मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये असे अनेक व्यक्ती असतात की ज्यामुळे आपल्याला त्यांचा खूप त्रास होतो असतो. या व्यक्तींपासून सुटका होण्यासाठी आपल्या आपण कितीही प्रयत्न केले तरी ते आपल्यापासून दूर जात नाहीत. म्हणूनच आज आपण मूर्ख लोकांपासून सुटका करून घेण्यासाठी एक मार्ग जाणून घेणार आहोत की ज्यामुळे त्या लोकांपासून आपली सुटका होईल.
ही एक प्राचीन काळातील गोष्ट आहे एका गावामध्ये एक खूप मोठा धनवान व्यक्ती राहत होता. त्याला दोन मुले होती. त्याचा मोठा मुलगा खूपच तल्लख व हुशार होता. दोघे भाऊ हळूहळू मोठे होऊ लागतात. काही दिवसानंतर त्यांच्या आई-वडिलांचे निधन होते. आई-वडिलांचा निधनानंतर त्या दोन्ही भावांमध्ये मतभेद होऊ लागले. त्यांनी दोघांनीही संन्यासी होण्याचा निर्णय घेतला. वेगवेगळ्या गुरूकडून दीक्षा घेऊन दोघे भाऊ गंगा किनारी झोपडी बांधून राहू लागली.
दोघांचीही झोपडी वेगवेगळ्या दिशेला होती. मोठ्या भावाची झोपडी ही गंगा किनाराच्या वरच्या बाजूला होती. तर लहान भावाची झोपडी ही गंगा किनाराच्या खालच्या बाजूला होती. दोघांच्याही झोपडीमध्ये खूप अंतर होते. त्या काळामध्ये गंगा नदीमध्ये मनी कंठ नावाचा एक नाग राहत होता. हा मनी कंठ ब्रह्मचारीचा वेश बदलून आजूबाजूंच्या गावांमध्ये फिरत होता. तू रोज नदी मधून बाहेर पडत असताना वेश बदलून बाहेर पडायचा आणि वेगवेगळ्या गावांमध्ये फिरून परत संध्याकाळच्या वेळेस नदीमध्ये प्रवेश करायचा. एक दिवस हा छोटा भावाच्या झोपडी जवळ आला.
छोट्या भावाने त्याला ब्रह्मचारी समजून आदरपूर्वक आपल्या झोपडीत बोलावून घेतले आणि सन्मानाने बसवले. दोघांनी एकमेकांची विचारपूस केली. काही गोष्टींवर चर्चा देखील केली. गप्पाटप्पा झाल्यानंतर नागराज आपल्या घरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी परत नागराज छोट्या भावाच्या झोपडी जवळ आला आणि पुन्हा त्यांच्यामध्ये गप्पा रंगला. असे रोज चालू लागले आणि यामुळे त्यांच्यामध्ये मैत्रीचे नाते निर्माण झाले. नागराज काही काळानंतर घरी जाण्याच्या वेळेला आपला खरा रूपात येऊन त्याच्या हाताला वेडा घालून जायचा किंवा त्याच्या डोक्यावर फणा मारून जात होता. अशा प्रकारे तो प्रेम व्यक्त करत होता.
परंतु छोट्या भावाला ते खूप भितीदायक वाटत होते आणि यामुळे तो खूपच भीतीमध्ये वाढल्यासारखा वाढू लागला. तो नीट खात पीत नव्हता आणि त्यामुळे तो अशक्त दिसू लागला. एके दिवशी छोटा भाऊ फिरत फिरत आपल्या मोठ्या भावाच्या झोपडी जवळ गेला. मोठ्या भावाने आपल्या छोट्या भावाची ही अशक्त असलेली दशा पाहून त्याला विचारले, भावा तुझी हे असे अशक्त दशा कशामुळे झालेले आहेत. काय त्रास होत आहे का तुला. त्यावर छोट्या भावाने उत्तर दिले की, दादा माझ्याकडे एक मनी कंट नावाचा नाग संन्याशीच्या रूपात माझ्याजवळ रोज येत होता आणि त्यामुळे आमच्या दोघांच्या मैत्रीचे वातावरण झाले होते.
