मित्रांनो ज्यावेळी गरुड पुराणानुसार जेव्हा एखादी व्यक्ती या जगाला सोडते तेव्हा तो आत्मा पहिल्या रात्री कोणत्या रहस्यांतून जातो, काय अनुभवतो आणि त्याच्याजवळ कोण येतो हे सर्व आज आपण जाणून घेणार आहोत आणि हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. असं सांगितलं आहे की गरुड पुराणात जेव्हा प्राण शरीर सोडतात, तेव्हा आत्मा काही काळ त्या जागेभोवतीच भटकत राहतो त्याच्या डोळ्यासमोर त्याचे संपूर्ण जीवन उभे राहते त्याने काय चांगले केले काय वाईट केले कोणाला दु:ख दिले केव्हा खोटं बोललं आणि केव्हा प्रेमाने कोणाची मदत केली हे सर्व त्याला तिथे अत्यंत स्पष्ट पद्धतीने दिसत असते
आत्मा शरीरातून वेगळा होताच एक विचित्र भीती आणि रिक्तपणा जाणवतो. कारण आता त्याच्याकडे ना शरीर असते नाही बोलण्याची ताकद ना खाण्याची इच्छा ना काही पकडण्याची क्षमता. घरात लोक रडत असतात, सगळं पाहत असतो पण काहीही बोलू शकत नाही. तो तो सर्वांना ओढून सांगण्याचा प्रयत्न करत असतो की तुम्ही रडू नका मी इथेच आहे मी तुमच्यासोबत आहे मी जिवंत आहे असं तो सांगण्याचा प्रयत्न देखील करत असतो.
आत्म्याची पुढील यात्रा कशी असते हे देखील जाणून घेणार आहोत गरुड पुराणात लिहिले आहे की, पहिल्या रात्री आत्म्याला यमदूतांचे दर्शन होते. काही आत्म्यांना हे यमदूत अत्यंत भयावह वाटतात – काळा रंग, जळणाऱ्या डोळ्यांसह, हातात दोर आणि गदा असते. पण ज्यांनी जीवनात चांगले कर्म केलेले असतात, त्यांना हे यमदूत भीतीदायक वाटत नाहीत. उलट ते शांतपणे सांगतात तुझी यात्रा आता सुरू होणार आहे, तयार रहा.
यानंतर आत्म्याला एक वाट दाखवली जाते, जी कोणताही सामान्य मार्ग नसतो. तो एक विचित्र अंधारलेला मार्ग असतो कधी थंड बर्फासारखा, कधी काट्यांनी भरलेला. आत्म्याला हा प्रवास पायी करावा लागतो कोणतेही शरीर नसताना. ज्यांनी पाप केलेले असते, त्यांना हे काटे टोचत राहतात आणि प्रत्येक वेदनेसोबत त्यांची पापे त्यांना आठवतात. ज्यांनी पुण्य केलेले असतात, त्यांना देवदूत भेटतात, जे फुलांची बरसात करत मार्ग दाखवतात.
पहिल्या रात्रीचा सर्वात गूढ क्षण म्हणजे रात्रीचा शेवटचा प्रहर.
सर्व लोक गाढ झोपलेले असतात आणि त्या क्षणी आत्मा आपल्या शरीराशी अधिक जुळलेला असतो. आपले घर, कुटुंब, मुले पाहून तो विचार करतो मला थोडा वेळ अजून मिळाला असता पण आता वेळ निघून गेलेली असते, आणि त्याला प्रवास सुरू करावाच लागतो. गरुड पुराण सांगते की, जे लोक पहिल्या रात्री आपल्या कर्मांवर पश्चाताप करतात ते पुढील ११ दिवस सतत भगवंताला आठवतात. आणि जो भगवंताला आठवतो, त्याला स्वतः भगवान मार्ग दाखवतात. म्हणूनच सनातन धर्मात मृत्यूनंतरच्या पहिल्या रात्री खूप महत्त्व आहे. त्या रात्री आत्मा खूप संवेदनशील असतो. म्हणून आपण त्या वेळी श्राद्ध, मंत्र, दीपदान करतो. हे सर्व त्या आत्म्याला शक्ती देतात. म्हणूनच, आपल्या कोणत्याही प्रियजनाचा मृत्यू झाल्यास, पहिल्या रात्री घरात दीप लावा, भगवान विष्णूचे नाव घ्या आणि आत्म्यासाठी शांतिपाठ करा.