मित्रांनो, घरातील तांब्या – पितळेची भांडी ही आपण घरातील पूजा किंवा इतर काही खास प्रसंग तसेच सणांना वापरतो. एरवी ही भांडी तशीच घरातील माळ्यावर पडून असतात. ही भांडी जास्त प्रमाणात वापरात नसल्याने एका ठराविक काळानंतर काळी पडू लागतात. काही खास प्रसंगाच्या वेळी या भांड्यांचा वापर करून त्याचा वापर झाल्यानंतर आपण पुन्हा त्यांना स्वच्छ धुवून एका कोपऱ्यात ठेवतो.
अशा भांड्यांवर काळे डागसुद्धा पडू लागतात. या भांड्यांवर पडलेले काळे डाग व काळपट थर कितीही धुतला तरीही जाता जात नाही. वारंवार घासूनही हवी तशी भांड्यांना चमक येत नाही. हे डाग सहसा घासून निघत नाहीत. आपल्याकडील प्रत्येक भारतीय सणवाराला ही तांब्या पितळेची भांडी आपल्याला वापरावीच लागतात. यासाठी ही भांडी वेगवेगळ्या पद्धतीने स्वच्छ धुवून घेतली जातात. परंतु कितीही धुवून किंवा रगडून या भांड्यांवरचा काळा थर काही केल्या जात नाही.
तांब्या – पितळेची भांडी चमकवण्यासाठी बाजारांतील विविध साबणांचा किंवा लिक्विडचा वापर केला जातो. परंतु कितीही वेगवेगळ्या प्रकारचे साबण किंवा लिक्विड वापरले तरीही ही भांडी आहे तशीच काळी राहतात. अशावेळी एक सोपा घरगुती उपाय वापरून आपण ही तांब्या – पितळेची भांडी नव्यासारखी लख्ख – चकचकीत करु शकतो. तांब्या – पितळेची भांडी नव्यासारखी चकचकीत करण्यासाठी घरगुती सोपा उपाय नेमका कोणता ते आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
त्यासाठी आपल्याला मीठ एक चमचा इतके घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक चमचा इतके सायट्रिक ऍसिड घालायचे आहे. हे ऍसिड तुम्हाला बाजारामध्ये कोणताही ठिकाणी उपलब्ध होऊ शकते. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी इतके पाणी घालायचे आहे आणि मीठ आणि ऍसिड या पाण्यात व्यवस्थित रित्या विरघळू द्यायचे आहे. नंतर हलक्या हाताने आपल्याला आपला तांब्या पितळेच्या भांडी वर मऊ स्क्रबरच्या साह्याने घासून घ्यायचे आहे. तुम्हाला नक्कीच दिसून येईल की कोणताही जोर न लावता आपण या मॅजिकल पाण्याच्या साह्याने भांडी अगदी स्वच्छ व नवीन लखलखीत करू शकतो.
अशाप्रकारे हा साधा सोपा उपाय तुम्ही देखील करून बघा. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा झालेला दिसून येईल.