मुलं बिघडू नयेत म्हणून हे आठ नियम आई वडिलांसाठी…. प्रत्येक आई वडिलांनी वाचावे?

Uncategorized

मित्रांनो, तुमची मुलं बाहेर ज्या पद्धतीने वागतात त्यांना ज्या सवयी आहेत किंवा चार लोकांमध्ये गेल्यानंतर त्यांची वागणूक कशी आहे यावरून लोक तुमच्या मुलांचे संस्कार ठरवतात. तुम्ही त्यांना कोणत्या वातावरणात वाढवला आहे ते ठरवतात. मुलांच्या वागण्यामुळे कोणी तुम्हाला ऐकवलं तर तुम्हाला खजील झाल्यासारखं वाटत. मुलांना शिस्त लावायची संस्कार द्यायचे तर काय करायचं. या लेखामध्ये आपण असे काही नियम बघणार आहोत जे मुलांना योग्य संस्कार देतील आणि बिघडवण्यापासून वाचवतील.

 

1) मुलांना शिस्त लावण्याची त्यांच्यावर संस्कार करण्याची योग्य वेळ म्हणजे त्यांच्या लहानपणापासून असते. तसं तर जन्माला येण्याच्या अगोदर पासून आपल्याकडे संस्कार देण्याची रीत आहे ज्याला की आपण गर्भसंस्कार म्हणतो. मुलं पोटात असतानाही नऊ महिने आईने चांगली पुस्तके वाचणे चांगले विचार ऐकणे,चांगले विचार ग्रहण करणे यावर आपल्याकडे भर असतो यालाच आपण गर्भसंस्कार म्हणतो. पण बरेच पालक लोक चूक करतात. असं म्हणून की अजून तर तो लहान आहे त्याचे लाड करण्याचे दिवस आहेत असं म्हणून आपण लहान वयात त्यांचे प्रमाणापेक्षा जास्त लाड करतो.

 

आणि मोठ झाल्यानंतर मुलांवर संस्कार करायचे म्हटलं त्यांना शिस्त लावायची म्हटलं तर ते हातातून निघून गेलेले असतात. त्यावेळेस ना आपल्याकडे वेळ असतो ना मुलांकडे वेळ असतो. जसं ओली काठी वाकवली तर ती वागते पण सुकलेली काठी ही वाकवायचा प्रयत्न केला तर ती वाकत नाही ती थेट मोडते तिचे दोन तुकडे होतात अगदी तसंच आहे लहान मुलांवर संस्कार करायचे हे त्यांच्या कोवळ्या वयापासून सुरुवात होतात.एक ते पाच वर्ष हा मुलांचा सगळ्यात जास्त अनुकरण करण्याचा आणि शिकण्याचा काळ असतो. या वयात सुरू केलेली शिकवण ही हळूहळू रुजवली जात असते. आणि ती कायमस्वरूपी राहू शकते.

 

2) वयात यायच्या अगोदरच म्हणजेच नको त्या वयात तुम्ही मुलांचे मित्र बनू नका. मुलांचे आई-वडील म्हणूनच त्यांना संस्कार द्या. मुलांच्या वयाची वर्गवारी आपण अशा पद्धतीने करू शकतो.0-5 जन्मापासून ते पाच वर्षापर्यंत प्रेमाने लाडाने वाढवायचे. 5-15 पुढची दहा वर्ष शिक्षण घेत असताना कठोर शिस्तीने.आणि 15 ते 25. अनुशासन आणि नियमात वाढवायला हवं आणि 25 या वयात आई-वडिलांनी मुलांचे मित्र व्हायला हरकत नाही.

 

जर तुम्ही मुलांचे प्रमाणपेक्षा जास्त लाडच करत राहिलात तर मुलं बिघडतात आणि वय वर्ष 25 च्या नंतर जेव्हा मुलांकडून काही चुकीच्या गोष्टी घडतात तेव्हा मुलं तुम्हाला त्या गोष्टीसाठी जबाबदार धरतात की योग्य वयात आम्हाला तुम्ही थांबवलं का नाही म्हणून.. मुलं वाया जाण्याचा दोष त्यांची वाया जाण्याची जबाबदारी ही मुलं पूर्णपणे तुमच्यावर ढकलतात. म्हणून लाड करायच्या वयात लाड करा आणि जिथे मैत्रीपूर्ण राहायला हवं त्या वयात मैत्रीपूर्ण रहा.

