मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधी हे तीन जीव दिसून आले तर समजा की श्री लक्ष्मी घरात आली आहे…!!

Uncategorized

मित्रांनो, हिंदू धर्मात माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानले जाते. असे मानले जाते की, ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्याला कधीही धन-धान्याची कमतरता भासत नाही. आयुष्य सुखकर असते. म्हणूनच असं मानलं जातं की धन कमविण्यासाठी देवी लक्ष्मीचीही कृपा असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपला हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्याला एक विशेष स्थान आहे.त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्याला देखील एक विशेष महत्त्वाचे मानले जाते. या महिन्यांमध्ये माता लक्ष्मीची व तसेच श्रीहरी विष्णूची पूजा केली जाते. मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी महिला घरामध्ये माता लक्ष्मीची पूजा करतात, आराधना करत असतात, व्रत करत असतात.

 

असे म्हटले जाते की या महिन्यांमध्ये जे कोणी माता लक्ष्मीची विशेष अशी पूजा करत असतात त्यांना माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. घरामध्ये धनधान्य टिकून राहते. संपत्ती, ऐश्वर्या व सुख शांती टिकून राहते. यासाठी प्रत्येक महिला हे व्रत करत असतात. या महिन्यांमध्ये माता लक्ष्मीची कृपा जर तुमच्यावर झाली असेल तर ती तुम्हाला काही संकेत देत असते. ते काही जीवांच्या माध्यमातून देखील तुम्हाला मिळत असतात. जर का हे काही जीव तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास दिसले तर नक्कीच समजून जा की माता लक्ष्मीचे तुमच्यावर कृपा झालेली आहे. हे जीव कोणत्या याबद्दलच माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

 

ज्योतिषशास्त्रामध्ये देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे अनेक मार्ग सांगण्यात आलेले आहे. तसेच माता लक्ष्मीची कृपा होण्याआधी काही संकेत मिळतात. ज्यावरून लक्ष्मीची कृपा होणार म्हणजेच धनलाभ होणार असे कळते. ज्योतिषशास्त्रानुसार माता लक्ष्मी येण्यापूर्वी काही ना काही संकेत नक्कीच देते. जर तुमच्या मेन गेटजवळ रुईचं झाड असेल तर समजून का की आपली चांगली वेळ सुरु झाली आहे. हे झाड तुमच्या भविष्यातील चांगल्या दिवसाचे संकेत देते.

 

जर तुमच्या घरासमोर सफेद गाय येऊन हंबरडा फोडू लागली तर ते देवी लक्ष्मीचा वास असल्याचे संकेत आहे. गायीला गुळ, रोटी भरवून तिचं स्वागत केलं पाहीजे. घरातून बाहेर कामानिमित्त जात असताना वाटेत पाण्यानं भरलेला कलश दिसला तर समजून जा की तुम्हाला कामात यश मिळणार आहे. तुमच्या कामात निश्चित यश मिळेल याचे ते संकेत असतात. तुमच्या अंगणात चिमण्यांचा चिवचिवाट सुरु झाला तर समजून का चांगले दिवस येणार आहेत. चिमण्यांसाठी पाणी आणि दाण्यांची व्यवस्था करा. बाहेर फिरायला जाताना वाटेत पैसे मिळाले तर समजून जा की देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे. तुमची आर्थिक स्थिती आणखी मजबूत होईल याचे संकेत असतात.

 

शुक्रवारी सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ पांढरे वस्त्र परिधान करावेत. त्यानंतर देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा करावी. देवीला कमल पुष्प अर्पण करावं. देवी लक्ष्मी आणि शुक्र ग्रहाची कृपा प्रात्प व्हावी यासाठी मंत्राचा जाप करावा.जर तुमच्या घरच्या उंबरठ्यावर अनेक काळ्या मुंग्या पाहायला मिळाल्या तर तो एक शुभ संकेत आहे. असं मानलं जातं की हे माता लक्ष्मीच्या आगमनाचं प्रतीक आहे. गणरायांप्रमाणे माता लक्ष्मीलाही उस अत्यंत प्रिय आहे. घरात कोणत्याही सदस्याला अचानक उस खावासा वाटला तर समजावं की लवकरच तुमच्या घरात सुखसमृद्धी येणार आहे.

 

घराभोवती घुबड दिसल्यास तेही एक अत्यंत शुभ लक्षण मानलं जातं. घुबड पाहाणं हा एक अपशकून असल्याचं आजही समाजात मानलं जात. मात्र घुबड हे माता लक्ष्मीचं वाहन आहे. घराभोवती घुबड दिसल्यास तुम्हाला आर्थिक संपन्नता मिळणार आहे असा त्याचा अर्थ समजावा. सकाळी उठल्यावर कोणाला तरी झाडू मारताना पाहाणे हेही एक शुभ लक्षण आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला लवकरच पैसे मिळणार आहेत. घरात एखादा पक्षी (कबुतर सोडून) घरटं बनवून अंडी घालताना दिसल्यास ते अत्यंत शुभ मानलं जातं. तुमच्या उत्पन्नाचे नवे मार्ग लवकरच खुले होणार आहेत असा त्याचा अर्थ होतो.

 

अशाप्रकारे हे काही संकेत आपल्याला माता लक्ष्मी देत असते.

Leave a Reply

Your email address will not be published.