दिलेल्या आवाजानंतर तर तो दक्षिणात्य इंडस्ट्रीमध्येही हिट झालाय. आता जरी त्याच्या करिअरची गाडी सुटाट असली तरी एक वेळ अशी होती की, त्याला मिळवण्यासाठी प्रचंड धडपड करावी लागली होती.
धडपड केल्यानंतर काम मिळालं देखील. पण पुन्हा तेच. त्याला म्हणावं तसं काम मिळत नव्हतं. या कठीण काळात त्याला चांगली वाईट माणसं भेटली. श्रेयस लवकरच खुपते तिथे गुप्तेच्या आगामी एपिसोडमध्ये झळकणार आहे. याचा एक प्रोमो काही दिवसांपूर्वी शेअर करण्यात आला होता. आता नवीन प्रोमो चर्चेत आलाय. खुपते तिथे गुप्ते या शोमध्ये जवळच्या वक्तीला कॉल करून आलेल्या पाहुण्यांना भावना व्यक्त करण्याची संधी दिली जाते.
श्रेयसच्या या खास भागात तो कोणाला कॉल करणार याची चाहत्यांना उत्सुकता होती. या खास सेगमेंटमध्ये श्रेयस त्याचा खास मित्र जितेंद्र जोशी याला व्हिडिओ कॉल करणार आहे. या व्हिडिओ कॉलमध्ये जितेंद्र श्रेयसच्या फिल्मी करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल बोलताना दिसतो. जितेंद्र म्हणतो की…
श्रेयस बोलण्यासारखं खूप आहे, अनेक गोष्टी आहेत… माध्याकडं काम नव्हतं तेव्हा तेव्हा आपल्या मित्राकडं सतिश राजवाडे याच्याकडं मला घेऊन जाणारा तूच होतास, असं म्हणत जितेंद्रनं श्रेयसनं निभावलेल्या मैत्रीचा खास किस्सा सांगितला.
स्वामी समर्थ यांच्या मठामध्ये गेलो…तर जितेंद्रनं आणखी एक भावुक असा किस्सा शेअर केला. तो म्हणाला की, मला एक किस्सा आजही चांगला आठवतो. तुझी आई तुला म्हणाली होती की, नाटक करून काही होत नाहीये. आता नोकरी कर कुठं तरी. तेव्हा आपण दोघं स्वामी समर्थांच्या मठात गेलो होतो. आपण दोघांनी मिळून स्वामींना प्रार्थना केली. त्यानंतर जे झालं ते अख्ख्या महाराष्ट्रानं अन् देशानं पाहिलं….असा हा भावुक किस्सा जितेंद्रनं सांगितला. जितेंद्र हे सगळं बोलत असताना श्रेयला त्याच्या अश्रू लवपता आले आहेत. त्याच्या डोळ्यात पाणी आलं.
अशाप्रकारे ज्या वेळेला जितेंद्र आणि श्रेयस या दोघांकडे काम नव्हते त्यावेळी स्वामी समर्थ मठमध्ये गेला. आणि स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांच्याकडे अनेक कामे आले आणि ते आज या ठिकाणी उभे आहेत.