मित्रांनो, घरामध्ये कितीही स्वच्छता केली तरी देखील अनेक निरनिराळ्या प्रकारच्या जीवजंतू, किटक आणि किड्यांचा घरामध्ये प्रादुर्भाव होतो. यामध्ये पाल आणि झुरळ अग्रक्रमाने आढळतात. या जीवजंतूचा वावर आरोग्याच्या दृष्टीने घातक असतो. यांच्यामुळे शरीरात विषबाधा होऊ शकते. विशेषतः पाल बरेचदा घराच्या भिंतीवर आढळून येते. आणि झुरळ कीचनमध्ये धुडगुस घालत असतात.
घरात झुरळ होणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र, खाद्यपदार्थांवर झुरळ जाण्याची भीती सर्वांनाच असते. त्यामुळे कॉलरा, अतिसार असे अनेक आजार उद्भवू शकतात. हे रोग टाळण्यासाठी आपण आपल्या घरातील झुरळे बाहेर घालवणे गरजेचे आहे, म्हणूनच आजच्या या लेखामध्ये आपण आपल्या घरातील पाल व जिरं घालवण्यासाठीचे घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.
प्रत्येक महिला सकाळ सकाळी आपल्या घरातील कामे आवरणाच्या गडबडीत असते. ही कामे आवरल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपला किचन कट्टा स्वच्छ धुऊन पुसून घ्यावा. त्यानंतर एका स्प्रे बॉटलमध्ये थोडेसे पाणी आणि आपल्या घरामध्ये असलेले फिनाईल किंवा डेटॉल मध्ये घालावे आणि याचा स्प्रे आपला किचन ओठावर, आपला बेसिन मध्ये, त्याचबरोबर खिडकी अशा ठिकाणी करावा की ज्या ठिकाणी तुम्हाला खूप शक्यता वाटते की या ठिकाणाहून झुरळे घरामध्ये येण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी स्प्रे करावा.
आणि थोडा वेळ तसाच तो स्प्रे राहू द्यावा. याच्या उग्र वासामुळे नक्कीच तुमच्या घरातील सर्व झुरळ व पाली पळून जातील. दुसरा उपाय म्हणजे आपल्या घराततील कांदा घ्यावा आणि हा कांदा मोठा चिरून घ्यावा. या मोटा मोटा चिरलेला कांदा चे वेगवेगळ्या पाकळ्या काढाव्यात. या पाकळ्या एका दोऱ्यामध्ये ओऊन एक माळ तयार करावे. आणि ही आपल्या घराच्या भिंतीवर लावावी. यामुळे पाली निघून जातात. त्याचबरोबर या माळ्यावर तुम्ही डेटॉलचा किंवा फिनालचा स्प्रे देखील करू शकता. यामुळे देखील घरातील पाली निघून जातात.
तिसरा उपाय म्हणजे आपल्या घरात असलेले गहूचे पीठ अर्धी वाटी घ्यावे आणि त्यामध्ये बोरिक पावडर पाऊण वाटी घालावे आणि थोडंसं दूध घालून याचे कणकेप्रमाणे गोळा तयार करून घ्यावा. या कणकीचे छोटे छोटे गोळे तयार करून आपला घरात असलेला किचन ट्रॉलीमध्ये ठेवावे. यामुळे देखील नक्कीच तुमच्या घरात सर्व मरून जातील. बोरिक पावडर हे जुळण्यासाठी अत्यंत प्रभावी अशी आहे. याने नक्कीच पळून जातात.
अशाप्रकारे हे काही उपाय आहेत की ज्यामुळे आपल्या घरातील झुरळ, पाली कायमचा निघून जाते आणि त्यामुळे कोणताही प्रकारचे आजार आपला घरातील व्यक्तींना होणार नाही.