 

3) मुलं तुमची योग्यता पारखत असतात तुमचं अनुकरण करत असतात आणि त्यानुसार तुमच्याशी व्यवहार करत असतात. जर तुम्ही मुलांचे फक्त आई- वडील आहात म्हणून मुलांनी तुम्हाला मान द्यायला हवा आदर द्यायला हवा असं तुम्ही समजत असाल तर तुम्ही चुकीचे आहात.मुलांच्या काळानुसार त्यांच्या जनरेशन नुसार तुम्हाला स्वतःला काही नवीन गोष्टी शिकून घ्याव्या लागतात.

 

मुलांनी विचारलेले प्रश्न त्यांच्या शंकांचे निरसन जर तुम्ही करू शकले नाही तर तुम्हाला काही येत नाही असं मुलं समजतात.आणि तुमचा आदर कमी व्हायला लागतो बरेचसे पालक मुलं ऐकत नाहीत अशी तक्रार करतात..पण जर मुलं ऐकतच नाहीत म्हणून तुम्ही त्यांना शिस्त लावन सोडून देत असाल त्यांच्यासमोर नमतं घेत असाल तर तुम्ही चूक करत आहात.

 

4) मुलांकडून आपल्या पद्धतीने काम काढून घेण्याच्या किंवा आपल्या पद्धतीने त्यांना वागायला सांगण्याच्या चार पद्धती आहेत. सगळ्यात अगोदर हे मुलांना सांगा की तुम्हाला काय हवं आहे नंबर दोन ते कशा पद्धतीने हवा आहे. तिसरी गोष्ट नाही केलं किंवा नाही ऐकलं तर काय होईल त्याची परिणाम काय असतील आणि चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःती गोष्ट मुलांना करून दाखवा जी तुम्हाला त्यांच्याकडून अपेक्षित आहे.. या चार पद्धतीने तुम्ही मुलांना गोष्टी शिकवत असाल तर मुलं तुमच्या शब्दा बाहेर असणार नाहीत..

 

मुलांना आरडा ओरडा आदळ आपट करून जर सांगायला गेला तर मुले रडतील घाबरतील आणि तुमचा ऐकणार नाही.या उलट वरील चार पद्धतीने जर तुम्ही मुलांना सांगितलं तर मुलं तुमचं म्हणणं ऐकतील. मुलांना शिक्षा करायची तर त्यांना मारू नका ओरडू नका. त्याऐवजी त्यांचे टीव्ही बघणं बंद करा मोबाईल बंद करा त्यांना खाण्यामध्ये मेथी पालक जमतील तेवढ्या पालेभाज्या खायला द्या. या शिक्षेचे चार फायदे होतील एक तर मुलांची बॉडी डिटॉक्स होईल.शरीराला आवश्यक असणारे सगळे घटक त्यांच्या शरीराला मिळतील कुठलेही आढेवेढे न घेता. मुलांची बुद्धी मुलांचे डोकं डिटॉक्स होईल. काय केल्यानंतर आपल्याला ही शिक्षा मिळते हे त्यांच्या लक्षात येईल. चुका कमी करतील.. अशी शिक्षा केल्याने तुम्हाला पुन्हा शिक्षा करण्याची वेळ येणार नाही.

 

5) आई वडील नोकरी करत असतील किंवा दोघेही काही ना काही काम करत असतील तरीही आपल्या व्यस्त वेळेतून महिन्यातून कमीत कमी 30 तास तरी फक्त आणि फक्त मुलांसाठी वेळ काढा.मुलांसाठी असलेल्या वेळात तुम्ही तुमचं कुठलंच काम करणार नाही तो वेळ फक्त त्यांच्यासाठी असेल याची काळजी घ्या.मग तो वेळ तुम्ही प्रत्येक दिवसातून थोडा वेळ काढा किंवा एक दिवसाआड किंवा हप्त्यातून एक पूर्ण दिवस असा काढा काही हरकत नाही.

 

हा वेळ जेवणाच्या व्यतिरिक्त चा वेळ असायला हवा आणि हा वेळ दोघांनी द्यायला हवा फक्त आईने किंवा फक्त वडिलांनीनाहीतर दोघांचाही वेळ हवा. तुमच्याकडे वेळ नाही म्हणून तुम्ही पैशाने खरेदी करून मुलांना भौतिक वस्तूमध्ये. त्यांच्या खेळण्यांमध्ये. त्यांचा आनंद शोधायला लावत असाल तर तुमच्या मुलांना पैशाची किंमत राहणार आहे न वस्तूंची किंमत राहणार आहे ना तुमच्या भावनांची किंमत राहणार आहे.मुलं असंवेदनशील होत जातील..

