मित्रांनो, रेशन कार्ड म्हणजे मोफत मध्ये धान्य वाटप केले जाणारे साधन असे आपण म्हणू शकतो. तुम्हाला तर माहीतच आहे की, रेशन कार्ड मार्फत अनेक प्रकारचे लाभ सर्वसामान्य माणसांना होत आहे. या कार्ड अंतर्गत मोफत मध्ये अनेक प्रकारचे योजनांचा लाभ आपल्याला घेता येतो. या कार्डमार्फत मुख्य म्हणजे शिधावाटप केले जाते.
त्यामध्ये तांदूळ, गहू, डाळी, कडधान्य अशा आपल्या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश केला जातो. याच रेशन कार्ड धारकांना अनेक प्रकारचे वस्तू देखील मोफत मध्ये दिला जातात. सरकार कडून रेशन कार्डधारकांना गौरी गणपतीच्या निमित्त काही वस्तू मोफत मध्ये दिला जाणार आहे. त्या वस्तू कोणत्या? त्या वस्तू कधी मिळणार? त्याची संपूर्ण माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
सर्व रेशन कार्डधारकांसाठी ही एक खुशखबर आहे. कारण राज्यातील नागरिकांसाठी गौरी गणपती सणानिमित्त सरकारकडून आनंदाचा शिधा दिला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार नागरिकांना खुश करण्यासाठी लवकरच आनंदाचा शिधा वितरित करणार आहे. त्याचबरोबर गणेशोत्सव गोड करण्यासाठी सरकारकडून तब्बल 562 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर याबाबतची प्रक्रिया अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने सुरू देखील केली आहे.
त्याचबरोबर या योजनेचा लाभ हा सर्व जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिका धारकांना दिला जाणार आहे. त्याचबरोबर हा शिधा नागरिकांना रेशन सारखाच फक्त शंभर रुपयात हा शिधा दिला जाणार आहे. यामुळे नागरिकांचा मोठा फायदा होणार आहे. या शिधाचे वाटप 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या महिन्यात ही ई -पास प्रणालीद्वारे केल्या जाणार आहे. तसेच यावेळेस दारिद्र रेषेखालील केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात आनंदाचा शिजा वाटप केला जाणार आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या आनंदाचा शिधा मध्ये नागरिकांना काय काय मिळणार?
1. एक किलो चणाडाळ
2. एक किलो साखर
3. एक किलो सोयाबीन तेल. त्याचबरोबर इतर काही वस्तू सरकारकडून दिल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. तसेच छत्रपती संभाजी नगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील दारिद्र रेषेखालील केशरी रेशन कार्डधारकांना सवलतीच्या दरात या खाद्य वस्तू देण्यात येणार आहेत. यामुळे या जिल्ह्यातील रेशन कार्डधारकांना दुहेरी फायदा होणार आहे.
त्याचबरोबर या योजनेत कोणताही भ्रष्टाचार होऊ नये यासाठी आनंदाचा शिधा हा ई-पास प्रणाली द्वारे सर्व नागरिकांना दिला जाणार आहे. यामुळे या योजनेत कोणत्याही प्रकारे भ्रष्टाचार होणार नाही. आणि नागरिकांचा सण हा धुमधडाक्यात पार पडेल. राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे, नागपूर विभागातील वर्धा या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शिधापत्रिका धारक शेतकरी यांना या आनंदाचा शिधा मिळणार आहे. प्रती शिधापत्रिका एक शिधा जिन्नस संचाची खरेदी करण्यासाठी ५६२.५१ कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. या संचाचे वाटप ई-पॉस प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे.
अशाप्रकारे रेशन कार्डधारकांना हा आनंदाचा शिधा मिळणार आहे.