रोज रोज टॉयलेट साफ करायची गरज नाही? टॉयलेट मध्ये कपड्याची साबण टाकताच कमाल झाली…..!!

Uncategorized

मित्रांनो, चांगली स्वच्छता आणि आरोग्य राखण्यासाठी योग्य स्वच्छता आवश्यक आहे. संसर्ग आणि जंतूंचा प्रसार यापासून संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी एखाद्याने सातत्य राखले पाहिजे. हे जंतू धोकादायक आजारांचे मूळ कारण आहेत ज्यामुळे तुमचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. सामान्यतः, लोक गृहीत धरतात की टॉयलेट फ्लश करणे आणि पटकन हात धुणे हा सुरक्षित राहण्याचा मार्ग आहे. परंतु प्रत्यक्षात, आपण आणि आपल्या कुटुंबास निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या चरणांचे पालन केले पाहिजे.

 

टॉयलेट सीटच्या पृष्ठभागावर लाखो हानिकारक सूक्ष्मजंतू पसरलेले आहेत. त्यामुळे हात न धुता चेहरा किंवा अन्नाला हात लावणार नाही याची पुरेशी काळजी घेतली पाहिजे. टॉयलेट घरातील अशी एक जागा असते जिथे बॅक्टेरियाज आणि व्हायरसची संख्या वाढते. त्यासाठी नियमित स्वरूपात साफ-सफाई करणं गरजेचं असतं.

 

अनेकदा बॅक्टेरियल इन्फेक्शनचं कारण ठरतं. टॉयलेट सीट साफ करणं स्वच्छता आणि आरोग्यासाठी फार महत्वाचे असते. ज्यामुळे गंभीर स्थिती उद्भवू शकते. ज्यामुळे संक्रमणाचा धोका कमी होतो. अनेकदा टॉयलेट सीट हात लावून घासण्याची अनेकांना किळस वाटते. आज आपण एक साधा सोपा उपाय पाहणार आहोत की ज्यामुळे आपले टॉयलेट तर स्वच्छ होते त्याचबरोबर कसलाही प्रकारचे डाग टॉयलेटमध्ये जमा होत नाहीत.

 

या उपायासाठी आपल्याला आपण घरामध्ये वापरत असलेला धुण्याच्या साबणाची आवश्यकता लागणार आहे. हा धुण्याचा साबण कोणत्याही कंपनीचा असला तरी देखील चालू शकतो. जसे की रीन, घडी यापैकी कोणताही साबण असला तरी काहीही फरक पडत नाही. प्रथम आपल्याला हा साबण किसणीच्या साह्याने किसून घ्यायचा आहे. अर्धा साबण आपल्याला किसून घ्यायचा आहे.

 

किसून घेतल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे मीठ टाकायचे आहे व दोन चमचे बेकिंग सोडा यामध्ये घालायचा आहे आणि एक चमचा इतका पाणी घालून ते मिक्स करून घ्यावे व त्याचा छोटे छोटे गोळे तयार करायचे आहेत. तुम्हाला प्रश्न पडला असेल की या गोळ्यांचा वापर आपण कसा करावा? तर जर तुमचे इंडियन टॉयलेट असेल तर एका बाटलीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये एक गोळा टाकावा व ते पाणी चांगले एकजीव करावे.

 

त्यातील साबण विरघळल्यानंतर ते पाणी आपल्या इंडियन टॉयलेट मध्ये सगळीकडे मारावे किंवा स्प्रे केला तरी देखील चालू शकतो आणि लगेचच हे पाणी मारल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊ नये. थोड्या वेळानंतर आपण टॉयलेट धुवून घ्यावे. नक्कीच तुमचे टॉयलेट अगदी क्लीन होईल व कसलाही प्रकारचे पिवळे डाग पडल मध्ये पडणार नाही.

 

आणि जर तुमचे वेस्टर्न टॉयलेट असतील तर त्याचा वापर आपण कसा करावा? असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर एक छोटी बॉटल घ्यावी त्याच्या टोपणाला छोटे छोटे छिद्र करावे आणि त्या बाटलीमध्ये एक चतुर्थांश इतके पाणी घेऊन त्यामध्ये एक गोळा टाकावा आणि ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यावे. साबण विरघळल्यानंतर ही बॉटल उलटी करून तुमच्या फ्लश च्या बॉक्समध्ये घालावी.

 

आणि जेव्हा तुम्ही फ्लश कराल त्यावेळेला त्यातील हा फॉर्म्युला आपला टॉयलेट मध्ये जाईल आणि चांगला प्रकारे आपल्या टॉयलेट क्लीन होईल. एकदा जर तुम्ही हा उपाय केला तर आठवडाभर तो हा उपाय चालणारा इतका आहे. एका छोट्या गोळ्याचा उपाय कमीत कमी आठवडाभर जाऊ शकतो.

 

अशा प्रकारे हा घरगुती आणि साधा सोपा उपाय तुम्ही नक्की करून बघा. तुमचे टॉयलेट अगदी क्लीन होईल.

Leave a Reply

Your email address will not be published.