 

जर तुम्ही त्यांच्यासोबत वेळ घालवला नाही तर तुमच्या आवडीनिवडी, तुमचे नियम, तुमची व्हॅल्यू तुमचे संस्कार, तुमची नितीमत्ता, तुमचे गुण हे त्याच्यापर्यंत पोहोचणारच नाही आणि पुन्हा तीच वेळ फिरून तुमच्याकडे येईल जेव्हा मुलं पैसे कमवायला लागतील तेव्हा ते तुम्हाला वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतील तेव्हा त्यांच्याकडे तुम्हाला देण्यासाठी वेळ नसेल.मुलांना आपल्याकडून पाच गोष्टी हव्या असतात. आपण त्यांची काळजी करणं त्यांच आपल्यावर अवलंबून असणं निस्वार्थ प्रेम आपल्याकडून मिळणारे गायडन्स, आणि पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वातंत्र्य. या सगळ्या गोष्टी त्यांनादेण्यासाठी तुम्हाला त्यांच्यासोबत वेळ घालवणे जरुरी आहे.

 

6) मुलांना शिस्त लावत असताना त्यांच्यावर संस्कार करत असताना घरातल्या मोठ्यामाणसांचा म्हणजे त्यांच्या आजी- आजोबांचाही त्यामध्ये सहभाग असू द्या काही गोष्टी पालक म्हणून आपण त्यांना नाही समजावू शकत ते मुलं आपल्या आजी आजोबांकडून समजून घेऊ शकतात..

 

7) सगळ्याच गोष्टी लाडात होत नाही काही गोष्टींसाठी मुलांना रागवण गरजेचे आहे आणि मुलांना रागवताना हे लक्षात घ्या तुम्ही रागावला त्यांना शिक्षा केली तर तुम्ही लगेच त्यांना मनवायला. त्यांच्याशी गोड बोलायला जाऊ नका तुमच्या रागाचा तुमच्या शिस्तीचा थोडा तरी परिणाम त्यांच्यावर होऊ द्या..मुलांना कधी रागवलच नाही नुसता लाड केला तर मुलांना मेंटल प्रेशर घेण्याची क्षमता येणार नाही. बाहेरचे जग हे आपल्यापेक्षाही खूप कठोर आहे.

 

आणि ते सहन करण्याची ताकद त्यांच्यात आणायची असेल तर फक्त लाड करून जमणार नाहीत.आणि या उलट रोज ओरडून फक्त त्यांच्यावर रागवून काम होणार नाही अशाने मुलांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. तुमचा राग आणि तुमचा लाड यात तुम्हाला बॅलन्स ठेवता यायला हवं…

 

8) मुलांना शिकवण्यासाठी लाखो गोष्टी आहेत पण सगळं तुम्ही एकदाच देऊ शकत नाही यासाठी तुम्हाला साधा सोपा आणि सरळ मार्ग म्हणजे. तुम्ही त्यांना या सात गोष्टी शिकवा. शरीर (व्यायामाच महत्व) विनम्रता, प्रतिष्ठा, कला, धन, परिश्रम आणि दुनियादारी.

 

तुम्ही मुलांना या गोष्टींबद्दल शिकवलं तर यात बऱ्याचशा गोष्टी मुलं शिकतील आणि तुमच्याकडून आवश्यक गोष्टीही सुटणारही नाहीत. आणि मुलांना हे सगळं शिकवण्यासाठी अगोदर तुम्हाला या गोष्टी आत्मसात कराव्या लागतील कारण मुल करत नाही जे तुम्ही त्यांना सांगतात मुलं ते करतात जे तुम्ही करत असतात. म्हणून मुलांना जे काही शिकवायचा आहे ते स्वतः मध्ये आणा मुलं तुमच्याकडे बघून ते आपोआप शिकतील…

 

अशाप्रकारे या या गोष्टी जर आपण मुलांना शिकवलं तर नक्कीच आपले मुलं बिघडण्या पासून वाचतील व त्यांच्यावर चांगले संस्कार होतील.

Leave a Reply

Your email address will not be published.