मित्रांनो, वास्तुशास्त्रात व्यक्तीने कोणत्या दिशेला पाय करून झोपावे, यासाठी दिशाही निश्चित केली आहे. एखाद्या व्यक्तीने कोणत्या दिशेला डोके आणि पाय करून करून झोपू नये, या विषासंदर्भातील महिती आज आपण जाणुन घेणार आहोत. चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे. दिवसभर दमून गेल्यानंतर रात्री झोपताना, आपण नेमक्या कोणत्या बाजूला डोके करून झोपतो, याचा विचार करत नाही. झोपेत असताना बर्याच वेळा आपण अशी चूक करतो, ज्याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होतो.
पुरेशी झोप मिळण्याचे महत्त्व, विज्ञान आणि धर्म या दोहोंमध्ये नमूद केले आहेमनुष्य आपल्या दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी करत असतो, ज्याचा काहींना विविध प्रकारे त्रास सहन करावा लागतो. असं नसतं की एखादी व्यक्ती या सर्व गोष्टी जाणूनबुजून करते, परंतु माहितीच्या अभावामुळे काही चुकीच्या गोष्टी आपल्याकडून केल्या जातात, ज्याचा जीवनावर वाईट परिणाम होतो आणि त्याच्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. यापैकी एक म्हणजे चुकीच्या दिशेला पाय करून झोपणे.
वास्तुशास्त्रात व्यक्तीने कोणत्या दिशेला झोपावे, यासाठी दिशाही निश्चित केली आहे. एखाद्या व्यक्तीने कोणत्या दिशेला डोके आणि पाय करून झोपावे, या संदर्भातील माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. शरीरातून ऊर्जा निघून जाते. एखादी व्यक्ती चुकीच्या दिशेला पाय करून झोपली तर तिच्या शरीरातील सर्व ऊर्जा निघून जाते, कारण चुकीच्या दिशेने पाय ठेवून झोपल्याने शरीरावर नकारात्मक परिणाम होतो, असे मानले जाते. या दिशेला पाय करून झोपू नये. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये. दक्षिण दिशा ही यमदूत, यम आणि नकारात्मक ऊर्जेची दिशा मानली जाते, त्यामुळे या दिशेला पाय करून झोपू नये.
पूर्व दिशेलाही पाय करू नये. वास्तुशास्त्रानुसार, व्यक्तीने सूर्योदयाच्या दिशेला पाय करून झोपू नये. म्हणजे पश्चिम दिशेला डोके ठेवून झोपू नये. त्याचाही शरीरावर नकारात्मक परिणाम होतो.चुकीच्या दिशेला पाय करून झोपल्यास काय होते? वास्तुशास्त्रात सांगितले आहे की, जर व्यक्ती पूर्व किंवा दक्षिण दिशेला पाय करून झोपली, तर मनात नकारात्मक विचार आणि भीतीदायक स्वप्ने पडतात. याशिवाय व्यक्ती निराशा आणि भीतीचे बळी ठरते.
कोणत्या दिशेला पाय करून झोपावे? वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेला पाय करून झोपल्याने सुख, समृद्धी, शांती, संपत्ती आणि दीर्घायुष्य प्राप्त होते. याशिवाय पूर्व दिशेला डोके करून झोपल्याने ज्ञान मिळते. दक्षिणेकडे डोके करून झोपण्याचा फायदा वास्तुशास्त्राच्या मते दक्षिण दिशेने डोके करून झोपल्याने आपले आरोग्य निरोगी राहते आणि यामुळे आपण सर्व प्रकारच्या आजारांपासून दूर राहु शकता. हा विश्वास वैज्ञानिक तथ्यांवरही आधारित आहेत. असा विश्वास आहे की, दक्षिण दिशेकडे पाय करून झोपल्यानंतर डोक्यातून चुंबकीय प्रवाह येतो आणि पायात प्रवेश करतो.
यामुळे, मानसिक ताण वाढतो आणि आपण सकाळी उठल्यावर आपले मन दुःखी वाटते. या व्यतिरिक्त, आपण इच्छित असल्यास, आपण आपले डोके पूर्वेकडे आणि पाय पश्चिम दिशेने ठेवू शकता. कारण, सूर्य पूर्वेकडून उगवतो आणि हिंदू धर्मात, सूर्याला जीवन प्रदाता मानले जाते. अशा स्थितीत पूर्व दिशेने पाय करून झोपणे शुभ मानले जात नाही. म्हणून, डोके पूर्वेकडील दिशेने ठेवणे चांगले. असे केल्याने आपण दीर्घायुषी देखील व्हाल.
झोपेशी संबंधित महत्वाच्या गोष्टी. झोपेचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी जवळचा संबंध आहे. म्हणून ऋषी-मुनींनी झोपेसाठी काही नियम बनवले आहेत. शास्त्रानुसार संध्याकाळी झोपू नये. निरोगी आरोग्यासाठी, झोपेच्या दोन तास आधी अन्न खावे. जेणेकरून पोटाच्या समस्या दूर राहतात. तातडीची कामे नसल्यास रात्री उशीरापर्यंत जागू नये. झोपेच्या आधी मन शांत ठेवा आणि देवाचे ध्यान करा.
अशा प्रकारे कोणत्या दिशेला पाय करून झोपू नये याबद्दलची माहिती आजच्या या एका मध्ये आपण जाणून घेतलेली आहे.