लग्नानंतर ही स्त्रिया बाहेर अफेयर का करतात… Boyfriend… लफडं… love Attraction विवाहित असाल तर एकदा नक्की बघाच..!!

Uncategorized

मित्रांनो,असं म्हणतात की प्रेम हे आंधळं असतं, त्यामुळे कोण कधी कोणाच्या प्रेमात पडेल याचा काही नेम नाही. शिवाय प्रेम हे एकदाच होतं असं नाही. असे अनेक लोक आहेत. ज्यांना आयुष्यात एकापेक्षा जास्तवेळा देखील प्रेम झालं आहे. एवढंच काय तर अनेक लोकांना लग्नानंतर इतर व्यक्तींवर प्रेम होतं. यामध्ये महिला देखील अपवाद नाहीत. म्हणूनच आज आपण स्त्रिया अफेयर का करतात याची माहिती जाणून घेणार आहोत.

 

महिला अफेअर करतात कारण त्यांच्या मधले जे काही हार्मोन्स असतात जे आनंद प्रदान करणारे हॅप्पी हार्मोन्स म्हणून ओळखले जातात. जे हार्मोन्स असतात ते आनंद न मिळाल्यामुळे कमी होतात आणि म्हणून मुली किंवा बायका असे करतात. सर्वप्रथम तुम्ही अविवाहित असाल आणि अफेअर करत असाल तर ते नक्की काय आहे? ते अफेअर आहे की खरच प्रेम आहे, तुमच्या आई-वडिलांची संमती आहे का, आणि यातून तुम्हाला कुठला आनंद मिळतोय, हा आनंद फक्त शारीरिक आहे की यातून तुम्हाला काही क्रिएटिव्हिटी दोघेही तुम्ही यातून पुढे जाणार असाल आर्थिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या देखील! ज्याला समाज एक नाव देणार आहे. तुम्ही एक नाव देणार आहात. ते आपण आधी बगितल पाहिजे.

 

आणि एक वैवाहिक जीवन जगत असाल तुम्हला मुलं आहेत आणि जर तुम्ही असं काही करत असाल तर पहिली गोष्ट म्हणजे आयुष्यामध्ये मरेपर्यंत हे नातं जाणारे आहे का नाही. ते नातं कुठेतरी संपणारच आहे. मग आशा नात्यात पडायचं का? दुसरी गोष्ट म्हणजे हा पूर्णपणे गैरसमज आहे की नवरा बायकोचं जर पटलं तरच हॅपी हार्मोन्स निर्माण होतात. नवरा-बायकोचं जर पटलं नाही तर हॅपी हार्मोन्स निर्माण होत नाही. मग असं जर असतं तर आपण पूर्ण ब्रह्मचर्याश्रम पूर्ण जो अध्ययनाचा जो आपला 25 वर्ष किंवा पहिली काही वर्ष तो आपण हॅप्पीने जगू शकलो नसतो.

 

असं बिलकुल नाहीये हा हॅप्पी हार्मोन्स निर्माण होतात. जेव्हा आनंद मिळणाऱ्या आपल्याला आतून जेव्हा आनंद येतो अशा गोष्टी आपण करतो त्यावेळेला हॅपी हार्मोन्स निर्माण होतात. त्यामुळे फक्त शारीरिक मानसिक आणि या गोष्टी जर आपल्या पूर्ण झाल्यावरच आपल्यामध्ये हॅपी हार्मोन्स निर्माण होणारे आणि तरच आपण कुठेतरी काहीतरी करू शकू. तरच कार्यक्षमता वाढणार आहे. हे पूर्णपणे चुकीचा आहे हे लक्षात घ्या. हे जे नातं आहे हे तुमचं शेवटपर्यंत टिकणार नाहीये.

 

दुसरी गोष्ट तुम्ही विवाहित आहात तुम्ही वैवाहिक जीवनात आहात आणि तुम्हाला जर मुलं असतील तुम्ही हा सुद्धा विचार करा जर तुमचं नातं उद्या समाजासमोर उघडं पडलं तर तुम्ही काय कराल? अशा वेळेला तुमच्या मुलांचे काय हाल होतील, तुमचे काय हाल होतील. तर हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा सेल्फ ऍनालिसिस करा सेल्फ इंटरेस्ट पेक्षा करा लिहून काढा की तुम्हाला याची खरच गरज आहे का आणि तुम्हाला अशा काही गोष्टी आहेत का की ज्यातून तुम्ही आनंद निर्माण करू शकता.