परंतु तो काही दिवसानंतर आपल्या खऱ्या वेशांमध्ये येऊन माझ्या अंगाला बिलगत होता आणि यामुळे मला त्याची खूप भीती वाटत होती. पण याच कारणामुळे माझी ही नशा झालेल्या आहेत. त्यावर मोठ्या भावाने त्याला विचारले, तुला नागराजाचे येणे आवडते का? त्यावर लहान भावाने उत्तर दिले की, नाही. मग मोठा भाऊ लहान भावाला म्हणाला की, मी तुला एक उपाय सांगतो तू कर जेणेकरून तो नागराज पुन्हा तुझ्याकडे कधीच येणार नाही. त्यावर छोटा भाऊ मनाला, सांग. मोठ्या भावाने छोटा भावाला प्रश्न केला की, नागराज जेव्हा तुझ्याकडे येतात तेव्हा त्यांच्या गळ्यामध्ये कोणते रत्न असते. त्यावेळेला छोट्या भावाने सांगितले, मणी रत्न.
मग मोठ्या भावाने छोट्या भावाला सांगितले की, नागराज जेव्हा तुझ्याकडे येईल तेव्हा त्याला त्याच्या मनी रत्नाची ची मागणी कर. हे ऐकताच तो तेथून निघून जाईल. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो तुझ्या दारात येईल तेव्हा पुन्हा त्याला त्याची मागणी कर. तुझी मागणी एकटाच नागराज पुन्हा परत निघून जाईल आणि दुसऱ्या दिवशी तो जेव्हा नदीतून बाहेर येत असतो त्यावेळेस तू त्याला रत्नाची मागणी कर. नक्कीच तो तुझा कडे कधीच परत येणार नाही. त्यावर धाकट्या भावाने आपल्या मोठ्या भावाचा आदेश ऐकून आपल्या झोपडीकडे परत गेला.
दुसऱ्या दिवशी नागराज भावाकडे आला नागराज येताच लहान भावाने नागराज ला म्हणले, मित्रा आपली दोस्ती तर खूप चांगली झालेली आहे. मला आपल्या दोस्ती साठी तुझी एक वस्तू आहे तू मला तुझे मनी रत्न दे. हे ऐकताच नागराज तिथे थांबलाच नाही. तो तेथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी जेव्हा पुन्हा नागराज झोपडीच्या दारात आला त्या वेळेला देखील छोटा भाऊ म्हणाला की, नागराज मी तुम्हाला काल मनी रत्नाची मागणी केली होती. पण तुम्ही माझी मागणी न ऐकताच निघून गेलात. कृपा करून मला ते रत्न द्यावे. हे ऐकल्यावर नागराज झोपडीच्या दारातून परत फिरला.
तिसऱ्या दिवशी लहान भाऊ नदीकाठी गेला आणि नदीतून बाहेर येण्यासाठी नागराज यांनी वर फन काढल्या असता नागराजांकडे मागणी केली की, आज तिसरा दिवस आहे मी तुम्हाला तीन दिवस झाले सल्लक मागणी करत आहोत. कृपा करून मला तुम्ही ते द्यावे. त्यावर नागराज यांनी परत पाण्यामध्ये आपली फन बुडवून लहान भावाला उत्तर दिले की, मला ही माझी वस्तू अत्यंत प्रिय आहे. आणि मी ती तुम्हाला देऊ शकत नाही. असे म्हणून तो तिथून निघून गेला. अशा प्रकारचे नागराज परत छोट्या भावाकडे आलाच नाही. काही दिवसांनी मोठा भाऊ आपल्या छोट्या भावाकडे गेला त्या वेळेला आपले स्वस्त झालेला भाऊ पाहून मोठ्या भावाला खूप आनंद झाला.
अशाप्रकारे जर आपल्याला मूर्ख नालायक आणि स्वार्थी व्यक्तींचा त्रास होत असेल तर आपण त्याच्याकडे त्याची प्रिय असणारी वस्तू मागावी. जेणेकरून तो ती वस्तू तर आपल्याला देणारच नाही. यावर तो त्याला आपली घिना वाटेल व तो आपल्याकडे कधीही आपल्या वाटेला येणार नाही.
अशाप्रकारे मूर्ख लोकांपासून सुटका करून घेण्यासाठी, हे एक काम केल्याने ती व्यक्ती आपल्यापासून दूर निघून जाते.