 

अशा गोष्टी आपल्याला शोधायच्या आहेत. आता जेव्हा आपण काही निर्माण करणार आहोत, त्यावेळेला आपल्या डोक्यातला माईंड ब्लॉक किंवा आपल्या मनातला माईंड ब्लॉक हा पहिल्यांदा आपण क्लिअर केला पाहिजे. तो कसा करणार! तर ही गोष्ट मनाशी घट्ट करा मनाशी खुणगाड बांधला आणि पूर्णपणे पक्की करा की या अफेअर मधून सर्वांगीण दृष्टीने नुकसानच आहे. सर्वांच्या हिताचं हे नाहीये. ना माझ्या हिताचे, ना माझ्या मुलांच्या हिताचे त्यामुळे असं काही असेल तर ताबडतोब हे बंद करा. आता तुमच्या मनात अजून एक माईंड ब्लॉक आहे की याच्यामुळेच मला आनंद मिळतो.

 

तो सुद्धा माईंड ब्लॉक काढून टाका. असं काहीच नाहीये की या गोष्टी मिळाल्या तरच तुम्हाला आनंद मिळेल बाहेरून तुम्ही कुठलाही भावनिक किंवा मानसिक आधार घेऊ शकत नाही. तुमचा आनंद हा तुमच्या अंतरात्म्यामध्येच तुम्हाला शोधायचा आहे. आता सर्वप्रथम तुमची डायरी किंवा वही पेन तुम्ही बाहेर काढायचं आणि स्वतःच्याच मनाला विचारायचे की तुम्हाला कुठल्या इतर गोष्टी आवडतात. म्हणजे जर तुम्ही धार्मिक असाल जर तुम्ही पूजाअर्चाच ध्यान त्याच्यावर तुमचा विश्वास असेल आणि त्यात तुमचं मन रमत असेल तर ते तुम्ही ताबडतोब करायला सुरुवात करा.

 

म्हणजे अगदी आजपासूनच ते करायला सुरुवात करा. हळूहळू त्यातून तुम्हाला आनंद मिळायला लागेल. कारण यापूर्वी तुम्ही तो आनंद अनुभवलेला आहे. जर तुम्हाला कुकिंगची आवड असेल तर वेगवेगळे पुस्तक काढा, youtube वर बघा आणि छान छान रेसिपीज घरात तयार करायला सुरुवात करा. केक बनवण्याची आवड असेल तर ते करायला सुरुवात करा. खेळाची आवड असेल तुम्ही पूर्वी स्पोर्ट्स पर्सन असाल तर तुम्ही खेळ खेळायला सुरुवात करा, स्विमिंग क्लासेस लावा. अशा गोष्टीतून आनंद शोधा. डान्स आवडत असेल तर डान्स करा. तुम्हाला वाचनाची आवड असेल तर चांगली पुस्तकं वाचा.

 

आणि एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे संगत नेहमी चांगली ठेवा. एक वेळ तुम्हाला संगत नसेल तरी चालेल परंतु वाईट संगतीत कधीच येऊ नका. अधून मधून कुठेतरी छान फिरायला जा. जिथे तुम्हाला भरपूर ऊन वारा पाऊस मिळेल आणि स्वच्छंद निसर्गामध्ये तुमच्या फॅमिली बरोबर आनंद घ्या. आपल्या मुलांकडे लक्ष केंद्रित करा. कारण एक उज्वल भविष्य घडवण्याची संधी तुम्हाला मिळालेली आहे आणि जर तुमच्या मुलांचं उज्वल भविष्य तुम्ही घडवलं तर उज्वल भारत सहजच निर्माण होऊ शकणार आहे. तसेच जर तुम्हाला हा अंतरिक आनंद अशा चांगल्या क्रिएटिव्ह गोष्टींमधून मिळू लागला तर तुम्हाला बाहेरून आनंद शोधण्याची गरज नाही. या गोष्ट जर तुम्ही केली अशा गोष्टींमधून जर तुम्ही आनंद मिळवला तर नक्कीच हे हॅपी हार्मोन्स तुम्हाला इतर कुठल्याही अनैतिक मार्गाने शोधण्याची गरज नाही.

 

अशा प्रकारे स्त्रियांनी हॅपी हार्मोन्स कसे निर्माण करावेत याची महिती जाणुन घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.